बालसाहित्य

डच बालकथा ५ - नीनाची सकाळ

Submitted by मितान on 22 August, 2010 - 16:23

एका शेतातल्या वाडीवर यान कुत्रा आणि त्याचे कुटुंब रहात असे. त्याची नि त्याच्या छोट्याशा पिलाची, नीनाची ही गोष्ट.

कुकूSSSSचकूSSS! कोंबड्याने बांग दिली. पा उठला. अगदी हळूच, पावलांचाही आवाज होणार नाही याची काळजी घेत तो दाराकडे जाऊ लागला. तरीपण त्याच्या चाहुलीने नीना जागी झालीच!
" कुठे जातोयस तू पा ? " नीनाने विचारले.
" श्श्श्श्श.. ! आता सगळ्यांना जागी करू नको हं नीना. अगं, मी वाडीवर एक फेरफटका मारायला जातोय सहजच. तुला यायचंय का माझ्यासोबत ? " पा ने विचारले.
नीना काय तयारच होती. टुणकन उडी मारून ती पा च्या मागे निघाली.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

डच बालकथा - कोंबडी आणि पिल्लू

Submitted by मितान on 19 August, 2010 - 08:23

एका शेतावर एक कोंबडी रहायची. छोटंसंच पण एकदम शानदार घर होतं हं तिचं. दिवसभर शेतात किडे मुंग्या शोधायची. इकडेतिकडे सापडलेले दाणे मस्त चवीचवीनं खायची. आणि रात्री आपल्या घरात येऊन आवडीचं काहीतरी करत बसायची. खूप छंद होते कोंबडीला. तिला गायला आवडायचं, तिला विणायला आवडायचं, नवे नवे पदार्थ बनवायला आवडायचं आणि बागकामही आवडायचं. आपल्या घरासमोरच्या अंगणात तिने छान बाग फुलवली होती.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

गोष्ट: धनुकल्याचा रुसवा

Submitted by सावली on 11 August, 2010 - 21:12

५ ऑगस्ट २०१०

आज सकाळी कावळा उड सारखा खेळ खेळताना मुलीने इंद्रधनुष्य पण उडालं अस म्हटलं. त्या नंतर तिलाच गंमत वाटून ती विचारायला लागली कि इंद्रधनुष्याला पंख असते तर आणि ते उडालं असता तर कित्ती छान दिसलं असतं वगैरे. या बोलण्यावरून सुचलेली हि गोष्ट.

*****

गुलमोहर: 

डच बालकथा ३ - हत्ती आणि मासोळी

Submitted by मितान on 3 August, 2010 - 14:48

एक होतं जंगल. त्या जंगलात एक हत्ती रहायचा. दिवसभर त्या जंगलात खेळत रहायचा. भूक लागली की झाडावरची फळं खायचा आणि तळं, तलाव, झरा असे जिथे सापडेल तिथले पाणी प्यायचा. हत्तीची जंगलात सगळ्यांशी मैत्री होती. तो सर्वाना मदत करायचा. त्यामुळे सर्वांचा आवडता होता.

गुलमोहर: 

गोष्टः तळ्यातले मित्र

Submitted by सावली on 26 July, 2010 - 22:17

मागे एकदा मुलीच्या डेकेअर मध्ये एका मुलाने तलावातून काही बेडकाची डीम्भ आणली होती. मग त्यांच्या शिक्षकेने आणि मुलांनी ती पाळली, अगदी बेडूक होऊन पळून जाई पर्यंत. बेडकाच्या वेगवेगळ्या अवस्था मुलाना आणि मला पण सहज बघायला मिळाल्या. त्यानाच इथे गोष्टीरूप दिलंय

*************
एक होत छोटस तळ. हिरव्यागार रंगाच्या पाण्याच , चहूबाजूला गर्द झाडी असणारं. त्या तळ्यात होती इवलाली लाल कमळे. आणि पाण्यात खालीसुध्दा खूपखूप पान वनस्पती होत्या.

गुलमोहर: 

सुरवंटाची गोष्ट (डच बालकथा - २)

Submitted by मितान on 24 July, 2010 - 04:39

एक अळी होती. कुरूप, बुटकी नि लठ्ठ. तिला ना हात होते ना पाय. टिंबाएवढे मिचमिचे डोळे होते फक्त. दिवसभर इकडे तिकडे आपले अंग ओढत कशीबशी सरपटत रहायची. झाडाची पाने कुरतडून कुरतडून खात रहायची. ही अळी खूप भित्री होती. कोणाची चाहूल जरी लागली तरी अंग चोरून घेत एखादया पानामागे लपून बसायची. तिला वेगात पळता सुद्धा येत नसे. पण या अळीच्या डोळ्यात कुतूहल मात्र अपार होते. समोर येणारी प्रत्येक गोष्ट ती निरखून बघायची. जगात किती वेगवेगळ्या, सुंदर सुंदर गोष्टी आहेत असे तिला सारखे वाटायचे. आणि मग स्वतःची कुरूपता बघून तिला अजूनच वाईट वाटायचे.

