अस्वस्थ करणारं काही...

Submitted by मृण्मयी on 10 May, 2010 - 17:38

मिसळपावावर ह्या लिंक्स दिसल्या, बघितल्या आणि प्रचंड अस्वस्थ व्हायला झालंय.
http://www.youtube.com/watch?v=EwOecpMkHH0
http://www.youtube.com/watch?v=hWomaejpSkg&feature=related
http://www.youtube.com/watch?v=hG3i2EwSCGs&NR=1
http://www.youtube.com/watch?v=Djz5wiyYWl8&NR=1

मला स्वतःला सत्यसाईबाबांविषयी फारशी काही माहिती नाही, आणि भारतातल्या इतर 'देव-देवतुल्य किंवा संत-साधू-स्वामीं'विषयी देखिल नाही. जो काय कंटेंट ह्या व्हिडिओजमधे आहे, तो अत्यंत सेंसिटीव्ह असा विषय आहे. पटत असो वा नसो, कृपया त्याची तशाच प्रकारे दखल घेतली जावी.

एखादी भाविक विचारू शकेल, "ह्या व्हिडीओजच्या खरेपणाबद्दल काय खात्री आहे?" . खरंय, तुम्ही किंवा मी इथे बसून काहीच सांगू शकत नाही. पण कॅमेरासमोर येऊन स्वतःबाबत घडलेल्या अश्या भयानक प्रसंगांची कबुली कोणी उगाच, केवळ एखाद्याला बदनाम करायला देईल असं वाटत नाही. हे व्हिडीओजच नाहीत, तर अशा माणसांच्या दुष्कृत्यांचे पाढे वाचणारे लेख, बातम्या देखिल कुठेतरी असतील/आहेत.

निव्वळ चीड आणि वांझोटा संताप ह्यापलिकडे काय करू शकतो? कमीतकमी मायबोलीकरांपुढे ह्याबद्दल काही बोलल्या जाऊ शकतं. चर्चा घडू शकते. ह्या आणि अश्या भयानक माणसांच्या आहारी जाण्यापासून आपलं ओळखीचं, जिवाभावाचं कोणी परावृत्त केल्या जाऊ शकत असेल तर का नाही? एक सारासार बुध्दीने विचार करू शकणारी व्यक्ती म्हणून, एक आई, वडील, बहीण, भाऊ, मित्र, मैत्रीण म्हणून आपल्या सांन्निध्यात येणार्‍या, आणि अश्या व्यक्तींच्या आहारी जायला लागलेल्या आपल्या माणसांसाठी आपण काय करू शकतो? सेक्श्युअल अब्यूज हा व्हिक्टीमच्या कुठल्याही वयात कोणाहीकडून होऊ शकतो हे खरं, पण अश्या ग्लोरिफाइड व्यक्तीकडून तो होत राहिला तर थांबवयाचा कसा? सुरक्षा यंत्रणेचा भाग होऊन काही जमणं शक्य नाही, पण एका व्यक्तीला सावध करून बळी पडण्यापासून वाचवणं शक्य आहे असं वाटतं.

इथे कुणाच्याही श्रध्दांना, भक्तीला हास्यास्पद ठरवून खिल्ली उडवण्याचा सूर असणार्‍या गप्पा व्हाव्या या उद्देशानं हा धागा उघडलेला नाही. श्रध्दा किंवा अंधश्रध्दा म्हणजे काय अश्या चर्चा घडून याव्यात ही अपेक्षा नाही. डोळसपणे काय करता याईल ह्याबद्दल सगळ्यांनी बोलावं असं वाटतंय.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे सत्यसाईबाबा , अम्मा भगवान , आसारामबापु सगळे एका माळेचे मणी आहेत. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे लोक अगदी कल्पनेपलिकडे अशा लोकांवर श्रद्धा ठेवतात , त्यांच्यासाठी काहीही म्हणजे अक्षरशः काहीही करण्याची तयारी असते.

मी त्यानांच थोर मानतो जे दीनदुबळ्यांसाठी काहीतरी भरीव करतात , वेळप्रसंगी स्वतःच्या पोटाला चिमटा घेऊन भुकेल्यांना जेऊ घालतात.
बाकी सगळं थोतांड आहे.

लोकभावनेच्या दृष्टीने भक्ती अन श्रद्धा ह्या दोन खुपच नाजुक गोष्टी! ..... अंधश्रद्धा निर्मुलन विधेयक अजुन पटलावरही येउ न शकण्याचे ते एक कारण आहे.

