बॅडमिंटन

Submitted by Adm on 24 June, 2010 - 22:38

हा धागा बॅडमिंटन संबंधी चर्चेसाठी...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कोरिया ओपनचा अंतिम सामना पुन्हा ओकुहारा आणि सिंधुमध्ये उद्या होणार. सिंधू मस्त खेळत आहे, ओकुहारा फारच मस्त खेळत आहे.

भारी झाली मॅच कदम.. आजच्या मॅच मध्ये पण आधीच्या मॅच सारख्याच दोन तीन रॅलीज तुफान झाल्या. पण दुसरा गेम अगदीच किरकोळीत हारली सिंधू.. तेव्हा जरा भिती वाटत होती हारते की काय परत ह्याची. पण नंतर जबरी खेळली..

जपान ओपनमध्ये पुरुष एकेरीत उप-उपांत्य फेरीत भारताचे ३ खेळाडू आहेत तर महिला एकेरीत २. ग्रेट जॉब !! गोपीचंदला सुपर द्रोणाचार्य पुरस्कार द्यायला हवा.

महिला एकेरीत काय भंपक ड्रॉ पाडले आहेत माहिती नाही. उप-उपांत्य फेरीतच पुन्हा ओकुहारा आणि सिंधु सामना आहे. सलग तिसर्‍यांदा! तर साईनाचा सामना कॅरोलिना मरिन विरुद्ध आहे. तेव्हा दोघीही उप-उपांत्य फेरीतूनच बाहेर जाण्याची शक्यता आहेत.

पुरुष एकेरीत श्रीकांत आणि प्रणॉय पुढे जायची जास्त शक्यता आहे. समीर वर्मा विरुद्ध शि युची आहे जो सध्या एकदम भारी खेळतो आहे.

मिश्र दुहेरीत देखील दोन जोड्या आहेत. अश्विनी पोनप्पा सात्विक रेड्डी बरोबर खेळते आहे तर तिची महिला दुहेरीतील पार्टनर सिक्की प्रणव चोप्राबरोबर मिश्र दुहेरीत खेळत आहे. महिला दुहेरीत अश्विनी आणि सिक्की मागल्या फेरीत हारल्या. ज्वाला गुट्टा भारताची दुहेरीची प्रशिक्षक आहे असे मध्यंतरी वाचनात आले होते. जर तिने काम सुरू केले असेल आणि तिचे प्रयत्न कामाला येत असतील, तर तिचेही अभिनंदन

टण्या, ओकुहारा आणि सिंधू ह्याच फेरीत एकमेकांविरुद्ध आहेत त्यात ड्रॉचा तसे बघायला गेले तर काही संबंध नाही कारण सिंधूला चवथे मानांकन आहेत तर ओकुहाराला मानांकनच नाहीये.. त्यामुळे ती कुठेही प्लेस होऊ शकते

हरली सिंधू. Sad

ओकुहाराला मानांकनच नाहीये >>>>> असं कसं? बॅडमिंटनमध्ये मानांकनं कशी ठरतात?

डेन्मार्क ओपन सुपर सिरीजमधले किदंबी श्रीकांतचे उपान्त्य आणि अंतिम असे दोन्ही सामने पाहता आले. अंतिम सामना तर पुरता एकतर्फी होता. तो सामना जिंकल्यानंतरची श्रीकांतची रिअ‍ॅक्शन - रादर नो रिअ‍ॅक्शन. जणू गल्लीतला सामना जिंकलाय. धोनीपेक्षाही थंड थंड होती.
सामन्यादरम्यान समालोचकांनी सांगितलेली काही माहिती :
यावर्षी श्रीकांत पाच सुपरसिरीजच्या फायनल्समध्ये पोचलाय ((त्यातल्या तीन जिंकलाय)) . आणि असे (एका वर्षात) करणारा तो आतापर्यंतचा फक्त सहावा खेळाडू आहे.
आतापर्यतच्या ९ सुपरसिरीजचे पुरुष एकेरीचे विजेते पाच देशांतले आहेत (भारताकडे ४ जेतेपद - साईप्रणीतचे एक)
Viktor Axelsen या डॅनिश खेळाडूने दोन स्पर्धा जिंकल्यात.
उद्यापासून पॅरिस सिरीज सुरू होतेय

