मत,...
आपले मत मांडण्याचा
प्रत्येकाला हक्क आहे
मात्र कुणाचे मत पाहून
आमचे मत थक्क आहे
मत असं मांडावं की;
त्याला समाजात पत पाहिजे
विचार करूनच विचारपुर्वक
आपण मांडलेलं मत पाहिजे
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
एक्झिट पोल,...
निकाल जाहिर होण्याआधीच
तर्क-वितर्काचे बोल असतात
प्रत्येक -प्रत्येक निवडणूकाचे
इथे एक्झिट पोल असतात
अंदाजे बांधलेल्या अंदाजाचीही
कुणाला भलतीच धास्ती असते
कारण एक्झिट पोल म्हणजे
रंगीत तालमीतली कुस्ती असते
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
बँन्ड बंदीचा उपाय,...?
वरातीत नाचण्याची इच्छा
कित्तेकांची विराट असते
प्रत्येक लग्न समारंभात
बँन्ड-बाजा-बारात असते
मोठ्या आवाजात नाचण्याचा
इथे कित्तेकांना चेव असतो
नाचणारे नाचतातही धुंदित
मात्र इतरांना उपद्रव असतो
इतरांचा उपद्रव टाळण्यासाठी
ध्वनी प्रदुषणापासुन वाचावं लागेल
अन् नाचण्याची इच्छा असणारांनी
हेडफोन लावुन नाचावं लागेल,...?
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
ज्योतिबा,...
ज्योतिबा तुमच्या विचारांनी
आजही समाज घडतो आहे
तुमच्या ज्ञान ज्योतिचा प्रकाश
मना-मनात वाढतो आहे
आज पुरूषा बरोबर स्रीया
समानतेनं वागु लागल्यात
सामाजिक धूरा संभाळत
सन्मानानं जगू लागल्यात
तुमच्या विचारांचा व्यासंग
समाजाला जडू लागलाय
तुमच्या विचारांतला समाज
खर्या अर्थानं घडू लागलाय
आता समाजही जाणतोय
स्री अबला नाही सबला आहे
स्री शक्तीचा अनुभव सुध्दा
कित्तेकांनी भोगला आहे
समाजालाही कळू लागलंय
कि आपली कोणती हमी
आहे
प्रगत होणार्या या समाजाला
तुमच्या क्रांतीची पार्श्वभुमी
आहे
हे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा
हे तुमचेच वैचारिक स्पंदन
संयम,...
कसं वागावं,कसं बोलावं
याच्याही पध्दती असतात
कुणाच्या वागण्या-बोलण्यात
सर्रास गुण उध्दटी असतात
मात्र "अति तिथे माती" हा
सर्वमान्य नियम असतो
सहनशिलतेच्या परिसीमेतच
प्रत्येकाचा संयम असतो
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
टोल बंद,...?
कुठे-कुठे आंदोलनं झाली
तर कुठे निदर्शनंही झाली
टोलच्या टोलवा-टोलवीत
वैचारिक घर्षनंही झाली
पण ना टोल हटला गेला
ना संघर्षही बारिक आहे
टोल बंदच्या धोरणासाठी
अजुन पूढची तारिख आहे
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
शोभेचं बोलणं,...!
आपण काय बोलावं हे
आपल्यालाही कळलं पाहिजे
अन् शब्दांचं भान ठेऊनच
आपलं बोलणं बोललं पाहिजे
बोलुन गेलेल्या शब्दानं
कधी मनही फसु शकतं
अन् शोभेचं बोलणंही
अशोभनीय असु शकतं
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
प्रचारतोफा,...!
प्रचार जरी संपला तरी
जोशामध्ये जोश असतो
विरोधातल्या विरोधकावर
मनी वाढता रोश असतो
विजयाच्या वाढत्या आशांचे
मना-मनात तोरण असतात
अन् थंडावलेल्या प्रचारतोफा
अंतर्गत मात्र गरम असतात
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
नियम,...
कुठे लादले जातात तर
कुठे लादून घेतले जातात
माणसांसाठीचे नियम कधी
माणसांकडूनही कातले जातात
कधी नियम वाढवले जातात
कधीे ते तुडवले जाऊ शकतात
तर कधी-कधी नियम सुध्दा
हवेत उडवले जाऊ शकतात
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
कंत्राटी मनो-मिलन,..!
पाठिंब्यात मिळालेला आधार
कुणासाठी जणू मेवा असतो
तर कुणाला मिळालेला आधार
कुणा-कुणाला जणू हेवा असतो
मात्र आधार देण्या-घेण्यासाठी
खुले निवडणूकीचे दालन असतं
अन् विजयाच्या आशा बाळगुन
कुठे कंत्राटी मनोमिलन असतं
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३