अवांतर

ईंटरनेट सेवेविषयी माहिती हवी आहे

Submitted by अनन्या_न on 31 March, 2010 - 14:00

चेंबूर देवनार या भागात चांगला आणि किफायत्शीर केबलनेट किंवा ब्रॉड्बँण्ड सर्व्हिस प्रोव्हायडर या विषयी माहीती कुणी सांगू शकेल का? मला माझ्या घरगुती वापरासाठी ईंटरनेट घ्यायचे आहे. एमटीएनएलचे सर्व प्लॅनस चांगले आहेत पण त्यांची कस्टमर सर्व्हिस तितकिशी चांगली नाही असे ऐकले आहे आणि त्यांच्या सर्व प्लॅनस मध्ये लँड्लाईन घेणे बंधन्कारक आहे तसेच त्यांचे नेट रविवारी बंद ठेवतात हेही ऐकीवात आहे त्यामुळे ते नको आहे. यामुळे मला ईंटरनेटसाठी काही ईतर ऑप्शन्स आहेत का याची माहीती हवी होती.

विषय: 
शब्दखुणा: 

साथ

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

कोकणात भटकताना मनोहर मनसंतोष गडाच्या पायथ्याच्या शिवापूर गावी पोचले. जातच राह्यले. अश्याच एका शिवापूर भेटीत डागदराकडून घराकडे परत जाणारे हे आजोबा आजी भेटले.
आजोबांना आधार देत देत हळूहळू घरापर्यंत नेणार्‍या आजी, हात पाय सुजलेले आजोबा... घर बहुतेक गडकरवाडीच्या डोंगरात म्हणजे थोडा चढ मग वहाळ ओलांडायचा आणि मग एक छोटा पण खडा चढ संपवायचा की आलंच घर...
sath-01.jpg

विषय: 

इको यणचि, रावणवध, गूगल बुक्स वगैरे

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

आमच्या गुरुवारच्या संस्कृत वर्गामध्ये अष्टाध्यायीची काही सूत्रे एकत्र शिकण्याचा विचार सुरु होता. त्यादृष्टिने योग्य सामग्रीचा शोध आंतरजालावर करत होतो. पाणिनीकृत अष्टाध्यायी हा कोणत्याही व्याकरणावरचा सर्वोत्कृष्ट खजीना आहे याबद्दल दुमत असु नये. इको यणचि (6.1.77) हा त्याचाच एक सुंदर नमुना आहे. इको म्हणजे इक् म्हणजे इ, उ, ऋ, ऌ (माहेश्वर सूत्र 1 व 2) या नंतर जर अच् (म्हणजे स्वर - माहेश्वर सूत्र 1-4) आल्यास त्यांचा यण् (म्हणजे य, व, र, ट - सूत्र 5-6) होतो. उदा. दधि + अत्र = दध्यत्र, मधु + अत्र = मध्वत्र ई.

विषय: 
प्रकार: 

जगणे परंतु गमले नाही...

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

माझं मीपण हरवतंय का? मी स्वप्नात माझ्या मन:शांतीच्या मागे पळत राहते आणि दिवसा आयुष्याच्या. हल्लीची सकाळ फारशी ताजी, उत्साहवर्धक नसतेच. डोळे उघडायच्या आणि मेंदूचा पिसी पूर्ण बूट अप व्हायच्या आतच काय काय करायचं राहिलंय याची यादी मनात तयार व्हायला लागते. एकूणच आपण ठरवलं तसं काही घडत नाहीये किंवा त्यापेक्षा आपण त्यासाठी प्रयत्न करत नाहीये याचं टेन्शन येतं.

विषय: 
प्रकार: 

वक्तव्य स्वातंत्र

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

सध्या या विषयावर २-३ बाफांवर चर्चा सुरु आहे (होती). आज NPR वरील 'wait, wait ...' नामक कार्यक्रमात
'लास्ट सपर' या चीत्राच्या विविध आवृत्यांबद्दल चर्चा सुरु होती. (दा विंचीचे सर्वात प्रसिद्ध आहे, पण ५० का सत्तर लोकांनी असे चित्र बनविले आहे). तर काळाप्रमाणे या चित्रांमधील अन्नाचे प्रमाण वाढत गेले आहे असा निष्कर्श होता. या वरुन एक जण म्हणाला की पहा चित्रातील एक जण म्हणतो आहे (जास्त अन्नाकडे आणि ते खात असलेल्या येशु कडे पाहुन): 'आता जरा मोठा क्रुस लागणार'. उपस्थित सगळे हसले, आणि गाडी इतर विषयांकडे वळली ...

