वन डिश मील

Submitted by शर्मिला फडके on 14 March, 2010 - 23:54

वेळ वाचवणारे, हेल्दी आणि चवदार असे काही 'वन डिश मील' मेनू इथे लिहूयात. नव्या व जुन्या मायबोलीवरील आहारशास्त्राच्या ग्रूपमधे अन्यत्र लिहिले गेलेले असे पदार्थ एकत्र रहावेत हाच उद्देश आहे. पदार्थ आधी लिहिला न गेलेला असेल तर पाककृती लिहूयात नाहीतर शक्य असेल तिथे लिन्क देऊयात.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मिसळ पाव हा पण एक पौषटीक आणि पटकन होणारा पदार्थ आहे. मिसळीत मोड आलेले मठ, मुग, भिजवलेली कडधान्ये (घरात असतील ती सगळी) घालवीत. कमी तेलात मिसळ करवी. वरुन दही/ लिंबु, कांदा, टमाटा, कोथिंबीर घातली की झकास मिसळ तयार. होलमील / साध्या पावाबरोबर किंवा नुसती पण छान लागते

इडली, सांबार, चटणी

मिश्र कडधान्याची खिचडी ,दही

कमी तेलातील मिश्र पीठ वापरुन केलेले पराठे, सारणामधे वेगवेगळ्या भाज्या.

हॅपी मील्स फ्रॉम मामीज किचन:
१) पास्ता विथ सॉस
२) वरण/ आमटी/ सांबार/पातळ पिठले + भात एकाच बोल मध्ये मस्त गरम करायचे मायक्रोवेव मध्ये + १ चमचा तूप.
३) थालीपीठ/ पराठे+ दही
४) दहीभात+ किसलेले गाजर/ काकडी( भाताच्या ऐवजी बांबिनो शेवयापण दह्यात घालता येतात.)
५) काठी रोल. = पोळीत भाजी / खीमा/ चिकन फिलिन्ग भरून.
६) भाज्या घालून मूग डाळ/ तूर डाळ खिचडी.
७) खिमा पाव
८) चिकन/ मट्न बिर्यानी. मायक्रोवेव मध्ये केलेली. बिर्यानी लावून कामे उरकता येतात.
९) वरीचे तांदूळ व दाण्याची आमटी बोलमध्ये घालून मस्त गरम करून + एक चमचा तूप.
१०) मोठा बोलभर सलाड + दोन डिनर रोल्स./ मोठा बोल भर गरम थिक सूप. चिकन/ कॉर्न/ भाज्यांचे सूप/
टोमॅटो सूप विथ क्रुटॉन्स व डिनर रोल.

चिकन/ मट्न बिर्यानी. मायक्रोवेव मध्ये केलेली. बिर्यानी लावून कामे उरकता येतात. >>> मामी रेसिपि द्या ना Happy

माझ्या किचन मधे होणारे काही वन डिश मील्सः

पास्ता, सॉस विथ ग्रिल्ड भाज्या. किंवा एकत्र करुन वरुन थोडेसे ची़ज पसरून बेक्ड पास्ता.
मिक्स वेजीटेबल सूप आणि फ्रेंच रोल/ baguette.
मिक्स वेजीटेबल स्टुप (thick soup with shell/bowtie/penne pasta)
मेथीडाळभात + भरपूर लसणाची फोडणी
शिळा गुरगुट्या भात + भरपूर लसणाची फोडणी + सांडगी मिरच्या चुरुन
खुप भाज्या घालून पुलाव/उपमा

शिळा गुरगुट्या भात + भरपूर लसणाची फोडणी + सांडगी मिरच्या चुरुन>> काय बोललीस राणी. तुला खण नारळ.

जर नियमितपणे वन डिश मील करायचे असतील तर त्या मील मधे कार्ब, प्रोटीन, भाज्या हे घटक योग्य प्रमाणात असावेत. खिमा पाव मधे भाज्या ( फायबर) नाही, उपमा/पोहे या मधे फारसे प्रोटीन्स नाहीत. अर्थात खिमा पाव बरोबर काकडी टॉमेटॉची को भरपूर खाता येईल, उपमा/पोहे या बरोबर शेंगदाणे खाता येतील.

