ईंटरनेट सेवेविषयी माहिती हवी आहे

Submitted by अनन्या_न on 31 March, 2010 - 14:00

चेंबूर देवनार या भागात चांगला आणि किफायत्शीर केबलनेट किंवा ब्रॉड्बँण्ड सर्व्हिस प्रोव्हायडर या विषयी माहीती कुणी सांगू शकेल का? मला माझ्या घरगुती वापरासाठी ईंटरनेट घ्यायचे आहे. एमटीएनएलचे सर्व प्लॅनस चांगले आहेत पण त्यांची कस्टमर सर्व्हिस तितकिशी चांगली नाही असे ऐकले आहे आणि त्यांच्या सर्व प्लॅनस मध्ये लँड्लाईन घेणे बंधन्कारक आहे तसेच त्यांचे नेट रविवारी बंद ठेवतात हेही ऐकीवात आहे त्यामुळे ते नको आहे. यामुळे मला ईंटरनेटसाठी काही ईतर ऑप्शन्स आहेत का याची माहीती हवी होती.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आम्ही तरी एमटीएनएलच ट्रायबँडच वापरतो देशात असताना.. लँड लाइन जरुरी आहे हे खरय पण बाकी कशाचा त्रास नाही झाला कधी. रविवारी बंद असत ही माहिती मात्र चुकिची आहे.

सिफी पहा. http://broadband.sify.com/ चेंबुरला आम्ही वापरलेल काही वर्ष.

मला सध्या ऑस्ट्रेलियात भयानक अनुभव येतो आहे. गेले दीड महिना मी लॅप्टॉप घेउन बसलोय, अन घरी कधी इंटरनेट जोडले जातेय त्याची वात बघतोय.
टीपीजी, आयआनेट, स्पेसनेट, कॉमसेन, ऑप्टुस, विर्जीन, अन शेवटी टेल्स्त्रा कडे नोंद केली आहे. होप हि एक दोन आठवड्यात नेट मिळेल.

भारतात बरे होते, रिलाय्न्स चा एक वायरलेस मोडेम खिशात घालुन फिरायचो अन वाटेल तिथे नेट मिळायचे!

अमृता धन्यवाद, मी फोन करुन बघते. त्यांचा स्पीड आणि सुविधा वगैरे ठीक आहे का?
>>>रविवारी बंद असत ही माहिती मात्र चुकिची आहे>> पण सध्या ट्रायबँड वापरत असणार्‍या माझ्या ओळखीच्या एकांनीच मला ही माहिती दिलीय. की ठराविक भागात अस करतात असं काही आहे का?
चंपक रिलायन्सचे ते एक ठीक आहे पण त्यांचे मासिक शुल्क मला जरा जास्त वाटतायत.
म्हणजे पूर्वी मी 'यू टेलिकॉम' चे ब्रॉड्बँड वापरले होते. ते खूपच चांगले होते. मुख्य म्हणजे ते स्वस्त आणि ग्राहकसेवाही चांगली होती. अनलिमिटेड वापरासाठी ४५० रु पासून त्यांचे प्लॅन्स आहेत. आणि स्पीड पण चांगला होता. पण आता देवनारला त्यांची अव्हेलिबिलिटी नसल्याने पंचाईत झाली आहे. Sad

एमटीएनएलच ट्रायबँडच उत्तम आहे. फक्त मोडेम एमटीएनएलचेच घ्या. बाहेरुन विकत आणलेल्या मोडेमसाठी ग्राहकसेवा तितकीशी बरी नाहीये. तरीदेखील बाहेरुनच विकत घेणार असाल तर डिलिन्क चे घ्या. डिलिन्क मोडेम एमटीएनएल वाले मोठ्या प्रमाणावर वापरत असल्यामुळे रिमोट सपोर्ट (ऑनलाईन सपोर्ट) बरा मिळतो. इतर कम्पनीचे मोडेम घ्याल तर पश्चाताप करण्याची पाळी येईल. (जर तुम्ही संगणक तज्ञ असाल तर हरकत नाही.)

>>>रविवारी बंद असत ही माहिती मात्र चुकिची आहे>>

चांगले बजेट असेल तर शक्यतो अनलिमिटेड प्लान घ्या. २०० एमबी / ४०० एमबी प्लान च्या नादी लागलात तर मासीक देयक आल्यावर डोळे पांढरे होण्याची शक्यता अधिक !!! (इतना युज कैसे हुआ पता ही नही चला !)

