बादशाही ऑम्लेट

Submitted by कवठीचाफा on 22 December, 2012 - 13:00

बादशाही ऑम्लेट :

साहित्य

अंडी - २
कांदे - १ मध्यम आकाराचा
आलंलसूण पेस्ट - १ चमचा
मिरच्या - ५-६ बारीक चिरलेल्या
सोया सॉस - १ चमचा
चिलीसॉस ( ग्रीन ) - १ चमचा
तेल - गरजेनुसार
जिरं - चिमूटभर
मोहरी - चिमुटभर
मीठ - चवीपुरते

कॄती :
प्रथम अंडी एका भांड्यात फोडून घ्यावीत, त्यानंतर त्यात सोया सॉस व चिलीसॉस मिसळून ती व्यवस्थित फेटून घ्यावीत
त्यानंतर एका लहान भांड्यात चमचाभर तेल टाकून त्यात बारीक चिरलेल्या मिरच्या, आलं लसूण पेस्ट व्यवस्थीत परतून घ्यावी ( मिश्रण जास्त घट्ट होता कामा नये )
मिरच्या व आलं लसूण पेस्ट व्यवस्थित परतल्यागेल्यावर त्यात जिरं व मोहरी टाकून गॅस बंद करावा
जिरं मोहरी फुलून आल्या बरोबर ती फोडणी मघाशी फेटून घेतलेल्या अंड्यांच्या मिश्रणात टाकावी
थोडावेळ ते मिश्रण थंड होऊन द्यावे. यात चवीनूसार मिठ टाकावे.
नंतर पॅनवर चमचाभर तेल टाकून त्यावर हे मिश्रण ओतावे.
.
.
यानंतर जे तयार होईल त्याला तुमचं काळीज खरंच सहन करू शकत असेल तर त्याला ऑम्लेट म्हणायला हरकत नाही.
तटी. : ही पाककृती वाचून जर तुम्ही ऑम्लेट तयार करणारच असाल तर तुमची स्वयंपाकघरातली हुकूमशाही बाद होंण्याची पुर्ण खात्री असल्यानं याला `बाद' शाही ऑम्लेट म्हणता येईल. Proud

अती तटी : ही फसलेली पाककॄती नसून फसवी पाककॄती आहे याची नोंद घ्यावी Wink

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Biggrin
कचा, कारे जागू, दिनेशदा, लाजो, मी आणि आमच्या सारख्यांच्या पोटावर आपलं लेखनावर पाय देतोय्स ?

घ्या काही सोपे पर्याय :

अंडे न घालता ही पाकृ करायची असेल तर कोणताही एग शांपू वापरू शकता.
तेल चालणार नसेल तर मोटारसायकलचे ऑईलही वापरता येईल
कांदे हे पाकृ पुर्ण झाल्यावर आलेल्या फिट नंतर शुध्दीवर आणण्यासाठी राखीव आहेत याची नोंद घ्यावी Proud

कचा,

>> तेल चालणार नसेल तर मोटारसायकलचे ऑईलही वापरता येईल

ताबडतोब अस्वाम्यक (डिसक्लेमर) टाका : फटफटीचे तेल पिऊन भलतीकडून फटफटा आवाज आल्यास आम्ही जबाबदार नाही.

आ.न.,
-गा.पै.

लेखाबद्दल बोलायचे झाल्यास अंड्याची अशी विटंबना नाही आवडली.
अंडे हाआपले राष्ट्रीय अन्नपदार्थ आहे याचे भान राखायला हवे होते.

पाककृतीबद्दल बोलायचे झाल्यास ना ही फसलेली पाककृती होती ना फसवी पाककृती होती तर हा साधारण कोंबड्याने अंडे द्यायचा प्रयत्न करण्यासारखा प्रकार होता.

काही कमी जास्त बोललो असेल तर चू.भू.दे.घे.
पण अंड्याबद्दल काहीही लिहिले की माझ्या शारीरीक भावना दुखावतात. Sad

पाककृती मध्ये हलवा लेखन. माझ्यासारखे जे फक्त पाककृती मधे जातात ते अशा महान पदार्थांपासून वंचित राहतात.

फसवी पाकृ का म्हणे? Uhoh

अंडे हा माझ्यासाठी अतिशय जिव्हाळ्याचा प्राणी, पक्षी, नाव, गाव, फूल सर्व काही आहे. Happy भुर्जी सोडून अंड्याचा (माबो आयडी 'अंड्या' नव्हे! Proud ) प्रत्येक प्रकार मला प्रिय आहे. Happy

पण अंड्याबद्दल काहीही लिहिले की माझ्या शारीरीक भावना दुखावतात.
>>>
Rofl

व्हॉट अबाउट युर्स मानसिक भावना ?
>>>>>>>>

सर्वप्रथम तुमचे कौतुक आणि आभार.... जो तुम्ही हा विचार केलात की... अंड्यालाही मन असतं.. मन भरून आलं... हलके झाल्यावर तुमच्या प्रश्नाचे उत्तर शोधायचा प्रयत्न करेन.

अंड्याची माफी ????? उद्या दुग्ध्दजन्य पदार्थाबद्दल काही लिहीलं तर एखादी गाय येऊन म्हणेल माग माफी हे कसं जमायचं ? Wink

. जो तुम्ही हा विचार केलात की... अंड्यालाही मन असतं.. मन भरून आलं... >>>>>> जास्त इमोश्नल होउन हलु नकोस .......फुटशील Biggrin

Pages