तुम्हाला प्लुक माहीतंय ? प्लुक हा एक पेंग्विन आहे. तो उत्तर ध्रुवावर रहातो. प्लुक आपल्या घरी बर्फात खूप आनंदी आहे. पण त्याला एकच अडचण आहे. त्याला पाण्याची जाम भिती वाटते. प्लुक कधीच पाण्यात उअतरत नाही. बाकीचे सगळे पेंग्वीन समुद्रात छप्पाक्क छप्पाक्क करून उड्या मारतात आणि ताजे ताजे मासे खातात. प्लुकला पोहता येत नसल्याने त्याला कधीच पोटभर मासे खायला मिळत नाहीत.
सकाळी जाग आली तेव्हा एल्माने आपले पंख पसरले. मस्तंच दिसत होते पंख ! मोठे नि मजबूत ! असे पंख पसरूनच एल्मा आपल्या घरट्याच्या कोपर्याकोपर्यात फिरली. मग ती घरट्याच्या काठावर येऊन उभी राहिली. आपल्या पंखांकडे बघत मनाशीच म्हणाली, " आता मला उडायचंय ! "
उंच आकाशात घिरट्या घेणार्या एल्माच्या आईला एल्मा दिसली. किती काठावर उभी होती ती ! आई पट्कन खाली उतरली.
" एल्मा, लवकर आत घरट्यात जा बघू ! " असे म्हणून तिने एल्माला घरट्यात पाठवले.
" पण मला उडायला शिकायचंय आई ! माझे पंख बघ किती मोठे नि बळकट झालेत.. " घरट्यातून हळूच डोकावत एल्मा आईला म्हणाली.
आईने तिच्या चोचीत एक दाणा घातला.
" अहाहा ! वॉव ! " नुकतेच फिरायला बाहेर पडलेले दास अस्वल नि वॉस कोल्हा आनंद आणि आश्चर्याने थक्क होऊन एकत्रच उद्गारले ! त्यांना क्षितिजावर एक अप्रतिम सुंदर रंगीबेरंगी इंद्रधनुष्य दिसले होते.
त्या सुंदर इंद्रधनुष्याकडे दास नि वॉस अगदी एकटक बघत राहिले. तेवढ्यात दास म्हणाला, " माहितंय तुला, त्या इंद्रधनुष्याच्या पायथ्याशी एक गुप्त खजिना असतो म्हणे ! "
" कोणता खजिना ? " वॉसने विचारले.
" मला नीट माहीत नाही. पण तो खूपच मूल्यवान असतो. ज्यामुळे आपण खूप खूप श्रीमंत होतो " दास म्हणाला.
"बाबा इंद्रधनुष्य करून दाखवा ना. प्लीज. मी कधी बघितलंच नाहीये. प्लीज ना बाबा." सायु सकाळपासून बाबांच्या मागेच लागली होती.
"अगं, इंद्रधनुष्य असं घरी कसं करणार?" आज्जीने मुद्दामून हसतच विचारलं.
"अग आज्जी काल आई धनुकल्याची गोष्ट सांगत होती ना, तेव्हा बाबा म्हणाले मी दाखवीन तुला इंद्रधनुष्य. आणि आत्ता दाखवायला सांगतेय तर बाबा लक्षच देत नाहीयेत." सायुने आज्जी कडे तक्रार केली.
इतक्यात बाबा आलेच आंघोळ करून बाहेर. "काय गं पिल्लू कशाला गाल फुगवून बसलीयेस?"
"हं तुम्ही लक्षच देत नाही बाबा. मला इंद्रधनुष्य करून दाखवा ना."
चित्रकर्तीला हीच चित्रे पुन्हा अशीच काढता येतील की नाही ही शंका आहेच. तरीपण थोडीशी गंमत.
बदकाने नाकातले बोट काढुन डायरेक्ट कालपरवाच्या शिवाजीम्हाराजांच्या कथेतले शत्रु मारले आहेत असे अनुमान काढायला वाव आहे. चित्रकर्ती आणि तिचे (गरीब) मायबाप रजनीकांतांचे फॅन नाहीत, त्यामुळे असल्या gravity defying अचाट स्टंटसची स्फुर्ती कुठुन आली नकळे 
चित्रकर्तीचे वय- पावणेतीन वर्षे
नाकात बोट घालणारे बदक 

चित्रकाराच्या मते,
"हा बदक आहे, याचं नाव माहित्त्ताय? बदक. तो नाकात बोट घालतोय.
(मुलांसाठी केलेला लिखाणाचा एक प्रयत्न. आत्तापर्यंत ज्या छोट्या दोस्तांनी एकतरी ट्रेक केलाय त्यांना ह्यातले गुंफा, पाण्याची टाकं हे शब्द ठावूक असतील. ज्यांना माहित नाहीत त्यांनी एकदा हया गोष्टी खालचे फोटे बघितले तरी त्यांना ते पटकन कळतील.)
कोणत्या तरी आडगावात सुरु होतो हा सारा प्रवास, अगदी पायथ्यापासून. आणि वळणं घेत घेत वर, डोंगर माथ्यापर्यंतं जाऊन थबकतो. पावसाळ्यात पावसाशी सलगी करत वाटही हिरवी होते तर बोचर्या थंडीत ती वार्याचीच शाल पांघरते.
लाडू चिवडा करती लढाई
दोघेही मारती बढाई
`मी आवडता `-`आवडता मी `
चवीत सा-या मीच नामी !
तिखटाशिवाय फराळ कसला !
गोडाविण तो फराळ कसला ?
तिखट गोड ते भांडु लागले
मदतीसाठी ओरडू लागले-
शेव चकली दोघी धावल्या
जामुन बर्फी करंज्या आल्या
ताटामध्ये सुरू जाहली
तू-तू मी-मी गंमत झाली
बंडू जवळी आला दिसता
पदार्थांमधे वसे शांतता !
...चव नसते गोडा-तिखटाला
जेव्हा असतो बंडू भुकेला !!
त्यादिवशी एक कापसाची म्हातारी मला आणि लेकीला दिसली. ती पकडे पर्यंत उडत उडत दुर गेली. आणि ती गेली म्हणुन लेकीने भोकाड पसरलं. ते आवरायला हि गोष्ट इंस्टंट्ली सुचली आणि तीला सांगितली. त्यानंतर परत संध्याकाळी एक म्हातारी दिसली तर तीने तीला उडून दुर जाउ दिलं !
-----
(माझे वडील मी लहान असताना मला गोष्टी सांगायचे त्यातली एक मी आता तुम्हाला सांगणार आहे. मला माहीत नाही, ही गोष्ट पूर्वापार - अगदी त्यांच्याही बालपणापासून - अस्तित्वात आहे का. मात्र मी पुढे ती माझ्या मुलांना सांगत असे आणि आता माझ्या नातवालाही सांगतो. माझा नातू आता फक्त आठ महिन्यांचा आहे पण केव्हाही ही गोष्ट सांगायला मी सुरुवात केली की रडणं थांबवून, खेळणं थांबवून अगदी लक्ष देऊन ऐकतो. गोष्ट सांगताना मी केलेले काही आविर्भाव, हातवारे बघून रिस्पॉन्सेस देतो. आश्चर्य वाटते. पहा तुम्ही तुमच्या मुलांना आणि नातवंडाना सांगून. माझ्या नातवासारख्याच प्रतिक्रिया मिळाल्या तर मला जरूर कळवा.)