विंबल्डन - २०१०

Submitted by Adm on 16 June, 2010 - 21:53

ह्या वर्षीचीविंबल्डन टेनीस स्पर्धा येत्या सोमवार पासून म्हणजे २१ जून २०१० पासून सुरु होते आहे. स्पर्धेची मानांकनं आज जाहिर झाली. पुरुष एकेरीत गतविजेत्या रॉजर फेडररला अव्वल मानांकन मिळालय, तर महिला टेनीस वर विल्यम्स भगिनींनी निर्विवाद वर्चस्व सिध्द केलय. महिला एकेरी मध्ये सेरेना आणि व्हिनसला अनुक्रमे पहिलं आणि दुसरं तर महिला दुहेरीत ह्या जोडीला पहिलं मानांकन मिळालय.

हा धागा यंदाच्या विंबल्डन टेनीस स्पर्धेविषयी चर्चा करण्यासाठी...

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

विंबल्डन म्हणजे सगळ्या ग्रँड स्लॅम टेनिस मधला ज्वेल इन द क्राउन! आणी माझ्या मते यंदाही फेडररच इथे बाजी मारुन जाईल. पण नादाल व रॉडिक यांना पुर्ण माहीत आहे की ते इथे फेडररला पाचव्या सेटपर्यंत खेचुन नेउ शकतात व गेल्या ४ वर्षातल्या फेडररच्या या दोघांबरोबरच्या झालेल्या फायनल्स केवळ एपिक व अविस्मरणिय! त्यामुळे यंदाही त्यांच्याकडुन अजुन एक अन्फर्गेटेबल फायनल एक्स्पेक्ट करायला काही हरकत नाही. तसे झाले तर आपण टेनिसप्रेमींना अजुन काय पाहीजे?

जर यंदाही फेडरर इथे जिंकला तर तो सँप्रासच्या इथल्या ७ विजेतेपदाच्या विक्रमाची बरोबरी करेल. २००० मधे सँप्रासने तो पराक्रम केल्यावर कोणाला वाटले तरी होते की हे दशक संपायच्या आतच त्याचा तो विक्रम मोडीत निघु शकेल म्हणुन? पण रॉजर फेडरर नामक झंझावातामुळे ते आता या वर्षी विंबल्डनला प्रत्यक्षात घडु शकेल.

साहजीकच मग लोक तुलना करु लागतील की पीट सँप्रासची इथली ७ विजेतेपद कठिण की फेडररची इथली ७ विजेतेपद कठीण? तुमच्यासाठी या घ्या त्या दोघांच्या विंबल्डनमधल्या चौथ्या फेरीनंतरच्या
मॅचेस..

Well, whom did Sampras beat? Taking it from 4th round on at Wimbledon, we have:

1993: Andrew Foster (British wild card), Andre Agassi (defending champ), Boris Becker (past peak but still good), Jim Courier (at peak though hardly a grass-courter).
1994: Daniel Vacek (who?), Michael Chang (decent player, not a grass-courter), Todd Martin (good but not great), Goran Ivanisevic (good on grass).
1995: Greg Rusedski (ranked 60th at the time), Shuzo Matsuoka (one for the connoisseurs, shall we say?), Goran Ivanisevic, Boris Becker (past peak, still would win another slam next year though).
1996 he lost to Krajicek in the quarters.
1997: Petr Korda (decent player, hardly a demon on grass), Boris Becker (past it by now), Todd Woodbridge (doubles specialist), Cedric Pioline (decent, far from great).
1998: Sebastien Grosjean (ranked outside Top 100 at the time), Mark Philippoussis (good, not great), Tim Henman (ditto), Goran Ivanisevic (ranked 25th at the time but still dangerous on grass).
1999: Daniel Nestor (?), Mark Philippoussis, Tim Henman, Andre Agassi (resurgent & playing very well on surfaces at the time).
2000: Jonas Bjorkman (doubles specialist), Jan-Michael Gambill (overhyped journeyman), Vladimir Voltchkov (journeyman), Pat Rafter (nearly great).
2001 lost to 19-year-old Federer in the 4th round.

And whom did Federer beat?

2003: Feliciano Lopez (avarage player), Sjeng Schalken (underrated, but quite easy for the big players), Andy Roddick (good on grass), Mark Philippoussis (good, not great)

2004: Thomas Johansson (decent player on grass), Ivo Karlovic (Obviously tricky on grass with his serve), Lleyton Hewitt (A former champ and good grasscourter), Grosjean (decent on grass), Roddick (good grasscourter, nearly great)

2005: Nicolas Kiefer (decent player on grass), Ferrero (quite good on slow grass), Gonzalez (decent on slow grass), Hewitt (good grasscourt player), Roddick (same as above)

2006:Richard Gasquet (can be dangerous on grass), Tim Henman (past peak good grasscourt player), Nicolas Mahut (one of the last grasscourt specialists), Tomas Berdych (decent, dangerous sometimes), Mario Ancic (good on grasscourts), Nadal (very dangerous on slow grass, but had not reached his peak yet)

2007: Del Potro (junior Del Potro), Marat Safin (always dangerous, not very good on grass), Tommy Haas (good talented player on grass), Ferrero (decent), Gasquet (talented but a headcase), Nadal (one of the greats on slow grasscourts, here he was very confident on grass)

2008: Söderling (dangerous on grass), Hewitt (past peak champ), Ancic (always dangerous on grass), Safin (past peak but having a great tournament here), lost to Nadal (a great Nadal at his absolute peak, playing his best tennis and with confidence skyhigh defeats Fed in a marathon 5 set match)

2009: Kohlschreiber (decent player), Söderling (playing great tennis, good on grass), Karlovic (dangerous), Haas (good grasscourt player slightly past his peak), Roddick (at his absolute best almost beats him).

