हॅपी मदर्स डे!

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

मायबोलीवरच्या समस्त मातांना आणि समस्त मायबोलीकरांच्या मातांना मातृदिनाच्या शुभेच्छा! Happy

आजच एक व्हिडिओ पाहिला.-
कॉस्ट ऑफ मदर्स डे

इथे अमेरिकेत साजर्‍या होणार्‍या मदर्स डे बाबत इन्टरेस्टिन्ग माहिती आहे. अमेरिकेत सुमारे ८३ मिलियन आया आहेत. त्यांच्यासाठी १९,००० फुलांच्या दुकानातून १.९ बिलियन डॉलर्सची फुलांची खरेदी होते. २.५ बिलियन ज्वेलरी आणि भेटींवर तसंच बहुतेकजण आज बाहेर जेवतात त्यावर २.९ बिलियन डॉलर्स खर्च करतात. विंटर हॉलिडे (ख्रिसमस) च्या खालोखाल हा सर्वात खर्चिक हॉलिडे आहे! Go Moms!!

माझ्यातर्फे ही काही फुले...
हॅपी मदर्स डे!! Happy

kali3.jpgkali2.jpgfikapink.jpgkamlrose.jpgface.jpgrose2.jpgpink2.jpgred2.jpgredrose.jpgyellow1.jpgpakalya.jpg

विषय: 

सुंदर फोटो लालू.. खासच.

इथे 'मदर्स डे' पेक्षा 'मातृदिनाचं' महत्व जास्त असतं. पिठोरी अमावास्येला हा मातृदिन साजरा केला जातो. आम्ही शाळेत असताना दरवर्षी पिठोरी अमावास्येला मातृदिनाची महत्व स्वत: मुख्याध्यापक आम्हाला सांगत असत. एक छान गोष्टही (दरवर्षी तीच असली तरी त्यावेळी खूप आवडायची) सांगत असत. मग आम्हाला एका पुडीतून नानकटाईचा खाऊ मिळत असे. आणि हा खाऊ घरी जाऊन 'आई-बाबांना' द्या आणि वाकून नमस्कार करा असंही सांगितलं जात असे. हे आणि असे शाळेतून मिळालेले अनेक संस्कार आजही लक्षात राहतात आणि त्या त्या दिवशी आठवण होतेच. शेवटी शाळा ही सुद्धा आपली आईच. आणि आमची शाळा खरोखरच आईसारखा जिव्हाळा वाटावा अशीच होती. Happy

शाळेत असताना बहिण वहीवर एक सुविचार लिहायची. त्यातील ओळी वर-खाली करुन मी लिहितो आहे:

झाडाची शोभा फुले,
वहिची शोभा हस्ताक्षरे
तर आईची शोभा मुले!

<<पिठोरी अमावास्येला हा मातृदिन साजरा केला जातो >>
अरे हे मातॄदिनाबद्दल माहिती नव्हते. पिठोरी अमावस्येला म्हणजे कधी ? याबद्दल आणखी माहिती सांगाल का ? (याच दिवशी का, कसा सुरु झाला ई. )