माझा आधीचा आयडी मला परत हवा आहे कृपया मदत करा

Submitted by kamalesh Patil on 13 February, 2023 - 04:07

माझा आधी कमलेश पाटील या नावाने आयडी होता तो ब्लॉक झाला आहे. मी परवलीचा शब्द मागायचा प्रयत्न केला तर मला हा इमेल अस्तित्वात नाही सां सांगीतलं जात. आणी त्याच इमेल ने नविन खातं उघडायला गेलं तर इमेल अस्तित्वात आहे म्हणून सांह्जां जात. मी जुन्या आयडीवर खूप लेखन केलं होतं.
संपादकांनी कृपया मदत करावी.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

भरत.
हा 2821 क्रमांक कुठून मिळाला.?

कमलेश पाटील, तुम्ही बराच काळ लॉगिन न झाल्याने ब्लॉक झाला असाल. अडमिनना विनंती करून पाहा. किंवा सरळ नवीनच आइडी ( उदाहरणार्थ - 'कमलेश पाटील १/२/३ वगैरे') नवीनच ईमेलने घेऊन पाहा.

नविन आयडी तयार केलाय मी हा. पण माझ्या जुन्या आयडीवरुन मी खुप लेखन केलं होतं

आणी मे प्रकाशकांना पण खुपदा संदेश पाठवला पण फक्त एक अ‍ॅटोमेल येते.

इमेल ने नविन खातं उघडायला गेलं तर इमेल अस्तित्वात आहे म्हणून सांह्जां जात.<<< या स्टेपला फरगॉट पासवर्ड ऑप्शन देऊन बघा

कमलेश पाटील यांचे सदस्य खाते स्थगीत करण्यात आले आहे.

Submitted by admin on 13 January, 2016 - 20:22

अशी नोंद तुमच्या विशाल मस्के यांच्यावर लिहिलेल्या लेखाखाली आहे.

कमलेश पाटील, तुम्ही बराच काळ लॉगिन न झाल्याने ब्लॉक झाला असाल. >>> हे कारण नसावे. मी जवळपास ५-६ वर्षे माबोवर लॉगिन केले नव्हते, तरिही माझा आयडी अजूनही आहे.

https://www.maayboli.com/node/57173 या लिंकवर गेलं की तुम्हाला या पानावरती जायची मुभा नाही. हे पान सार्वजनिक वाचनासाठी नाही असं काहीतरी येतं जाउ दे परत नव्याने लिहीन. भरपूर आहे लिहीण्यासारखं

देवा असलं अर्वाच्च मी कधीच कोणाबद्दल लिहू शकत नाही जे त्या धाग्यावर लिहीलंय. माझा आय डी नक्केच हॅक झालाय. पसंपादकानेंनी मला फोन करून विचारयचं तरी डायरेब्लोब्लॉक केलाय माझा आयडी..अवघड आहे

आयडी हॅक होत असेल तर खरेच अवघड आहे.
ईथे माझ्या नावावर, आय मीन मी आहे असे भासवणारे बरेच आयडी बनतात आणि आपसात अर्वाच्य भाषेचा खेळ करत राहतात. जेणेकरून माझी ईमेज खराब व्हावी.
आता मी ही पोस्ट टाकताच त्यामागचे सूत्रधार या धाग्यावर उगवतील. त्यातलाच एखादा यामागेही असू शकेल. चेक करून घ्या Happy

काय झालं नक्की माझ्या आयडी बरोबर त्या संपादकांनाच माहीत. मी २०१३ पासुन मायबोली वापरत होतो २०१६ पर्यंत. ही एकच पोस्ट अशी अहेआहे मला काहीच माहीत नाही. बाकी ज्याला जे समजायचं आहे ते ज्याचं त्याने समजावं