तुम्हीच ठरवा!:)

आदमा,हा धागा सुरू केल्याबद्दल धन्यवाद... Happy

मुकुंद मस्त माहिती दिलीस... मी तरी सँप्रास आणि फेडरर यांच्या विंबल्डन विजेतेपदंची तुलना करणार नाही.. दोघेही महान आहेत आणि माझे आवडते खेळाडु आहेत.. त्यांनी विंबल्डनमध्ये त्या त्या वेळेस मिळवलेलं प्रत्येक विजेतेपद हे श्रेष्ठच आहे..

विंबल्डन म्हणजे सगळ्या ग्रँड स्लॅम टेनिस मधला ज्वेल इन द क्राउन! आणी माझ्या मते यंदाही फेडररच इथे बाजी मारुन जाईल...!!! >>> या दोन्ही वाक्यांना १००१ मोदक Happy .

सही, विंबल्डनबद्दलचा धागा सुरू झाला तर आणि ओपनिंग स्टेटमेंट मुकुंदरावांनी एकदम जबरदस्त केलय. Happy माझा पण पाठिंबा फेडररलाच पण नदाल समोर तो खेळताना जीव तुटतो Wink नदाल कसला पळवतो प्रतिस्पर्ध्याला. जेव्हा नदाल विरुध्द एखादा पॉइंट हरतो तेव्हा फेडररच्या चेहेर्‍यावरील वैताग दिसून येतो.
चिवट, चपळ नदाल समोर संयमी फेडरर अशी फायनल बघायला मजा येईल.

रंगासेठ.. तुम्हाला तिथे सांगायला येणारच होतो.. की धागा सुरु झालाय आता या इकडे. Happy

मुकूंद.. छान पोस्ट.. Happy ओपनींग तरी जोरदार झालीये.. आता फॉर्म असाच ठेव म्हणजे झालं.. Wink
मी मयुरेशशी सहमत... पीट आणि फेडररच्या विंबल्डन विजेतेपदांमधे तुलना करता येणार नाही.. दोन्ही आपपल्या जागी ग्रेट आहेत.. !

अ‍ॅडम, धागा सुरु केल्याबद्दल धन्यवाद Happy मुकुंद, पराग म्हणतोय तसे फॉर्म कायम ठेवा आता.

गो फेडी !!! गो नादाल !!! गो किम !!! गो जस्टिन Happy

किमचा गेल्याच आठवड्यात बड्डे झाला. तिला बिलेटेड हॅपी बड्डे Happy

अ‍ॅडमा, मुकुंद धन्यवाद.
मी आताच फेडीचा कप घेतानाचा क्षण इमॅजिन करतेय. खूप उत्कंठा असणार आहे मेन्स साईडला.
सेरेना-व्हीनसने सातत्य राखायले हवे.
गो फेडी ! गो किम!

ज्ञाती.. विंबल्डन मधे गेल्या साधारण १० वर्षांमधे व्हिनस-सेरेना इतकं सातत्य कोणाचच नाहिये..
२००६ चा अपवाद वगळता प्रत्येक वर्षी ह्यांच्यापैकी एकतरी जण फायनलला आहेच.. Happy

मुकुंद, चांगली पोस्ट टाकली आहे. पण तुम्ही फेडररला जरा झुकते माप दिल्यासारखे वाटले. काही काही खेळाडू माहीतच नाहीत मला की ते डेंजरस आहेत म्हणून.. जसे कार्लोविच, अ‍ॅन्सिच वगैरे. पण असू शकतील. याउलट सॅंप्रासच्या लिस्टमधले खेळाडू जरा जास्त चांगले वाटले. अर्थात, नुसते 'वाटले' असे म्हणण्याला काही अर्थ नाही. आकडेवारी पाहिली असेल तुम्ही.

लालू, आयकॉन भारी आहे. Proud

गो इव्हानोविच!! Proud

बल्डन मधे गेल्या साधारण १० वर्षांमधे व्हिनस-सेरेना इतकं सातत्य कोणाचच नाहिये.>> हो मी एकाच वर्षाच्या चारही स्पर्धा जिंकण्याच्या दृष्टीने म्हटलं Happy डबलमध्ये ज्या सातत्याने जिन्कताहेत तसे.

शारापोव्हा ऐक लालूच Happy

फेडी जिंकेल / जिंकावा

शारापोव्हा जिंकेल असं म्हणायच धाडस मी करणार नाही पण जिंकावी असं नक्कीच वाटतं.