विज्ञान क्षेत्रामध्ये, एखादी गोष्ट/ फॅक्ट/ घटणा/ कार्यकारणभाव हा १०० पैकी जरी फक्त एक जण खरे बोलत असेल अन बाकीचे ९९ लोक खोटे बोलत असतील तरी तो एक जण बोलतो तेच सत्य आहे, हे मान्य/सिद्ध होऊ शकते........... तसे लोकशाही मध्ये होत नाही. तिथे ९९ लोक खर्याचे बोल खोटे ठरवुन सत्य बोलणार्‍या एकाला खोटे पाडु शकतात! (वाक्य जमलय का?)

अशा आश्रमांमध्ये वावरणारे बाबालोक जापाने तंत्रज्ञांनी उघडे (शब्दशः नाही) पाडले होते. पण त्यांची आर्थिक अन राजकीय ताकत इतकी आहे, कि ते बाकी कश्याला जुमानत नाहीत.

काही दिवसांपूर्वी "सत्य साई -बाबा" नेमके कोण हे शोधत असताना ह्या लिंक्स पाहिल्या. पण सगळेच त्याच्या आहारी गेले म्हंटल्यावर त्याच्याविरोधात कारवाही तरी कोण करणार? आणि लोकांच्या श्रद्धेचे म्हणायचे झाले तर "सामान्य माणूस" रोजच्या लढाया करून इतका थकलेला असतो कि कधीतरी अश्या चमत्काराच्या आहारी जातो. काही लोकांना त्यातील फोलपणा कळतो तर काहीना कळतदेखील नाही. आपण आपल्याला काय पटतंय ते बघून निर्णय घाव हेच योग्य..असे मला वाटते..

अहो खुद्द महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या सरकारी निवास स्थानी ह्यांची पुजा केली होती.....

मला कुठलाही बाबा, स्वामी बद्दल चिडच येते... भोळ्या समाजाला मस्तपैकी गंडवत असतात, पैकी खोटेबाबा तळपायाची आग मस्तकात नेतात.

मी मागच्या आठवड्यात BBC http://news.bbc.co.uk/2/hi/south_asia/3236118.stm वर तसेच इतरत्र कुठे तरी वाचले. DRDO च्या शास्त्रज्ञांनी पण कडक नजर ठेवली होती... आश्चर्य, अचंबीत वाटले. अन्न, पाण्या विना अनेक दशके (??) रहाण्याच्या ह्या प्रकारात किती तथ्य आहे ?

हे असे काही पाहुन , वाचुन ऐकुन्च भयंकर चीड येते. लोकाना कळत कसे नाही ? ज्ञानेश्वर , तुकाराम , सावता माळी , संत सखु , साईबाबा , गाडगेबाबा ई. अनेक संत होउन गेले , त्यापैकी कोणीही श्रीमंत सोडाच पण थोडीसुद्धा संपत्ती जवळ बाळगुन नव्हते. त्यांना लौकिकार्थाने कफल्लकच म्हणावे लागेल. असे असताना सध्याच्या या मिळतीले तेव्हढे पैसे लाटणार्‍या आणि सतत स्वतःच्या संपत्तीचे प्रदर्शन करणार्‍या बाबा , महाराजांकडे लोक जातातच कसे?
जे लोक अध्यात्मात पैसा आणतात ( पैशाच्या जोरावर अध्यत्म विकतात असे म्हणायला हवे ) ते खरे अध्यात्मिक कसे काय असु शकतात ? ( माझे या विषयातले ज्ञान शुन्य आहे , तरी यातला बेसिक फंडा हा लोकाकडुन कोणतेही पैसे न घेता त्याना अध्यत्मिक ज्ञान देणे हा असावा असे वाटते. )
वरती उल्लेख केलेल्या संतांप्रमाणे कफल्लक आयुष्य जगणारा बाबा , महाराज किंवा माता माझ्या पहाण्यात तरी नाही.

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/7323538.cms
जय हो !प्रगतीपथावर जाईल पुरोगामी महाराष्ट्र अश्याने ....असो !काय फरक पडणार आहे स्त्रियांचे प्रमाण कमी झाल्याने?.. नाही तरी समलैंगिक संबंधाना मान्यता देतच आहे आपला पुरोगामी समाज..... चांगला आहे धंदा.....स्त्री हि जननी ,अनंत काळची माता वगैरे आहे हे सगळे बोलण्यापुरतेच ....पण आज स्त्रियांनाच आपला वंश पुढे चालवण्यासाठी पुत्र हवा असतो मग भले तो म्हातारपणी लाथा का घालेनात?.......अजून १००० वर्षे तरी भारतिय समाज या संकुचित विचारसरणीतुन बाहेर येणार नाही हेच खरे!