श्रीकांतचे अभिनंदन. त्याने ज्याला पराजित केले तो ली ह्युन इल ३७वर्षांचा आहे. तो अंतिम फेरीत पोचला हीच त्याच्यासाठी मोठी अचिव्हमेंत असावी. त्याने उपांत्य सामन्यात त्याच्याच देशाच्या सॉन वॉन होला (जो जागतिक क्रमवारीत प्रथम आहे) ९०मिनिटांच्या मॅराथॉन सामन्यात हारवले आणि बहुतेक तो त्यात पूर्ण दमून गेला असावा. श्रीकांतने त्याच्यावर ज्या प्रकारे वर्चस्व गाजवले तसे गेल्या कित्येक वर्षात कुठल्याही अंतिम सामन्यात दिसले नव्हते. श्रीकांतला त्याच्या सुदैवाने सोपा ड्रॉ मिळाला या स्पर्धेत - अर्थात त्यामुळे त्याचे यश कमी होत नाही. उप-उपांत्य सामन्यात विक्टर अ‍ॅक्सेलसनला पराजित करणे वॉज अ बिग थिंग!
डेन्मार्क ओपनमध्ये महिला एकेरी अंतिम सामना पण जबरद्सस्त झाला. ओकुहारा-सिंधू सामन्यासारखाच. यावेळी इन्टॅनॉन वि. यामागुची असा सामना होता. इन्टॅनॉन परत फॉर्ममध्ये आली हे पाहून बरे वाटले.
पुरुष दुहेरीत मिनिअन्स (गिडिअन-सुकोमोइलो) वि. चीनची दुहेरी जोडी होती. मिनिअन्सने अपेक्षेप्रमाणे थरारक खेळ करून सामना घालवला Proud

फ्रेंच ओपन सुपरसिरीजमधील पुरुष एकेरीत भारताचे ६ खेळाडू आहे. चीनचे सुद्धा फक्त ५ खेळाडून राउंड ऑफ ६४ च्या ओपनिंग लाइनपमध्ये आहेत. गोपीचंद खराखुरा आधुनिक द्रोणाचार्य आहे

2017मध्ये सरस खेळाचे प्रदर्शन दाखवणार्या श्रीकांतचा दुबईमध्ये मात्र पराभव झाला. सिंधूने राउंड रॉबिनचे तिन्ही सामने जिंकले व आज चेन युफेईचा पराभव करून अंतिम फेरीत पोचली आहे. सिंधुचा अंतिम सामना आकाने यामागूचीशी आहे. यामागूचीला तिने राउंड रॉबिनमध्ये हारवले आहे.

दुबई वर्षाखेरीच्या स्पर्धेत फक्त 8 अग्रमानांकित खेळाडूना आमंत्रण असते. चार जणांचा एक असे दोन ग्रुप पाडून त्यात प्रथम राउंड रॉबिन पद्धतीने सामने होतात. प्रत्येक ग्रुपमधले दोन विजेते उपांत्य सामन्यात पोचतात व मग शेवटी अंतिम सामना.

आजची मॅच मस्तं झाली एकदम. दुसऱ्या गेमच्या शेवटी सिंधू ने वेळीच योग्य बदल केला म्हणून बरं झालं.

सिंधू महिला एकेरीतील ली चाँग वेई होत आहे की काय? वर्षभर उत्तम खेळ करायचा, आणि मोक्याच्या स्पर्धात रजतपदकावर समाधान मानायचे. साईनाविरुद्ध चीनची भिंत होती, सिंधुविरुद्ध जपानी त्सुनामी येते दरवेळी Sad

मिश्र दुहेरी वगळता चीनला एकही विजेतेपद नाही.

काल सिंधू जरा आजारी वाटत होती.. दुसर्‍या गेम मधे ५ - ० आघाडीवर होती, आणि तिथून मॅच जाण्याची सुरुवात झाली.. तो पर्यंत सहज जिंकेल असे वाटत होते पण अचानकच मॅच फिरली,, यामागुचीनी खेळात कमालीचा बदल केला.. काही रॅलीज मधे तर गेम चा स्पीड एकदम अचानक वाढवला, सिंधू मध्यम पेसच्या गेमच्या अपेक्षेनेच खेळत होती पण एकदम आणि सिंधूच्या टाळता येऊ शकणार्‍या चुका चांगल्याच वाढल्या.. काही सिंपल चुका फार महाग ठरल्या.. दोन सर्व्हीस फॉल्ट्स, आणि सहज जिंकता येणार्‍या गुणांमध्ये शटल बाहेर जाणे हे फारच दुखदायी होते.. समालोचक पण म्हणत होते की सिंधू तिचा सर्वोत्तम खेळ खेळत नाहीये.. पण एकूणच मॅच मस्त झाली.. पण जबरदस्त नाही झाली... तरी पण हे वर्ष सिंधूसाठी फलदायीच म्हणावे लागेल..

