क्रीडा

सचिनचे शतक म्हणजे भारताचा पराजय हा निखालस (गैर)समज

Submitted by sudhirkale42 on 27 March, 2011 - 05:42

सचिनचे शतक म्हणजे भारताचा पराजय हा निखालस (गैर)समज

परवा आणखी एका संस्थळावरील एका सभासदाच्या लेखातील मॅच पहाताना "करायच्या-न करायच्या" गोष्टींमुळे होणार्‍या शकुन-अपशकुनाबद्दलचे उल्लेख वाचून गंमत वाटली आणि हा लेख लिहायची स्फूर्ती झाली. (अर्थात सचिन खेळत असताना "करायच्या-न करायच्या" गोष्टीची माझीही यादी आहेच!)
एक (गैर)समज असाही आहे (किंवा सचिनच्या हितशत्रूंनी तो रचला आहे) कीं त्याने शतकी खेळी केली कीं भारत तो सामना हरतो.

कॅलटेक बास्केटबॉल चमुचा अविस्मरणीय पराक्रम

Submitted by aschig on 23 February, 2011 - 17:20

कॅलटेक आज एका वेगळ्याच कारणाकरता न्यु यॉर्क टाईम्सच्या पहिल्या पानावर आहे.

२५ वर्षांनी, आणि ३१० गेम्स नंतर कॅलटेकची बास्केटबॉल चमुने एखादी चँपीअनशीप नव्हे तर चक्क एक मॅच जिंकली आहे.

चला त्यांचे अभिनंदन करु या.

http://www.nytimes.com/2011/02/24/sports/ncaabasketball/24caltech.html?_...

या टीम वर एक डॉक्युमेंटरी सुद्धा निघाला आहे: क्वांटम हुफ्स.

विषय: 
प्रांत/गाव: 

जुन्या विश्वचषकाच्या आठवणी-१

Submitted by sudhirkale42 on 20 February, 2011 - 01:26

भारताने यशाच्या जबड्यातून पराजय ’खेचून’ आणला त्याची ’चित्तरकथा’
पराजय समोर उभा असताना जोरदार लढा देऊन विजयश्री खेचून आणण्याच्या पराक्रमाचे इंग्रजीत "They clenched victory from the jaws of a sure defeat"! असे वर्णन केले जाते. पण भारताने या सामन्यात जणू Reverse swing चा प्रयोग केला. जयमाला घेऊन यश ठीक समोर उभे असताना भारताने यशाच्या जबड्यातून पराजयाला जणू ’खेचून’ आणले!

विषय: 

बुद्धिबळाचा डाव

Submitted by आशुचँप on 27 October, 2010 - 07:24

डाव क्रमांक १
व्हाईट - आशुचँप
ब्लॅक - प्रगो
याआधीचा डाव नंद्या यांच्या बुद्धिबळ या पानावर खेळण्यात आला होता. तो बरोबरीत सुटला.

विषय: 

कॉमनवेल्थ गेम्स - शब्बाश इंडिया !!

Submitted by जग्या on 4 October, 2010 - 23:43

नमस्कार मंडळी !!

नमनात धडा भर न घालता सरळ मुद्द्याला च हात घालतो. तसे आपण सर्व भारतीय विलक्षण देश प्रेमी. पण , आपल्या देशाला शिव्या घालायला पण आपण मागे नसतो बरका. उदा. रस्ते चांगले नाहीत ,वाढते लोड-शेडींग , पगार कमी ट्याक्षेस जास्त या सारखे विषय निघाले कि आपण देशाचे वाभाडे च काढतो.

पण जेवढ्या पोट-तिडकीने आपण आपल्या देशाला नावे ठेवतो , तेवढेच देशाने काही चांगले केले तर तोंड भरून कौतुक करतो का हो ?? विचारा... विचारा .... विचारून बघा स्वताहाला ...उत्तर आपोआपच मिळेल.

विषय: 

इतर खेळ - बॉक्सिंग, तिरंदाजी, जलतरण

Submitted by रंगासेठ on 20 September, 2010 - 04:14

सध्या टेनीस, क्रिकेट, फुटबॉल या खेळांची चर्चा चाललीय, त्यांच्यासाठी स्वतंत्र धागे पण आहेत. पण इतर काही खेळ आहेत त्यांचासाठी स्वतंत्र असा धागा नाहीये. तेव्हा त्यात काही उल्लेखनीय घटना घडल्या की त्यांची माहिती या गप्पांच्या पानावर येउदेत.

विषय: 

टेबलटेनीस

Submitted by रंगासेठ on 7 July, 2010 - 11:48

भारताच्य शरत कमलने प्रतिष्ठेची 'US Open Table Tennis Championship' जिंकत मानाचा तुरा खोवलाय. हे त्याचे कारकिर्दितील सर्वोच्च विजेतेपद आहे. शरतचे अभिनंदन.

http://www.dnaindia.com/sport/report_achanta-sharath-wins-us-open-table-...

टेबलटेनीस हा बर्‍यापैकी सर्वत्र खेळला जाणारा (निदान IT / इतर कॉर्पोरेट मध्ये आणि शाळा-कॉलेजात) खेळ आहे. अतिशय वेगवान असा खेळ असून याला प्रतिसादही चांगला मिळतो. या खेळात भारताने ऑलिंपिकमध्ये पण थोडीफार चांगली कामगिरी केली होती.

विषय: 
शब्दखुणा: 

विंबल्डन - २०१०

Submitted by Adm on 16 June, 2010 - 21:53

ह्या वर्षीचीविंबल्डन टेनीस स्पर्धा येत्या सोमवार पासून म्हणजे २१ जून २०१० पासून सुरु होते आहे. स्पर्धेची मानांकनं आज जाहिर झाली. पुरुष एकेरीत गतविजेत्या रॉजर फेडररला अव्वल मानांकन मिळालय, तर महिला टेनीस वर विल्यम्स भगिनींनी निर्विवाद वर्चस्व सिध्द केलय. महिला एकेरी मध्ये सेरेना आणि व्हिनसला अनुक्रमे पहिलं आणि दुसरं तर महिला दुहेरीत ह्या जोडीला पहिलं मानांकन मिळालय.

हा धागा यंदाच्या विंबल्डन टेनीस स्पर्धेविषयी चर्चा करण्यासाठी...

विषय: 
शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - क्रीडा