ग्राहक सुविधा आता बरीचशी सुधारली आहे. अगदी रविवारी देखील घरी येऊन तक्रार निवारण केल्याची उदाहरणे आहेत. (ग्राहक सेवा नंबरावर चक्क उत्तम मराठीत देखील मार्गदर्शन मिळते.)

एकापेक्शा जास्त संगणकावर देखील वापरू शकता.
-----------------------------------------------------------
केबलनेट तुम्हाला एकापेक्शा जास्त पर्याय देऊ शकतात.
एकापेक्शा जास्त संगणकावर वापरायचे असेल तर अगोदरच विचारुन घ्या.
-----------------------------------------------------------
रिलायन्स / टाटा वायरलेस चा पर्यायदेखील आहे. तसेच नुकतेच बाजारात आलेले तिकोना (www.tikona.in) देखील आहे.
-----------------------------------------------------------

रविवारच माहित नाही.. पण आमच्याकडे तरी बंद नसायच...

आम्ही आमचच मॉडेम आणलेल, डिलिंकचच होत. पण ग्राहक सेवेत त्याने काही फरक आम्हाला तरी जाणवला नव्हता. नंतर तर आम्ही वायरलेस मॉडेम पण वापरलेल.
स्पिड वगैरे ओके होत. देशात तसपण ऑनलाइन सिनेमे बघत नसल्याने आम्हाला तो ४०० एमबी वाला प्लॅन चालत होता. आपला युसेज पण वेळोवेळी बेवसाईट वर चेक करु शकतो. आपण जागरुक असलो तर डोळे पांढरे होण्याची वेळ कधीच येत नाही.

वापर जास्त असेल तर अनलिमिटेड घेतलेल बर.
हल्ली एक चांगला अनलिमिटेड प्लॅन आलाय अस ऐकलय पण त्याचा स्पिड कमी आहे बहुदा.

आम्ही आमचच मॉडेम आणलेल, डिलिंकचच होत. पण ग्राहक सेवेत त्याने काही फरक आम्हाला तरी जाणवला नव्हता. नंतर तर आम्ही वायरलेस मॉडेम पण वापरलेल. बरोबर आहे.

डिलिंकचे मॉडेमचा युजर इंटरफेस (मराठी शब्द आठवताना तोंडाला फेस आला बुवा !) एमटीएनएल च्या ग्राहक सेवा केंद्राकडे उपलब्ध असल्यामुळे "ह्या पानावर जा, तिथे ही सेटिंग बदला" हे मार्गदर्शन करणे त्यांना सोपे जाते. तेच जर का तुमच्याकडे नेटगिअर, लिंकसिस वा तत्सम मॉडेम असले तर हे ऑनलाईन सपोर्ट वाले गोंधळतात.
(मी घरी लिंकसिस चे वायरलेस मॉडेम आणले तर चक्क ते चालणार नाही म्हणाले. मी म्हणालो, "बाबारे, मला आयपी, डिएनएस इ. इ. दे, मी करीन स्वतः" गडी एकदम खुष झाला.)

वायरलेस मॉडेमचा वापर करणार असाल तर त्याच्या सुरक्षेकडे नीट लक्ष द्या. नाहीतर कोणीतरी तुमच्या कनेक्शनचा वापर करून भलतेच काहीतरी उद्योग करु शकेल. महत्वाचे म्हणजे मॉडेम एकदा व्यवस्थित चालू झाल्यावर त्याचे “Configuration Backup” घ्यावा आणी तो “Restore” कसा करायचा ते शिकून घ्या. भविष्यात कामाला येईल.

वायरलेस मॉडेमला परवलीचा शब्द असल्याने ती भिती नाहीये.
बाकी तुम्ही डिलिंक बद्दल सांगताय ते बरोबर आहे. mtnl वाले तेच मॉडेम वापरतात म्हणुन फरक पडत नसावा.

यम टी नाल बेस्त हाय !! कॉयपण प्रॉब्लेम नाय ! बाकीच्या प्रायवेट नेट सर्विस मध्ये नेहमीच याव न्या ट्याव कारणाने खंड असतो ~

आम्ही तर त्यांना मॉडेम बदलल्याच सांगितल पण नाही Proud घरात कॉम्पुटर एक्सपर्ट असले कि अस पण त्यांची फारशी गरज नसतेच.

