मायबोलीकर यूट्युबर्स - ऋन्मेऽऽष

Submitted by ऋन्मेऽऽष on 18 February, 2023 - 10:56

--------------
मायबोलीवर एखादा लेख वा कथा प्रकाशित करताच लेखकाच्या मनात नकळत एक काऊंट सुरू होतो. आपले लिखाण किती लोकांनी वाचले, किती प्रतिसाद आले हे आपण मोजू लागतो. मग आपण कितीही स्वानंदासाठी लिहितो असे वरवर म्हटले तरी लिहिलेले चार लोकांनी, किंबहुना जास्तीत जास्त लोकांनी वाचावे अशी मनोमन ईच्छा असतेच.

सोशलसाईटवर एखादा फोटो वा विडिओ अपलोड करतानाही मनात हेच असते. फेसबूकसारख्या पर्सनल अकाऊंटवर आपण आपल्या लग्नाचा फोटो टाकला तरी त्याला शे-दोनशे लाईक येतात. फ्रेंडलिस्टीत हजारो मित्र असतील तर हजारही येतात. पण तेच तुम्ही आपल्या लग्नाचा विडिओ युट्यूबवर अपलोड केला तर तो बघण्यात कोणालाही ईंटरेस्ट नसेल. मी तर कधी आलिया-रणवीर आणि दिपिका-रणबीर यांच्या लग्नाचे विडिओही बघायला गेलो नाही. पण त्यांच्या चाहत्यांनी कौतुकाने बघितलाही असेल.

तर, सांगायचा मुद्दा हा की ईथे कुठलाही विडिओ जास्तीत जास्त लोकांनी बघावा, पुन्हा पुन्हा बघावा, आणि लाईक करावा यासाठी तो तसाच स्पेशल असणे गरजेचे असते.

आजच्या काळात आपले युट्यूब चॅनेल कोणीही उघडू शकतो. मध्यंतरी कित्येक मायबोलीकरांनी आपापल्या युट्यूब चॅनेलची माहिती ईथे दिली होती. पण तसे चॅनेल उघडायला तशीच काहीतरी कला अंगात असणे गरजेचे. जी माझ्यात बिलकुल नसल्याने मी कधी या फंदात पडलो नाही. आपली मायबोली बरी आणि आपले धागे बरे, यातच खुश होतो.

तरीही काही लेखांमध्ये जेव्हा विडिओ देणे गरजेचे असायचे तेव्हा मी ते विडिओ युट्यूबवर अपलोड करायचो आणि त्याची लिंक लेखात पोस्ट करायचो. मायबोलीचा वाचकवर्ग शेकडोंनी असल्याने शेकडोंनी व्यूज त्या विडिओना मिळायचे. तरी हजार म्हणजे डोक्यावरून पाणी होते. कधी एखादा विडिओ मायबोलीच्या बाहेर जाईल असे वाटले नव्हते. कारण त्यातले बरेच विडिओ पर्सनल होते. कधी ऑफिसमधील नाचाचा होता, तर कधी शाळेतील वर्षिक स्नेहसंमेलनाचा होता. तर कधी लॉकडाऊनमध्ये वाढलेल्या लांबसडक केसांचा होता. मायबोलीकर कौतुकाने बघायचेही, पण मायबोलीच्या बाहेर त्याला किंमत शून्य होती.

पण नुकतेच माझ्या निदर्शनास आले की एका विडिओवरील व्यू अचानक वाढू लागले आहेत. विडिओ युट्यूबवर पसरत आहे, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचत आहे. ईतकेच नाही तर लोकं पुन्हा पुन्हा येऊन बघत आहेत. आणि एकदम कसले भारी वाटू लागले. आपण टिपलेला विडिओ लोकं पुन्हा पुन्हा आवडीने बघत आहेत हे जाणून अगदी कॅमेरामन कम दिग्दर्शक असल्याची फिलींग आली Happy

तर तो विडिओ आहे राणीबागेतल्या राजाचा.. पोहणार्‍या वाघाचा.. त्याच्या राजेशाही आंघोळीचा!

एक दुर्मिळ आणि लोभसवाणे द्रुश्य टिपायची संधी नशीबानेच मला मिळाल्याने मी तो विडिओ युट्यूबवर अपलोड करून ईथे त्यावर लेख लिहिला होता - राणीबागेचा राजा

त्यात शेअर केलेल्या खालील विडिओवर आजच्या तारखेला तब्बल ३५ हजार व्यू झाले आहेत. १४० च्या आसपास लाईक्स आले आहेत. आणि चॅनेलला १००+ सबस्क्राईबर्स झाले आहेत ते वेगळेच.

