साथ

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

कोकणात भटकताना मनोहर मनसंतोष गडाच्या पायथ्याच्या शिवापूर गावी पोचले. जातच राह्यले. अश्याच एका शिवापूर भेटीत डागदराकडून घराकडे परत जाणारे हे आजोबा आजी भेटले.
आजोबांना आधार देत देत हळूहळू घरापर्यंत नेणार्‍या आजी, हात पाय सुजलेले आजोबा... घर बहुतेक गडकरवाडीच्या डोंगरात म्हणजे थोडा चढ मग वहाळ ओलांडायचा आणि मग एक छोटा पण खडा चढ संपवायचा की आलंच घर...
sath-01.jpg

सगळं कसं एकमेकांच्या साथीनं.. किती काय काय दिवस पाह्यले असणार त्यांनी. कित्ती वर्षं कुणास ठाऊक. आत्ताचेही दिवस कष्टाचे असतीलच की पण तरी डोक्यात जास्वंद का होईना माळण्याइतक्या आजी उत्साही होत्याच.

sath-02.jpg

ते दूर जाईपर्यंत, डोळ्यात आलेल्या पाण्यामुळे मला दिसेनासे होईपर्यंत मी त्यांच्याकडेच बघत राह्यले. हे असंच कायम रहावं अशी इच्छा करत आणि तोच आशिर्वाद त्यांच्याकडे मागत....

sath-03.jpg

- नी

विषय: 

कॅमेर्‍याचे चित्र अप्रतिम.
परस्पराना साथ ह्रदयस्पर्शी!

पण चित्रातील चित्र विदारक.

बहूतेक कोकणातला शेतकरीच असावा.

Pages