तडका - वाद

Submitted by vishal maske on 14 May, 2015 - 21:59

वाद,...

जुन्यासह नवे माणसंही
जोशामध्ये भिडले जातात
जुन्यासह नवे वादही
नव्या-नव्यानं लढले जातात

कुणी नैतिकतेनं लढतात तर
कुणाचे विचार हिनले जातात
मात्र वादांची इथे कमी नाही
ते घडवुन सुध्दा आणले जातात

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

Group content visibility: 
Public - accessible to all site users

चन्गोची क्षमा मागुन...

वाचणार कोणी असेल तर कवितेला अर्थ आहे
वाचण्या सारखे काही नसेल तर चारोळ्या सुद्धा व्यर्थ आहेत..

किन्वा

वाचण्यारखे काही असेल तर प्रतीसादाला अर्थ आहे
नाहीतर ढीगभर कविता करुन सुद्धा कविचे लिहीणे व्यर्थ आहे..

विशाल महोदय ,
माझी आपणास नम्र विनंती आहे कि आपण रोज एक नवीन धागा काढण्यापेक्षा एकच 'तडका' नावाचा न वाहणारा धागा काढून त्यामध्ये रोज वात्रटिका लिहित जाव्यात..
अशी विनंती करण्यास कारण कि इथे एका पानावर एका वेळेला २० धागे दिसण्याची सोय आहे.
आत्ता कवितेच्या पानावर पाहिल्यास २० पैकी ८ धागे आपले आहेत.
यामुळे इतर कलाकृती पुढील पानावर जाऊन त्या वाचण्याचे राहून जाते.

धन्यवाद ...