तरी तुम्ही स्वतःच चेक करा, हा धागा पोस्ट करेपर्यंत कदाचित ३६ हजारही झाले असावेत Wink
Tiger taking bath at pool - https://www.youtube.com/watch?v=mPWPhpUR8NI

गंमत वा योगायोग म्हणजे या आधीचा सर्वाधिक पाच हजारांवर व्यू मिळवणारा विडीओ देखील राणीबागेतल्या पाणघोड्याचाच होता.
Hippo at Ranibaug. राणीबागेतला पाणघोडा - https://www.youtube.com/watch?v=zyqQPwG2HOo

पण वाघाचा रुबाबच न्यारा..

जिथे मिलिअनपर्यंत व्यूज येऊ शकतात त्या प्लॅटफॉर्मवर हा आकडा कदाचित नगण्य असेल. तरीही माझ्यासारख्या सामान्य माणसासाठी आनंददायी आहे. ज्याला फेसबूकवर शंभर लाईक आले तरी अनिल कुंबळेने शतक मारल्यावर त्याला जितका आनंद होईल तितका आनंद होतो त्यासाठी तर नक्कीच हे पार्टी करायचे कारण होते.

---------------------------------------------------------

याच आनंदाला द्विगुणित करायला आणि वाघोबांचे आभार मानायला म्हणून पुन्हा एकदा राणीबागेला भेट देऊन आलो. पुन्हा एकदा जंगलाच्या राजाला कॅमेर्‍यात टिपून आलो. यावेळी तर चक्क हाक मारताच आमच्याच दिशेने ते पोहत आले.. आठवण ठेवली म्हणायची.

तर हा विडिओदेखील त्याच वाघोबाप्रेमींसाठी शेअर करत आहे, Happy

Tiger swimming towards you
विडिओ लिंक ---- https://www.youtube.com/watch?v=e7-oiy9rXVM

हे सारे विडिओ आमच्या राणीबागेची किर्ती सर्वदूर पोहोचवतील अशी आशा !
मायबोलीबाहेर नक्कीच याचा प्रेक्षकवर्ग बच्चेकंपनी असणार. त्यांच्या आनंदात सहभागी होता आले हेच समाधान Happy

धन्यवाद,
ऋन्मेष

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

योगायोग आहे कि पुढचे संकेत ?
युट्यूबवरचा सर्वात पहिला व्हिडीओ सुद्धा झू मधलाच आहे. तो युट्यूबच्या संस्थापकानेच अपलोड केला होता.
काही वर्षांनी मायबोलीकर म्हणतील कि मीमीट्यूबचे संस्थापक आणि आमची मायबोलीवरची ओळख आहे.
तेव्हां ओळख असू द्या.

अभिनंदन.
नॅशनल हेअर डे व्हिडिओ पण मस्त आहे. केस झकास आहेत हो तुमचे !

कॉमी, धन्यवाद,
गेले ते दिवस!. लॉकडाऊन आटोपले. वर्क फ्रॉम होम संपले. ऑफिस सुरू झाले आणि केसांवर कात्री पडली.
आता ईतके मोठे ठेवता येत नाहीत. पण तरी जेवढे ठेवतो ते ही ऑफिसमध्ये सर्वात जास्त आहेत यातच समाधान Happy

चांगली प्रगती आहे. आता मुंबईत आल्यावर काय पाहावं, कसं कुठे जावं यांचाही बनवा.
हल्लीच दोनदा गेलो होतो. काय प्रचंड गर्दी असते.
मला एकदा गेंडा {शिवा} आंघोळ करून अंग झाडताना दिसलेला. पण माझ्याकडे चित्र घ्यायचं यंत्र (कॅम्रा) नव्हता.
बिचाऱ्याला बायको,सोबतीण,मैत्रीण हवी होती. कुणी(झुवाले) देईनात. खूप भडकलेला असे. दिल्हीवाले म्हणाले त्यालाच इकडे पाठवा कसं. झालं. तो गेला तो गेलाच.

धन्यवाद एस आर डी,

आता मुंबईत आल्यावर काय पाहावं, कसं कुठे जावं यांचाही बनवा.
>>>
हो हाच विचार आहे आता. झाल्यास वेगवेगळ्या ठिकाणी फिरून मग तो विडिओ जोडावा.

हल्लीच दोनदा गेलो होतो. काय प्रचंड गर्दी असते.
>>>>
अगदीच! म्हणून बेस्ट टाईम साडेनऊला उघडताच आत जावे आणि थेट वाघाला गाठावे.
माझे विडिओ बघून हे समजेल की माझ्यावेळेस गर्दी किती तुरळक होती. पण बरीच लोकं असे सकाळी लवकर ऊठायचा आळस करतात. पण त्यावेळी पाणपक्ष्यांच्या परीसरातले वातावरणही आल्हाददायक असते.