गुलमोहर: 

डच बालकथा

Submitted by मितान on 19 July, 2010 - 01:28

मला आवडलेल्या एका डच बालकथेचा हा स्वैर अनुवाद -

एक बदकाचे पिल्लु होते . त्याचे नाव होते कोल. त्याला दोन भाऊ पण होते. आई-बाबा आणि दोन भावांबरोबर तो एका छोट्या तळ्याच्या काठावर रहायचा. कोल थोडा लाजाळूच होता. खूप कमी बोलायचा. सगळी कामंपण तो खूप हळुहळू करायचा. एकटाच उंच उंच गवतात खेळत रहायचा. तिथून थोडया अंतरावर अजून एक मोठे तळे होते. तिथे हंसांची वस्ती होती. का कुणास ठाऊक पण सगळी बदके हंसांना घाबरायची. कोलला त्या मोठ्या तळयाबद्दल खूप कुतुहल होते. पण "तिकडे अजिब्बात जायचं नाही हं " असं आई सारखं सांगायची. म्हणून त्याला तिकडे जाताच यायचे नाही.

गुलमोहर: 

गोष्टः कुनीदेशातल्या सशांची पिकनिक

Submitted by सावली on 12 July, 2010 - 02:24

दूरदूर पसरलेली हिरवीगार कुरणे. बाजूने खळाळणारी नदी आणि नदीकाठची दाट झाडी. झाडांच्या शेंड्याशी खेळणारी डोंगराआडून डोकावणाऱ्या सूर्यदेवाची हळदुली किरणं. अशी सुंदर सकाळ होती इथली. अशा या हिरव्या कुरणावर सगळीकडे पांढरे शुभ्र गुबगुबीत ससे टणाटण उड्या मारीत होते. मऊमऊ लुसलुशीत गवत चटाचटा खात होते. सकाळच्या कोवळ्या उन्हाने गवत सुद्धा हळदुलं झाल होतं. आणि अशा गवतात आणखी काही चिमुकले पाय दुडदुडत होते.कोण बर हि लाल लाल गोबऱ्या गालांची? अरेच्च्या बरोब्बर. हि तर आपल्या कुनीदेशातली चिमुकली मुलं.

गुलमोहर: 

गोष्टः निहारिकाचे स्वप्न

Submitted by सावली on 17 June, 2010 - 23:15

निहारिका घराच्या समोरच्या पायऱ्यावर बसून दोन्ही हाताच्या तळव्यात आपली हनुवटी टेकवून आकाशातले तारे बघत होती. आई घरातले काम संपवून आलीच इतक्यात तिच्या बाजूला बसायला. आई आणि चिमुकली निहा नेहेमीच अस रात्री चांदण्यात बाबांची वाट बघत बसत. आईच्या मांडीवर डोकं ठेवून कितीतरी गोष्टी ऐकायला आणि चंद्र चांदण्या बघायला निहाला फार आवडायचे. निहाच्या आईला तर असंख्य गोष्टी सांगायची हौसच होती. या गोष्टीमध्ये आठवड्यातून एकतरी चंद्राची गोष्ट असायचीच. आजपण चंद्राची गोष्ट सांगून झाल्यावर निहा म्हणाली आई मी मोठी झाले ना कि परी होणार आणि चंद्रावर जाणार.

गुलमोहर: 

एलियन्सच्या ग्रहावर - मॅजिका

Submitted by एस अजित on 8 June, 2010 - 11:07

नमस्कार बालमित्रांनो,

मी आज तुम्हाला एक नवीन गोष्ट सांगणार आहे. यात नेहेमीचे राजा राणी नाहीत तर चक्क एलियन्स आहेत. मग तयार आहात ना एलियन्सची गोष्ट ऐकायला? चला तर मग.

अनु आणि मनु ही दोघं भावंडं शाळेला सुटी लागली की आपल्या मामाच्या गावाला जात असतं. मनु होती मोठी आणि अनु होता लहान. दोघांना मामाचा गावं फार आवडायचा. मामाच्या गावाबाहेर एक मोठी टेकडी होती. तिथे भरपुर झाडं होती. दररोज सकाळी मामा आपल्या भाच्यांना घेऊन त्या टेकडीवर जायचा. दोघांनाही त्या झाडांच्या सावलीत खेळायला खुप आवडायचे.

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - बालसाहित्य