वृध्दांसाठी रूग्ण-शुश्रुषा व पुनर्वसन केंद्रे
Submitted by अरुंधती कुलकर्णी on 29 May, 2016 - 07:40
वृध्दापकाळात तब्येतीचे अनेक प्रश्न उद्भवू शकतात. जोवर पेशंट हालता फिरता असतो तोवर खूप प्रॉब्लेम नसतो. परंतु काही कारणामुळे जर पेशंट रूग्णशय्येस खिळला तर त्याची काळजी खूप काटेकोरपणे घेणे आवश्यक असते. पेशंटचे पथ्यपाणी, औषधे, व्यायाम वगैरे वेळचे वेळी व व्यवस्थित होणे आवश्यक असते. त्याचप्रमाणे पेशंटची स्वच्छता, वैद्यकीय तपासणी व देखभालही अनिवार्य असते. काही वेळा शस्त्रक्रिया झालेले किंवा अपघात झालेले वृध्द पेशंट मेडिकल सुपरविजनखाली असणे गरजेचे असते. हॉस्पिटल्स त्यांच्या नियमांनुसार पेशंटला फार दिवस ठेवून घेत नाहीत व डिसचार्ज देतात.