मला एकदा गेंडा {शिवा} आंघोळ करून अंग झाडताना दिसलेला
>>>>
कधीची गोष्ट आहे? हा कुठे दिसला?

मला एकदा कारने मुंबईला यायचे आहे. कार एखाद्या ठिकाणी पार्क करून दिवसभर फिरायचे. संध्याकाळी कारने माघारी. यासाठी प्लान सुचवा.
अ) कार पार्किंग स्पॉट जर नवी मुंबई असेल तर पुढे कसे प्लान करावे?
ब) जर व्हीटी भागात पार्क केली तर कसे?

रघू आचार्य छान सूचना
या दृष्टीनेही विचार करून ते विडिओत ॲड करता येईल.
जे काही स्थळ असेल तिथे जायचे कसे हे सर्वात पहिले माणूस बघतो.
मुंबईकरांना मुंबईतली ठिकाणे माहीत असतात जे बाहेरच्यांना नाही.
जर मुंबईत एक दिवस फिरायचे असेल तर सकाळी राणीबागचा वाघ. तिथून जेवल्यावर गिरगाव चौपाटी/हॅंगिग गार्डन आणि संध्याकाळी मरीन ड्राईव्ह/ गेटवे.. असे प्लान कसे करता येतील हे त्या त्या वेळी त्या त्या जागी जाऊन दाखवता येईल.

मुंबईत येणारी अडचण म्हणजे कुठे पार्किंग आहे कुठे नाही याची माहिती बाहेरच्यांना नसते. हे तपशील पण असतील तर चॅनेल सुपरहीट होईल.
एकदा फिल्म्स डिव्हिजन मधे जाताना पुणेरी स्टाईल मधे स्त्यावर कार पार्क करून गेलो. काम संपवून बाहेर आलो तर गाडी गायब. चोरबाजारात जागच्या जागी कारचे सगळे पार्टस सुटे होऊन लगेच चोरबाजारात विकायला येतात हे ऐकले होते त्यामुळे घाबरलोच.
नंतर टॅक्सी वाल्याने धीर दिला. त्यानेच ट्रॅफिक ब्रांच ला नेले. तिथे गाडी दिसली. दंड भरून परत मिळाली.

युट्युबवर कोकोमेलन या लहान मुलांच्या चॅनलला १५ दिवसात काही कोटी ह्युज येतात. ज्यांना अ‍ॅनिमेशन करता येते त्यांना नविन चॅनल सुरु केला तर यापेक्षा आणखी जास्त व्ह्युज मिळतील. काही लोक तर ग्रीन स्क्रीन व्हिडिओचे रुपांतर करुन पैसे मिळवतात. खुप मोठी संधी आहे

पर्यटनाचे चानेलस सुरुवातीला चांगले असतात आणि सबस्क्राईबरस वाढत जातात. मग ठिकाणं संपतात आणि चालेल खाली जातो. त्यामुळे पैसे मिळावे म्हणून विडिओ नेमाने महिन्याला चार टाकण्यापेक्षा विशेष असले तेवढेच टाकावेत.
उदाहरणार्थ visa2explore चे सबस्क्राईबरस साडेतीन लाखांपर्यंत जाऊन आता पन्नास हजारांना आले.

__________
शिवा गेंड्याची स्टोरी फार जुनी आहे पण खरी आहे. राणीबागेचा कायापालट करण्याचा जो प्लान होता तो मुंबई ग्रूपने बंद पाडायला लावला. तेव्हाची गोष्ट.

मुंबईत फिरण्याचा व्हिडीओ चॅनेल बनवताय का ? तुमच्या उपक्रमास मनापासून शुभेच्छा.
कुठल्या गाडीला कुठल्या नियम तोडण्यासाठी किती चिरीमिरी द्यावी लागते ही आणि अशी महत्वाची माहिती दिली तर चॅनेल पॉप्युलर होईल. जर व्हिडीओ दहा लाखाच्या पुढे गेला तर तीन लाख रूपये महिना सुरू होईल. पन्नास लाख झाले तर सात आठ लाख मिळतील. एक कोटी व्ह्यूज झाले तर दहा ते बारा लाख महिना उत्पन्न.