वायरलेस मॉडेमला परवलीचा शब्द असल्याने ती भिती नाहीये. बरोबर आहे.

मात्र तो वापरला आहे आणि आपले कनेक्शन सुरक्षित आहे ह्याची खात्री करुन घ्यायला कधीही विसरु नका.

चंपक | मला सध्या ऑस्ट्रेलियात भयानक अनुभव येतो आहे. गेले दीड महिना मी लॅप्टॉप घेउन बसलोय, अन घरी कधी इंटरनेट जोडले जातेय त्याची वात बघतोय.

अरे बापरे, मग आपला भारत खरोखरच तंत्रज्ञानात प्रगती करतोय की काय !!!!!!!!

धन्यवाद राज आणि यो रॉक्स
>>इतना युज कैसे हुआ पता ही नही चला >> हो असं झालय खूप ओळखीच्यांकडे Happy
शक्यतो अनलिमिटेड प्लॅनच घ्यायचा आहे. तिकोना मध्ये चौकशी करुन झाली आम्च्या भागात त्यांची रेंज उपलब्ध नाही. Sad
अमृता सिफीला फोन केलाय बहुधा उद्या पर्यंत त्यांचा रिप्रेझेंटिटिव्ह येईल. रिलायन्स वायरलेसचा ३GB प्लॅन ६०० रु महिना हाही एक ठीक वाटलाय. नाहीतर शेवटी एम्टीएनएल. Happy
राजधर्म जर आपण मोडेम घेणार असू तर मोडेमची किंमत साधारण किती असते?

साधारण रु. १५००/- ते २३००/- मध्ये वेगवेगळे मॉडेम येतात. वायरलेस थोडे महाग असू शकेल. (एमटीएनएल वाले रु. ५०/- मासिक शुल्क आकारुन ते देतात. खुश असतील तर हे शुल्क माफ ही होऊ शकते.)
सिफी डायरेक्ट आहे की केबलवाल्यांच्या मदतीने चालतेय का ते शोधा. सुरुवातीस इन्स्टॉलेशन चार्ज (नॉन रिफंडेबल) म्हणून साधारण रु. १५००/- ते १७००/- आकारतात. तुमच्या केबल ऑपरेटरला विचारुन पहा.

जर मासिक शुल्क तुम्ही डायरेक्ट सिफीला देणार असाल (ऑनलाईन पे इ.) तर केबलचालक नाराज होतो. अडचणीच्या वेळी लवकर कामाला येत नाही.

रिलायन्स / टाटा वायरलेस घेणार असाल तर प्रथम डेमो मागा. तुमच्या भागात व्यवस्थीत नेटवर्क नसेल तर ब्रॉडबँडच्या एवजी १.एक्स (११० केबीपीएस) असा कमी वेग मिळेल.

तिकोना मध्ये चौकशी करुन झाली आम्च्या भागात त्यांची रेंज उपलब्ध नाही. >> जर रेंज नसेल तर तुमच्या इमारतीवर ते लोक एक रिसीवर बसवुन देतात (त्यांच्या खर्चाने) पण तुमच्याकडून विजेचा जोड द्यावा लागतो.

जर रेंज नसेल तर तुमच्या इमारतीवर ते लोक एक रिसीवर बसवुन देतात (त्यांच्या खर्चाने) पण तुमच्याकडून विजेचा जोड द्यावा लागतो.
पर्याय खर्चिक आहे. शिवाय त्या रिसिव्हर ला संदेश ग्रहणासाठी त्याच्याच सारखा एखादा मित्र जवळपास असावा लागतो.
शक्यतो वायरलेस तंत्रज्ञानापेक्षा वायर्ड तंत्रज्ञानावर आधारीत सेवा चांगली आहे.