तुमचा प्रश्न योग्य आहे.तांत्रिक अडचण येत आहे.
आयडी चुकीच्या वर्तनाने ब्लॉक झाला तर च पहिला ईमेल आयडी पण ब्लॉक झाला पाहिजे .
हे योग्य आहे.
पण बाकी काही कारणाने लॉगिंग मध्ये अडचण येत असेल.
Exa.
Pasword विसरल्या मुळे.
अचानक काही तांत्रिक कारणाने लॉग आऊट झाल्या मुळे.
तर पहिला ईमेल आयडी च चालला पाहिजे.
पण माय बोली वर तसे होत नाही.
कधी ईमेल आयडी valid नाही.
कधी ईमेल आयडी पहिलाच अस्तित्वात आहे .
असली alien उत्तर येतात.
ही तांत्रिक अडचण दूर करण्याची कुवत प्रशासनात नक्कीच आहे.
त्यांनी ही अडचण दूर करावी

माझा मुद्दा तोच आहे मी सेम ईमेल आयडी वापरुन नवीन अकॉऊंट उघडायचा प्रयत्न केला तर ते सांगतात ईमेल आयडी ऑलरेडी आही.

नविन परवलीचा शब्द मागायचा प्रयत्न केला तर सांगतात या एमेल आयडीचं कोणतही अकॉऊंट नाही.

सो मी वाद घालत बसण्यापेक्षा नविन मेल आयडी वापरून नविन अकॉऊंट खोललंय.

बाकी ज्याला जे समजायचंय ते त्यानी समजावं.

कांगावा म्हणजे काय हे इथल्या दोन कमेण्ट्स वरून मुलांना शिकवायला बरं पडेल. Lol
हा ही धागा दोनच आयडी चालवताहेत. ब्लॅक रॉबीन, ही मॅन अशा काही आयड्यांना श्रद्धांजली अजून कुणी दिलेली नाही.
ते आयडी इतरांच्या नावे खपवण्याची सुसंधी आलीय या धाग्याद्वारे Proud

मायबोलीवर आयडी हॅक होणे अशक्य आहे. त्यासाठी अ‍ॅडमिन, वेमा किंवा अ‍ॅडमिन टीम मधल्या सदस्यांचे आयडीज हॅक व्हायला लागतील.
आयडी ब्लॉक झाल्यावर झक्की आणि चर्प्स (आत्ता च्रप्स) वगळता कुणालाही परत मिळालेला नाही. मिळत नाही.

पण ब्लॉक झालेले किंवा पडून असलेले काही आयडीज काही काळानंतर अचानक अ‍ॅक्टीव्ह झालेले दिसतात. चटकन आठवणारा आयडी म्हणजे लुटुपुटीचा खेळिया. हा ब्लॉक झालेला होता. कोण त्यांना अ‍ॅक्टीव्ह करतं हे ऑलमायटीच सांगू शकेल.

मायबोलीवर आयडी हॅक होणे अशक्य आहे. त्यासाठी अ‍ॅडमिन, वेमा किंवा अ‍ॅडमिन टीम मधल्या सदस्यांचे आयडीज हॅक व्हायला लागतील.
>>> चरण कुठे आहेत आपले.... कोणताही आयडी हॅक होणे शक्य आहे.. अशक्य काय त्यात... गूगल, युट्युब, बँक आयडी हॅक होतात- मायबोली तर सहज शक्य आहे....

बाकी सामना तुमच्या मताशी सहमत आहे.. कांगावा वाटत आहे मलादेखील...किंवा ते विसरले कि असे काही कांड केले होते...

तरी बेनिफिट ऑफ दौत म्हणून...

कमलेश - तुम्ही फोन कोणाला दिला होता का.. एकदा मायबोली लॉगिन असेल आणि त्यांनी वेबपेज रिफ्रेश केले तर ऑटो लॉगिन होते- दुसऱ्या कोणीतरी- एखद्या मित्राने वगैरे लिहिले असेल असे असू शकते...

आता ह्या विशाल म्हस्के साहेबाना शोधून त्यांच्या काय ते तडक वगैरे वाचणं आलं..

किती काम करावे लागेल राव... कुणीतरी त्याचीपण लिंक द्या कि.. (पॉपकॉर्न पण)

इथेच टाका लिंक अजिंक्यराव... पॉपकॉर्न कशाला... चकना घेऊन विकेंड ला एक स्कॉच चा पेग भरून खिडकीशी बसून निवांत वाचेन म्हणतो....