दक्षिण युरोपातले स्टु, कॅसेरोलचे प्रकार, लुइझियाना भागातला गम्बो हे प्रकार वन डिश मील म्हणुन एकदम सोयीचे. जरा सवडिने लिहिते रेसिपीज

आपल्याकडे सकाळी सकाळी, फळे, कोशिंबीरी खायची पद्धत नाही. पण रोज सकाळी एखादे फळ वा सुका मेवा खाणे चांगले. चालत असेल तर कच्चा कांदा व लसूणही हवा. (कांदा, काकडी, दाणे घालून केलेली भेळ पण चांगला आहार आहे )

१. भाकरकाला - त्यावर चुरचुरीत लाल मिरच्यांची फोडणी व सोबत तळलेली सांडगी मिरची!
२. दहीभात : त्यात आवडीप्रमाणे द्राक्षे, डाळिंबाचे दाणे, काकडी, हिरवी मिरची, भिजलेले दाणे इत्यादी घालून वरून लाल मिरची, उडीद डाळीची फोडणी. सोबत रसातील मिरची/ ओल्या हळदीचं लोणचं/ तळलेली सांडगामिरची.
३. पुरणपोळी कुस्करून + दूध + तूप
४. वेगवेगळ्या भाज्या (काकडी, कांदा, टोमॅटो, गाजर, कैरी, ओलं खोबरं, हिरव्या मिरच्या इ.इ.) घालून केलेले दडपे पोहे.
५. मसूर भात/ मसूर पुलाव : ह्यातही बटाटा, टोमॅटो, कांदा इ. भाज्या असतात. अतिशय पोटभरीचा होतो.
६. पोंगल भात, वेगवेगळ्या प्रकारच्या डाळ खिचड्या (जसे तूर डाळ खिचडी, मूग डाळ खिचडी, कडधान्ये घालून, भाज्या घालून केलेली खिचडी वगैरे), चित्रान्न, लेमन राईस.
७. फोडणीची पोळी व फोडणीचा भात, सोबत सुमधुर ताक! Happy
८. गोट्या/ गुरगुट्या भात, तूप, मेतकूट, सोबत मिरगुंडं/ पोह्याचे पापड, आमसुलाचं सार.
९. सांजोर्‍या + दूध + तूप

वा, मस्त कलेक्शन होतय ईथे, माझे २ आणे Happy

१>मिश्र पिठांची धिरडी वेगवेग्ळ्या भाज्या घालून + व्हीट ब्रेड
२>मी अवोकॅडो आणुन घरी ग्वाकमोले बनवुन ठेवते वीकेंडला, ऑफीस वरुन यायला उशीर झाला तर आल्यावर पटकन व्हीट ब्रेड + ग्वाकमोले + सॅलड अस डीनर
३>रगडा पॅटीस
४>भाज्या , मोड आलेली कडधान्ये घालुन भेळ
५>भाज्या घालून नूडल्स, पास्ता, पुलाव

अरे इथे एक धागा होता पूर्वी. मला आवडणारे पदार्थ मला असे खायला आवडतात असंच काहीतरी. तो शोधा बुवा .फारच लाळगाळ्या बीबी होता तो..... Happy

तांदुळाच्या पीठात टोमॅटो, कांदा, कोथिंबिर, मिरच्यांचे बारिक काप घालून, नॉनस्टिक मधे किंचित जाडसर पसरवले तर २-३ धिरड्यात पोट सहज भरेल. सोबतीला वेळ असेल तर ओल्या खोबर्‍याची चटणी किंवा टोमॅटो सॉस धावेल. Happy

१. धपाटे, सोबत कैरीची चटणी किंवा वर्‍हाडी ठेचा, दही.

२. साधा भात/ पुलाव/ जिरा राईस व धानसाक - धानसाकमध्ये डाळी व भाज्या येतात त्यामुळे पोटभर व पौष्टिक.

३. बेकडिश/ बेक्ड व्हेजिटेबल्स आणि व्हीट ब्रेड.

४. कणकेचे मुटके/ दिंड, तूप. किंवा कणकेचे खरपूस भाजलेले रोटले व तूप. (देशी पिझ्झा)

५. मिश्र पीठांची धिरडी/ डोसे --- सर्वात मस्त मोड आलेल्या हिरव्या मुगाचा डोसा. अतिशय पौष्टिक व पोटभरू. सोबत खोबरे/ दाण्याची/ पंढरपुरी डाळ्याची चटणी.