एम ती एन एल चे माहीत नाही पण बी एस एन एल द बेस्ट. मात्र चालू असे पर्यन्त. बन्द पडले की रिझुम व्हायला त्रास होतो. म्हणजे बिल न भरल्याने डिसकनेक्ट झाल्यास पैसे भरले तरी लवकर चालू होत नाही. बाकी फेल्युअर रेट बराच कमी आहे. अनलिमिटेड प्लान साठी स्पीड कॅप केलेले असते लक्षात ठेवा. उदा. माझ्या ७५० रु. दरमहा च्या प्लानला २५-ते ३५ kBps लॉक आहे. म्हणजे यापेक्षा जास्त डाऊनलोड स्पीड मिळत नाही. १३५० रु. प्लानला ५५-६० कि. बाईट्साला लॉक आहे. मात्र २४ तास फ्री आहे.लिमिटेड प्लानला स्पीड प्रचन्ड मिळतो पण लिमिट कधी सम्पते कलत नाही आणि डोळे पांढरे होतात. कोणाला निव्वळ सर्फिन्ग, कोणाला डाऊन्लोडिंग असे यूज असतील त्याप्रमाणे प्लान निवडावेत. कारण सर्फिन्ग मध्ये पेग रिफ्रेश करताना अथवा फॉरवर्ड बॅकवर्ड पेज करतानाचे डाऊनलोड मोजले जाते त्यामुळे बिल लक्षात येत नाही हे लक्षात ठेवा. माझ्या मते बी एस एन एल चा ७५० प्लान सर्वोत्तम आहे. बी एस एन एलचे दर कमीही होण्याची शक्यता असते आणि ते इमानदारीने स्वतःहून कमी करतात. पूर्वी हा प्लान ९०० रु. होता. त्यानी मग तो ७५० स्वतः च केला आणि आपोआप तशी बिले येऊ लागली. सरकारी कर्मचारी अथवा विकलांगाना आणखी २० % सवलत आहे. आणखी काय पाहिजे. ? खाजगी कम्पन्या लुटण्यासाठीच आलेल्या आहेत तुमच्या भल्यासाठी नाहीत. त्यांचे बिलिन्ग लक्शात येत नाही.

मुंबई मधे मटेनिली बेस्ट!!! घरी टेलिफोन लाईन नसेल तर combo plan घ्या. अर्थात लाईन वरुन फोन करणे त्यात महाग पड्तं (१.२० पर मिनिट)!! पण एकदम मस्त सर्विस, मी चार वर्षं वापरतोय. त्यांचाच मॉडेम घ्या, सध्या ते डि-लिंक देत नाहीत, पण जे देतात त्यात built in 4 port switch आहे, तुम्ही आणखी तीन पिसी किंवा लॅपटॉप कनेक्ट करु शकता.

केबलवाल्याकडुन नेट घेऊ नका. बरेच वेळा बंद असते. शिवाय ते shared bandwidth देतात. आणि तुमचा पिसी आपल्या भागातल्या ईतर पिसींबरोबर जोडला जातो, त्यामुळे intrusion, virus ईत्यादी गोष्टींसाठी सांभाळावे लागेल. शिवाय पावसाळा सुरु झाला की त्यांचे स्विच विजेमुळे ऊडतात, त्यावेळी पिसीचे नेटवर्क कार्ड उडण्याची शक्यता असते. केबल मधे पाणी जाऊन ते देखिल पिसी मधे ओघळु शकते.

>>खाजगी कम्पन्या लुटण्यासाठीच आलेल्या आहेत तुमच्या भल्यासाठी नाहीत>> टोणगा, हे सरसकट लागू होत नाही. माझा यू टेलिकॉमचा अनुभव खूप्च चांगला होता. एकतर त्यांचे नवीन अनलिमिटेड प्लॅन्सच ४५० रु पासून चालू होतात. स्पीड १९२kbps ईतका तो पण ठीक कारण साधार्ण २० एमबी ईतकी फाईल ५ ते ७ मिनिटात डाउन्लोड होते. तसेच त्यांचा फेल्युअर रेट बराच कमी आहे. अजून एक म्हणजे त्यांच्या ऑनलाईन पेमेंट केले तर बिलावर ५% व ड्रॉप बॉक्स मधून केले तर २५रु. असे मासिक सवलत असतेच.:) माझे पूर्वी त्याम्चेच प्रीपेड आणि लिमिटेड होते तेव्हाही कधीकधी १०० एमबीफ्री वगैरे सवलती मिळायच्या. शिवाय मुख्य काहीही तक्रार केली असता साधारण तीन ते चार तासातच त्यांच्या ईंजिनिरचा फोन येतोच किंवा तो स्वतः घरी येतो आणि तक्रार निवारण केली जाते. त्यानंतर ही त्यांच्या मुख्य ऑफिसमधून फोन करुन विचारणा केली जाते की तक्रार निवारण झाले का? ई. या नंतरच्या सेवेसाठी मला तरी वाटतं यू टेलिकॉम एकदम बेस्ट आहे.

