मीडीया

भारतीय टेलिव्हिजनमधील ऐतिहासिक एपिसोड - रवीशकुमारचे आभार

Submitted by घायल on 19 February, 2016 - 22:37

कालचा दिवस भारतीय टीव्ही पत्रकारितेतला एक ऐतिहासिक दिवस होता. अण्णांच्या आंदोलनापासून मिडीयाच्या दडपशाहीबद्दल नाराज असणारे हास्यास्पद प्राणी बनत चालले होते. तुम्ही बहुमतासोबत नसाल तर देशद्रोही पासून ते नैराश्य आलेले मानसिक रुग्ण इथपर्यंत ऐकून घ्यावं लागत होतं. वेगवेगळी मतं असणं ठीक. पण जे नेमकं शब्दात सांगता येत नव्हतं त्याला काल योग्य शब्द मिळाले आणि डीटीएच चं सबस्क्रीप्शन भरून मी पुन्हा टीव्ही जिवंत केला. आपल्या पैशांनी विकतचं दुखणं घरातच नको म्हणून माहीतीचे स्त्रोतच बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागलेल्या माझ्यासारख्या (कदाचित) अल्पसंख्य लोकांना मोठाच दिलासा मिळाला आहे.

Subscribe to RSS - मीडीया