मातृदिन (मदर्स डे, ९ मे २०१०) प्रिय आईस..

Submitted by संयोजक_संयुक्ता on 8 May, 2010 - 23:12

mother_child_resin.jpg
लहान मुलांनी या निमित्ताने केलेले लेखन, हस्तकला, चित्रकला पोस्ट करण्यासाठी हा धागा.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सर्वाना 'मदर्स डे 'च्या शुभेच्छा!
माझ्या मुलिने काढलेले मदर्सचे डे चे चित्र
माध्यमः क्रेयोला मार्कर्स.

Picture 106.jpg

माझ्या मुलीने मदर्स डे करता शाळेत सिरॅमिक वापरुन बनवलेला फिश बोल / डिशmother's day 001 small.jpgmother's day 002 small.jpg

(' मी ह्यावर खूप मेहनत केलेली आहे, तेव्हा गेल्या वर्षीसारखं कचर्‍यात टाकू नकोस' अशी ताकीदही मिळालेली आहे)

सही आहे चित्रं, फोटो आणि फिशडिश!
>>' मी ह्यावर खूप मेहनत केलेली आहे, तेव्हा गेल्या वर्षीसारखं कचर्‍यात टाकू नकोस'
सायो Happy

ही माझ्या लेकीने केलेली कविता आणि सोबत शाळेत केलेला फुलांचा बुके होता.

Mom it's your lucky day
So I hope happiness comes your way
You can sleep as long as it's the best
while we take care of the rest!
-Jui

100_2919.jpg

हे ईशानने गेल्या तीन वर्षात मदर्स डे निमित्त दिलेले गिफ्ट्स. छोटा पॉट आणि हॅपी फेस त्याने स्वतः रंगवला आहे. बाकी सगळ्यात टीचरचा हात जास्त Happy मी सगळ्या गिफ्टचे फोटो काढून त्याचा कोलाज केला आहे.

वाव काय छान छान गोष्टी केल्या आहेत सगळ्यांनी.
मोदक तुमची पोझ मस्त. बाळपण काय गोडुल आहे.
सिंडरेला तुझी कल्पना मस्त आहे कोलाज करायची. मेमेरीज..
सायो, खुप छान केलाय तीने बोल. रंग पण मस्त.
प्राजक्ता, लेकीने आई आणि मुलगी गोड काढलीए एकदम.
अमृता, जुईची कविता एकदम भारी. यमक वगैरेपण जुळवलय.

प्राजक्ता, त्या तुम्ही दोघी वाटतं. Happy मोदक, बाळ गोड आहे! सगळ्यांच्या भेटी मस्त. जपून ठेवा.

राहुल केजीपर्यंतच्या शाळेत मदर्स डे जोरात साजरा व्हायचा. 'मदर्स डे टी' निमित्ताने केजीत असताना त्यांच्या वर्गात मॅनिक्युअर, पेडिक्युअर, मसाज सेंटर्स केली होती. मुलंच स्क्रब, लोशन्स वगैरे लावत होती. छोट्या बॅटरी ऑपरेटेड मसाजर्सने मसाज इ. मग हे झाल्यावर टी पार्टी. त्यासाठी प्रत्येकाने मेनू कार्ड बनवले होते. आपल्या आईकडून ऑर्डर घ्यायची आणि ते सर्व्ह करायचे. चहा मात्र आम्हीच करुन घ्यायचा होता. गरम पाणी सांडासांड नको म्हणून. मेनूमध्ये काकडी, चिकन सँडविचेस, फ्रूट्स, स्कोन्स इ. गोष्टी होत्या. राहुलने मला स्कोन्स छान आहेत, ते घे (आणि तुला नाही आवडले तर मला दे) असे सुचवले होते. Happy
त्याने बनवलेले मेनू कार्ड मी ठेवले आहे. त्याचे हे कव्हर-

menucard.jpg

अमृता, जुईने कविता काय सुंदर केली आहे गं. फारच छान.. मायबोलीची पुढची पिढी तयार होतेय. Happy

बाकीही सगळ्यांची क्रिएटिव्हिटी अगदी सुपर्ब!!

मस्त आहेत गं चित्र प्राजक्ता! .... कलाकार आहे तुझी सुकन्या..... आमच्या पिल्लुला पण असे काही तरी करायला शिकवु आम्ही .... तो मोठा झाल्यावर..... Happy

आमच्या पिल्लुला पण असे काही तरी करायला शिकवु आम्ही .... तो मोठा झाल्यावर.....

नवरा, माझी चित्रकला अगम्य आहे Happy त्यामुळे माझ्याकडून expect करू नकोस बरं का??? आपण त्यापेक्षा त्याला चित्रकलेच्या class ला टाकू........... कसं ???? Uhoh

चालेल.... तू म्हणशील तसं...... सगळे नवरे असंच म्हणतात..... Happy करतील तरी काय बापडे तुम्हा बायकां समोर......

सुंदर कलाकृती. मोदक, बाळ क्युट आहे. अमृता, खूप छान आहे गं कविता.
सिंडी, छान छान भेट आहे तुझी. सायो, माझ्या आईने मी तिच्यावर लहानपणी केलेल्या कविता अजूनही जपून ठेवल्यात. Happy
लालु, कार्ड सुंदर आहे. मसाज सेंटर आणि टी पार्टीची आयडीया भारी आहे!

इथल्या सर्वच आयाचं कौतुक. Happy मोदक बाळ गोड आहे. आणि फोटूची आयडिया भारी आहे.

लालू, ते मेनू कार्ड किती मस्त वाटतय. सिंडे, अमृता मस्त. Happy

Pages