श्रीकांत किदम्बीचे हर्दिक अभिनंदन... कालच त्याला वर्ल्ड नंबर १ चे रँकींग जाहिरे झाले आहे...

कॉमनवेल्थ गेम्स मध्ये मिश्र सांघिक स्पर्धेत आपल्या संघाने जबरदस्त प्रदर्शन करत सुवर्ण पदक जिंकले आहे.. मलेशिया विरुद्धची फायनल मॅच मस्त झाली.. श्रीकांत ने ली चाँग वे ला किरकोळीत हारवले आहे. आता एकेरी आणि दुहेरीच्या स्पर्धा सुरु आहेत. त्याच्यात बघू काय होतंय ते..
दोन ते तीन पदकं मिळायची अपेक्षा आहे.

सायना आणि कश्यप यांना पुढील वैवाहिक आयुष्य समृद्धीचे आणि यशस्वी जावो ही सदिच्छा.

2018च्या बॅडमिंटन वर्ल्ड फायनल्समध्ये सिंधू सलग तिसऱ्या वेळेस. आता तासाभरात तिचा आणि इंटनॉनचा सामना सुरू आहे. सिंधूने पहिली गेम 21 16 घेतली. जवळजवळ पूर्ण वर्चस्व. दुसऱ्या गेममध्ये अत्यंत चुराशीचा खेळ दोघींकडून. शेवटचे 6 पॉईंट तर अटीतटीचे झाले. शेवटी 25 23ने सिंधूने गेम आणि सामना जिंकला.
सिंधू सलग तिसऱ्या वेळेस अंतिम फेरीत

समिर वर्मादेखील उपांत्य फेरीत पोचला आहे आणि त्याचा सामना चीनच्या शी युकी सोबत आहे.
महिला एकेरीत चीनची एकही खेळाडू नाही, पुरुष एकेरीत तसेच तिन्ही दुहेरी सामन्यात केवळ एक (मिश्रमध्ये 2).

जपान बॅडमिंटनमधील नवीन पॉवर हाउस बनले आहे.

भारतासाठी हे वर्ष फार यशस्वी ठरले नाही. श्रीकांतला फॉर्म गवसलाच नाही , समीर वर्माने चांगली कामगिरी केली. सिंधू अंतिम सामने ओळीने हारली. सायनाने अनपेक्षीत दमदार पुनरागमन केले. ती अजून एखाद दोन वर्षे तरी खेळेल असे वाटते आहे आता.

समीर वर्मा मस्त खेळला, दुसऱ्या गेममध्ये शेवटचे मोक्याचे पॉईंट्स घेतले असते तर त्याने सामना तिथेच जिंकला असता

काय सामना सुरू आहे!
सिंधुने सुरुवातीला चांगली आघाडी घेतली, आता ओकूहारा चांगले खेळू लागली आहे.
जिंकली बाई एकदाची पहिला गेम. 14 -6 सिंधू आघाडीवर होती, तिथून ओकूहाराने 16-16 बरोबरी केली आणि मग फक्त सीसॉ सुरू होता.
टेक्टिकल चेस गेम वरून एकदम ब्लिट्झ सुरू व्हावे तसा प्रकार झाला.
दुसऱ्या गेमला सुरुवात.
11-9 सिंधू आघाडीवर दुसऱ्या गेमच्या मध्यंतरात. पुन्हा टेक्टिकल गेम सुरू दोघींचा.
सिंधुला इतके पेशंटली खेळताना क्वचितच पाहिले आहे

2017च्या कोरियन ओपन नंतर सलग 7 अंतिम सामने 2018मध्ये हारल्यावर सिंधूने 2018ची वर्ल्ड फायनल्स अखेरीस जिंकली. What an achievement!!! पहिली भारतीय खेळाडू वर्ल्ड फायनलमध्ये जिंकणारी. यापुर्वी सायना व ज्वाला गुट्टा/दिजू यांनी रजत पदक कमावले आहे.

सिंधू निर्विवादपणे आता आजपर्यंतची भारताची सर्वोत्तम बॅडमिंटन खेळाडू आहे, पदुकोण, गोपी आणि सायनाच्यादेखील वरती एका पायरीवर. टेक या बाव!!