विषय: 
प्रकार: 

खिचडी

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

मी त्या दिवशी खूप आनंदात होत्ये. प्रमोशन झालं होतं, त्यामुळे आमचं विमान एकदम हवेत तरंगत होतं. शनिवार आला आणि मी आईबाबां मागे भुणभूण लावली माझ्याबरोबर लंचला यायला. पपांना काम होतं मग आई फक्त शॉपिंगला तयार झाली, लवकर येऊ- या अटीवर. हेही नसे थोडके! थेट सिकिंदराबाद गाठले. हा ड्रेस, तो ड्रेस मग हिच्यासाठी, तो शर्ट दादासाठी करत 'पार्कलेन' आणि किरकोळ खरेदीसाठी 'जनरल बजार' पालथं घालून झालं. एव्हाना खूप उशीर झाला म्हणून आईला बळेबळे 'उत्सव'ला नेलं. ते कसं छान शाकाहारी आहे, मग फेस्टिवल्स चालु असतात, बेबी कॉर्न मसाला इथे छान मिळतो वगेरे वगेरे माझी टकळी चालुच होती.

विषय: 
प्रकार: 

वेगे वेगे धावू...

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

इथे अमेरीकेत कुठल्याही प्रकारच्या हवामानात एखादातरी उत्साही कानात हेडफोन लावून पळताना दिसतोच. जर हवा चांगली असेल तर पळण्याजोग्या जागी अगदी झुंबड उडालेली दिसते. तरूण लोकं, बाया-बापे, त्यांची पोरं-टोरं आणि अगदी त्यांची कुत्री-मांजरी सुध्दा पळत असतात ! भारतात पळण्याचं प्रमाण त्यामानाने इतकं दिसत नाही. "रोज सकाळी उठून जॉगिंगला जायचं" हा माझ्याप्रमाणेच कित्येक जणांच्या बाबतीत अनेक नववर्ष संकल्पांपैकी एक असतो ! लहानपणापासून 'धावणे' ह्या प्रकाराचं मला अजिबातच आकर्षण नव्हतं. शाळेमधल्या १०० मिटर वगैरे सारख्या शर्यतींमधे कधी विशेष उत्साहं नव्हता कारण तितकं वेगाने धावता यायचं नाही.

विषय: 
प्रकार: 

आग अन धुर!

Submitted by चंपक on 24 March, 2010 - 23:44

काही घटना:

१) नुकतीच नगर जिल्ह्यातील एका कारखान्यत अनेक कोटींची साखर चोरी गेली. कालांतराने काही चोर पकडले. सुत्रधार अजुन मोकाट आहे.
२) एका सहकारी कारखान्याच्या संचालकाच्या खाजगी मालकीची 'सहकारी' कापुस प्रक्रिया संस्था आवारात आग लागुन पाच लाखाचा कापुस जळाला. काही दिवसापुर्वी साखर कारखान्याच्या निवडणुका होत्या.
३) नुकतेच एका आमदाराच्या 'मालकी'च्या सहकारी कारखान्याच्या गोदामात आग लागुन २० कोटी ची साखर जळाली.

शब्दखुणा: 

"वाचलो रे भावा!"

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

कालच्या रविवारी घरी भावाला फोन केला होता.

तो म्हणे, "वाचलो रे भावा!"

मी विचारले,"काय झाले..?"

तो.."दुपारच्या सुटीत रानातील वस्तीवरच्या घरी झोपलो होतो. एक नागराज उशाला येउन बसले.:) बाहेरुन वहिनी आल्या तो जाम घाबरल्या. वहिनींच्या पायाच्या आवाजाने नागराजाने फना काढला..... नशीब भावाने झोपेत हालचाल केली नाही. जाग आली तेंव्हा मग एक क्षणात दुर उडी मारली.....मग नागराजांना समाधिस्त केले गेले!"

***

विषय: 
प्रकार: 

माझी हॉस्पीटल भरती

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

त्या दिवशी मला अचानक भोवळ आली. कदाचित बजेट सेशन लाईव्ह पाहील्यामुळे असेल किंवा राहुल महाजन च स्वयंवर (त्याच स्वयंवर आणि त्याच्या भावी वधूचा स्वयंवध) पाहील्यामूळे असेल. पण आली खरी. सौ ने घाबरून लगेच फॅमीली डॉक्टरला फोन केला आणि सरळ हास्पीटलचा रस्ता धरला.

विषय: 
प्रकार: 

Pages

Subscribe to RSS - अवांतर