>>जर रेंज नसेल तर तुमच्या इमारतीवर ते लोक एक रिसीवर बसवुन देतात (त्यांच्या खर्चाने) पण तुमच्याकडून विजेचा जोड द्यावा लागतो. >> हो तो पर्याय त्यांनी सुचवला. पण आमची ईमारत नाहीय बंगला आहे. त्यामुळे सगळा विजेचा खर्च आम्च्या वरच येईल. आणि अश्या रिसीवर बसवण्यामुळे काही आजार वगैरेला निमंत्रण त्यामुळे घरचे बिलकुल तयर नाहीत.

राजधर्म, सिफीचे कनेक्शन केबलवाले पण देतात? ?? हे मला माहितच नव्हत. मी सिफीच्या कस्टमर केअर मध्ये फोन केला होता. मला त्यांनी इन्स्टॉलेशन आणि डिपॉझिट असे मिळून १०००रु सांगितले आहेत. पेमेंट मी ऑनलाईन्च करणार आहे किंवा आयसीआय्सीआय एटीमच्या ड्रॉप बॉक्स मध्ये हा पर्याय दिला आह.
रिलायन्सवाले डेमो पण देतात ही पण नवीन माहिती मिळाली. Happy

घरी टेलिफोन लाईन नसेल तर combo plan घ्या. अर्थात लाईन वरुन फोन करणे त्यात महाग पड्तं (१.२० पर मिनिट)! >> मी हल्लीच ह्या प्लॅनमध्ये परिवर्तन करुन घेतलेय.. नि कॉल्स म्हणाल तर सध्या मोबाईलच्या दुनियेत लँडलाईनचा वापर कमी होतो.. त्यामुळे हा प्लॅन मस्तय ! अनलिमिटेड !

केबलवाल्याकडुन नेट घेऊ नका. बरेच वेळा बंद असते. >> अनुमोदन Happy

यू टेलिकॉम पुण्यात आहे. ही बघा त्यांची साईट http://www.youbroadband.in/

सिफीवाल्यांचा अजूनपर्यंतही काही फोन आला नाही पुढची सेवा कशी देतील काही कळत नाही. Sad
बहुतेक रिलायन्स झिंदाबाद Happy

अनन्या रिलायन्सचे काहीही घेताना rimweb.com ही साईट वाचून घ्या. गेली अनेक वर्षे ही साईट केवळ रिलायन्सला शिव्या देत आहे पण रिलायन्समध्ये सुधारण नाही.

आम्ही सानपाड्याला असताना रिलायन्सचे नेटकनेक्ट घेतले होते. तूफान चालायचे. ऑनलाईन सिनेमे पण आरामात पाहता यायचे. अर्थात त्याचा प्लान जरा महागच आहे.

इथे रत्नागिरीमधे टाटा इंडिकॉमचे नेट घेतलय. बर्‍यापैकी स्लो आहे. पण ठिक आहे!!

बी एस एन एलने सुखद धक्का दिला आहे. अन्लिमिटेड प्लॅन (रु.७५०) चा वेग दुप्पट केला आहे. २५-३५ केबीपीएसला जे कॅपिंग होते ते आता ५०-७० केबीपीएस पर्यन्त नेले आहे तेही एकतर्फीच. कधी कधी ९० पर्यन्त स्पीड मिळून जातो.
बहुसंख्य व्हिडिओ क्लिप्स बफरिंग शिवाय डायरेक्ट स्ट्रीमिंगवर पहाता येतात...

पुण्यात BSNL च बेस्ट.
सेन्सेई, औंध भागात तुम्हांला भारत संचार नि. चं वायरलेस ब्रॉडबँड नक्कीच मिळेल. मी भारत संचार नि. चंच वायरलेस कनेक्शन धनकवडी सारख्या भागात वापरतोय... अन् स्पीड मस्तच...
पुण्यात यू टेलिकॉमचे कनेक्शन घेऊ नका. माझ्या कंपनीतल्या अनेकांना त्यांच्या वाईट सेवेचा फटका बसलाय. मुंबईत चालत असेल पण पुण्यात नाही. पुण्यात BSNL is the best!!

Pages