मग पुढचा व्हिडीओ. आधीच्या व्हिडीओमुळे सबस्क्रायबर झालेच असतील. मग याचे पुन्हा दहा बारा लाख.
मग तिसरा व्हिडीओ. त्याचे दहा बारा लाख.
तीनच व्हिडीओ बनवून महिना तीस ते छत्तीस लाख उत्पन्न सुरू होईल.
अजून बनवले तर हे उत्पन्न वाढत वाढत एक कोटी, पन्नास कोटी, पाचशे कोटी, पाच हजार कोटी महिना पर्यंत जाऊ शकते. त्याच्याही पुढे जाऊ शकेल.
एव्हढे उत्पन्न झाले की मग मायबोलीमधले शेअर्स वाढवा. मित्रांकडून मिळतील त्या भावाला विकत घ्या. मायबोलीचा शेअर चढायला लागला की बाकीचे पण विकत घेऊ लागतील. मग मायबोलीचा शेअर दहा रूपयांचा साडेतीन हजारांना मिळेल. या भावाने गल्लेवालेंकडचे पन्नास टक्के शेअर्स घेऊन टाका.
मग तुम्ही जगातल्या श्रीमंत व्यक्तीत जाल.
मग शाहरूखला घेऊन एक पिक्चर बनवा आणि त्याचा धागा एक वर्ष आधीच काढा.
युट्यूबच्या कमाईचा हा ही फायदा.

सर आपले हार्दिक अभिनंदन.
लवकरच आपणास लाखो दर्शक मिळोत ह्या शुभेच्छा.
संकेतस्थळांवर वेगवेगळे अवतार घेऊन कसे बागडायचे, दुसऱ्यांचे धागे हातोहात पटरी वरून कसे ढकलून द्यायचे यावरही जमल्यास चार शब्द बोलावे .. सुपरहीट होईल..
मागे आपण डोंगर जाळला होता त्याचे प्रात्यक्षिक दर्शकांना दाखवता आले तर बघा, लाख काय करोडोत व्ह्युव मिळतील .. जमले तर बीग बॉस मधेही चान्स भेटून जाईल.

त्यात शेअर केलेल्या खालील विडिओवर आजच्या तारखेला तब्बल ३५ हजार व्यू झाले आहेत.
>>> क्या बात... 35 हजार वेळा स्वतःचाच व्हिडीओ क्लिक करून बघणे थट्टा नाही... मान गये ...

शर्मिला धन्यवाद Happy

च्रप्स .. हाहा .. यूट्यूब चॅनेलवर दिसणारा ॲनालिसीस डेटा आणू का? कुठले व्यू कधी कुठून कसे आले ते Wink

@ Srd
राणीबागेचा कायापालट करण्याचा जो प्लान होता तो मुंबई ग्रूपने बंद पाडायला लावला.
>>>>

हा काय सीन होता? कुठला मुंबई ग्रूप?

रघू- रंगीला- वीरू- सामना...
आपल्या प्रतिसादातील चमकदार कल्पनांचे आभार.. सविस्तर रात्री

Planअसा होता की मागची मफतलाल गिरणीचीही जागा घ्यायची आणि हायटेक झू बांधायचे. सर्व जुनी झाडं तोडायची. काही दीडशे वर्षांपूर्वी लावलेली. मग तिकिटे गच्च गलेलठ्ठ झाली असती. प्राणी बोरीवलीच्या पार्कात पाठवले ते गेलेच.

सर्व जुनी झाडं तोडायची. काही दीडशे वर्षांपूर्वी लावलेली
>>>>>>
Sad
वाचली झाडे.. बरे झाले..
त्या दिवशी आम्ही गेलो तेव्हा सकाळीच एक ग्रूप झाडे बघायला आलेला. एक माहीतगार माणूस त्यांना झाडाची माहिती सांगत होता आणि बाकी सारे सभोवताली जमलेले. माझ्या मुलीने विचारले हे ईथे काय करत आहेत? कारण राणीबागेत प्राणीच बघायला यायचे हेच तिला माहीत होते. मग मी तिला झाडे हा सुद्धा कसा ठेवा असतो हे सांगितले. मुळात मलाच यातले ज्ञान कमी. पण ते झाड मस्त होते. भला मोठा घेर होता. तिलाही ते झाड आवडले आणि त्यामुळे पटले की झाडे बघायलाही लोकं येऊ शकतात. कधीतरी तिथली झाडे बघायला आणि कॅमेऱ्यात टिपायला जायला हवे. पोरांना सोबत न घेता..

धन्यवाद प्राचीन आणि कुमार सर Happy

@ प्राचीन, हा धागा काढायच्या आधी सहज ईतर मायबोलीकरांचे युट्यूब चॅनेल चाळलेले. तेव्हा त्यात आपलाही पाहिलेला. अर्थात आधीही पाहिलेलाच. फक्त अंगात वाचनाचा किडा नसल्याने फारसा रेंगाळलो नाही ईतकेच. पण तो भारीच आहे Happy

आज चेक केले.. वाघाच्या विडिओचे ५३ हजार व्यूज झाले बघता बघता.
काही मायबोलीकर आपल्या लहान मुलांनाही तो आवडीने दाखवतात असे त्यांनी सांगितले. खूप छान वाटले ते ऐकून Happy

https://youtu.be/mPWPhpUR8NI