६. मला ह्या पदार्थाचे नाव माहित नाही, पण मराठवाड्यात करतात.... शिळ्या भाकरीच्या चुर्‍यात चिरलेला कांदा, मीठ, हवा असल्यास मसाला, वरून चुरचुरीत लसणाची फोडणी. टेस्टी!

७. साबुदाण्याचं बोंदगं - खिचडी करतो तसंच, पण जास्त पाणी घालून त्याला शिजवायचं, पातळसरच ठेवायचं, त्यात ताक घालायचं शिजत असतानाच, दाण्याचं कूट अगदी कमी घातलं तरी चालतं आणि अशी ही पातळसर खिचडी म्हणजे बोंदगं. गरम - गार दोन्ही छान लागते. ताकामुळे वेगळी चव येते आणि ज्यांना पदार्थ चावणे म्हणजे घोर कष्टाचे काम वाटते त्यांना अतिशय छान! Happy साबुदाणा आधी कोरडा भाजून गार झाल्यावर भिजवला की मस्त फुलून येतो.

गम्बो :

थोडे ऑल पर्पझ पीठ ( मैदा) ऑलिव्ह ऑइल किंवा लोण्यावर मंद आचेवर खरपूस परतू घ्यावे ( दोन्हीचं प्रमाण सारखंच ) . इथे चित्रात पेनीच्या रंगावर यायला पहिजे असं दाखवतात. फुग्या मिरच्यांचे तुकडे , गाजराचे चौकोनी तुकडे, कांद्याचे तुकडे, मिळत असल्यास सेलेरी चे तुकडे घालून दोन मिनिटे परतावे. मग ओरेगनो / थाइम व मिरपुड घालावी. कॅन मधले क्रश्ड टॉमेटॉ बारीक चिरून घालावेत. चिकन स्टॉक / व्हेज स्टॉक / पाणी घालावे. मग शिजलेले चिकनचे ( बोनलेस ) लहान तुकडे, भेंडीच्या चकत्या, आवडत / चालत / मिळत असल्यास स्मोक्ड सॉसेजचे तुकडे घालावेत . मीठ चवी प्रमाणे. फार पातळ करू नये. भाज्या शिजल्या की एका बोलमधे थोडा भात घालून त्यावर हे घालून खावे.

माझे आवडते वन डिश मीलः
पावभाजी
पास्ता,हवं असल्यास, घरात असल्यास सॅलड
सँडविचेस
दही भात्/बागला भात
पराठा, दही,
साबुदाणा खिचडी बरोबर दही किंवा काकडी कोशिंबीर
फोडणीची पोळी
हिरव्या सालीसकट मुगडाळीची धिरडी
आणि हल्ली रात्री बर्‍याचदा हिरव्या सालीसकट मुगडाळीचं सूप- हेच पोटभरीचं होतं.

माझे सध्याचे आवडते म्हणजे "पोळीचा शाकाहारी कसेदीया/डिया, लो-फॅट चीज व रंगबिरंगी भोपळी मिरच्या,गाजर,पालक,कोथिंबीर घालुन"... मस्स्स्स्त लागते.

नेहमीनेहमी नाही पण कधीतरी करते ते म्हणजे 'ब्राऊन भाताचा भाज्या व थोडी काळी डाळ घालुन फ्राईड राईस व बरोबर एक उकडलेल अंडे'.

दलिया खिचडी - पिवळी मुगडाळ + मोड आलेले कोणतेही कडधान्य + भाज्या + थोडे दाणे घालुन.

साधी खिचडी करताना पण एखादी डाळ व मोड आलेले धान्य हे दोन्ही वापरुनच करते. बाजुला नवर्‍याला गाजरे , काकडी किसायला बसवते व कोशिंबीर करुन घेते. म्हणजे काय होते की, मी एकच डिश करते व एक त्याच्याकडुन करुन घेते.

हमार फेवरीट एंचलाडा, पाहिजे त्या भाज्या, बिन्स, चिकन, एंचलाडा सॉस घालुन स्लोकुकरमधे रात्री ठेऊन द्या. सकाली तयार. विकेंडला ब्रंचसाठी मस्त.

हो सिंड्रेला, मस्त चव आणि मस्त वास पण येतो. कोथिंबीर भाज्या परतल्या की शेवटी गॅस बंद करुन त्यावर नुसती पेरली तरी काम फत्ते.

Pages