तुमचा आयडी हॅक झालेला का, मग तो पुन्हा द्यावा का हे सगळे होई पर्यंत तुम्हाला तुमचे लेखन पाहायचे असल्यास ह्या लिंकवरून बघू शकता.
https://www.maayboli.com/user/28213/created

माबो आयडी हॅक होणे हे काही पटत नाही. आणि समजा कोणी हैक केलाच तर त्याला माबोवरील तडका सम्राट म्हस्के साहेब माहित असण्याची शक्यता कमीच. धागे काढणे हे बँकतून पैसे काढण्या इतके सोपे थोडेच आहे? आयडी हॅक करून धागा काढायला हॅकर ही माबो वरील पट्टीचा खेळाडू लागेल.
त्यांनी म्हस्के साहेबांच्या तडक्यांचा मार्‍याने व्यथित होऊन सात्वीक संतापाने तो धागा काढला असावा आणि कदाचित सात्वीक संतापाचा भर ओसरल्यावर ते विसरून गेले असतील. हीच शक्यता जास्त वाटते.

मस्के साहेबांनी जवळपास हजार तडके माबोवर सादर केले असावेत असे प्राचीन कागदपत्रांवरून दिसून येते.

https://www.maayboli.com/node/61088

आयडी हॅक करून धागा काढायला हॅकर ही माबो वरील पट्टीचा खेळाडू लागेल. >>> हेच म्हणायचं होतं. माबोवर एकमेकांचा ईमेल आयडी सहजासहजी मिळत नाही. त्यासाठी हॅकर पीडीत आयडीच्या (:फिदी:) संपर्कातलाच असायला पाहीजे. म्हणजे हे माबोबाह्य संबंध असतील. हॅकरचा माबोशी काहीही संबंध नसेल तर ईमेल हॅक करून पण काहीच फायदा नाही. कारण माबोवरचा आयडी माहिती असणे, पासवर्ड मिळवणे ही काही सोपी कामे नाहीत. ईमेल हॅक करणे + रिसेट करून पासवर्ड मिळवणे + एखाद्याची हिस्ट्री माहिती असणे या शक्यता कमी होत जाणार्‍या वाटतात.

या आयडीने अशा भाषेत प्रतिसाद पण दिलेले आहेत. गझलेच्या धाग्यावर तेव्हां कुणी सहसा फिरकत नव्हते.

सरांनी पण इथे हात धुवून घेतले आहेत. शिवाय कुणी इथे त्यांच्या कमेण्टला आक्षेप घ्यायला आला कि त्याची पण सोय आधीच करून ठेवलेली आहे. Lol
फक्त एकच आठवण नम्रपणे करून द्यायची होती. सरांना विरोध करणारे आयडी आपोआप उडतात. शिवराळ भाषा न वापरता. त्यामुळे शिवराळ भाषा वापरणारे आयडी कसे काय राहू दिले जातात हा संशोधनाचा विषय आहे. Wink

माफ करा मुलांच्या परीक्षेमुळे मायबोलीवर यायला जमत नव्हते. आत्ता हा धागा पाहिला, एव्हढे प्रतिसाद का म्हणून उघडला तर पुन्हा तोच गोंधळ.

ऋन्मेषजी , मी तर तुम्हाला विनंती केली होती ना माझी बदनामी थांबवा म्हणून. तुम्ही कोणत्या गॅंग बद्दल बोलत आहात? कारण माझ्यावर आरोप झाले होते. मी लगेच तक्रार केली तुमच्या कडे म्हणून बरे झाले. नाहीतर उलटा माझ्या वरच आळ आला असता. काही प्रतिसाद डिलीट झाले आहेत. वाचलेले आहेत त्यांचा स्क्रीनशॉटस देऊ का? देतोच.
Screenshot_20230217-072817_Chrome.jpgScreenshot_20230217-072843_Chrome.jpg

Pages