Adm / मुकुंद थॅन्क्स

फेडररच्या घड्याळात दुपारचे १:३० वाजलेत तर राफाच्या सकाळचे १०:३०/११.
माझा पाठिंबा पुन्हा राफाला.
सोमदेव क्वालिफाय करू शकला नाही विंबल्डन साठी...तो क्ले कोर्ट वर जास्त चांगला आहे का ग्रास कोर्ट पेक्षा.

आज ड्रॉ जाहिर झाले. मानांकनाप्रमाणे खेळाडू आपापले सामने जिंकत गेल्यास उपांत्यपूर्व फेरीचे सामने असे असतील.

फेडरर वि डेव्हिडेंको, जोकोविच वि रॉडीक
वरडास्को वि मरे, सोडर्लिंग वि नदाल

सेरेना वि राडावान्स्का, वोझनियाकी वि स्टोसुर
क्लायज्टर्स वि यांकोविच, स्किवोनी वि व्हिनस

हेनीन आणि किम चौथ्या फेरीत भेटू शकतात तर शारापोव्हा आणि सेरेना तिसर्‍या फेरीत भेटू शकतात. एकंदरीत शारापोव्हासाठी ड्रॉ जरा अवघडच आला आहे.

मी कालच विचार करत होतो.. फेडरर इथे ७ फायनल्स खेळला आहे. त्यातल्या ३ मधे रॉडिक त्याचा प्रतिस्पर्धी होता तर ३ मधे नादाल..!

पण या वर्षीच्या ड्रॉ प्रमाणे रॉडिक्-फेडरर फायनल अशक्यआहे. कारण ते उपांत्य फेरीतच भेटु शकतात म्हणजे त्यांच्यापैकी एकच कोणीतरी फायनलला जाउ शकतो. मला वाटत जाकोव्हिकला हरवुन रॉडिकच सेमिफायनलला यावा. रॉडिकचा खेळ विंबल्डनला मस्त सुट होतो... पण यंदाचा त्याचा फॉर्म कसा आहे?

तिकडे ब्रिटीश मिडिया त्या अँडी मरेचा उदो उदो करुन नुसते डोके पिकवत असतील सगळ्यांचे. आहेत का आपले मायबोलिकर कोणी इंग्लंडमधे? (चिमण्?)बिचारे हपापलेले आहेत ते की कोणी ब्रिटीश खेळाडु ती स्पर्धा जिंकावी म्हणुन. हेनमनने १२ वर्षे निराशा केली.. आता अँडी मरे काय दिवे लावतो ते बघायचे..:)

तिकडे ब्रिटीश मिडिया त्या अँडी मरेचा उदो उदो करुन नुसते डोके पिकवत असतील सगळ्यांचे.>>> Proud मरेना का तो!!!! जिंकणार नाही हे नक्की. मग किती का उदो उदो करेनात.

आपला पाठिंबा फेडी आणि किमला. Happy

आणी हो.. पराग,मयुरेश.. मान्य आहे की सँप्रास्-फेडररमधे तुलना होउ शकत नाही पण मी म्हटले आहे की सगळे त्या दोन ग्रेट प्लेयर्सची तुलना करणारच. मला माहीत आहे की कुठल्याही खेळात दोन भिन्नकालिन खेळाडुंची ऑब्जेटिव्ह तुलना करण अशक्य असते पण तरीही लोक तुलना करायचे थांबतात का? गावस्कर चांगला की तेंडुलकर, रिचर्ड्स चांगला की लारा? बॉर्डर ग्रेट कि पाँटिंग? हे वाद आपण क्रिकेटमधे पण वाचतोच की...:)

फचिन .. फेडररला झुकते माप दिले असे तुला वाटले याचे कारण माझा फेडररविषयी असलेला बायस असु शकेल पण मी शक्य तेवढे तटस्थपणे तुमच्यापुढे सगळ्या फॅक्ट्स ठेवण्याचा प्रामणिक प्रयत्न केला आहे.असो.

लालु... तु शॅरापोव्हाने सर्व्हिस सुधारावी असे म्हणत आहेस पण मला सांग की महिलांमधे (अगदी ख्रिस एव्हर्टपासुन ते स्टेफी ग्राफ ते आतापर्यंत) सर्व्हिसवर कोणाचे सातत्याने प्रभुत्व आहे? मला आठवत की स्टेफी ग्राफ व अरांचा सँकेज किंवा स्टेफी ग्राफ व मॉनिका सेलेसच्या मॅचेसमधे बर्‍याच वेळेला... एकापाठोपाठ एक स्वतःचे सर्व्हिस गेम ते हरायच्या.. पुरुषांमधे जसे सँप्रास्,बेकर,फेडरर किंवा रॉडि़क आपल्या सर्व्हिसवर ९५% वेळा हमखास जिंकायचेच किंवा जिंकतातच तसे सातत्य कोणत्याच महिला टेनिसपटुंच्या सर्व्हिसमधे दिसुन येत नाही. त्यामुळे (आम्हा)सर्व पुरुषांमधे फेव्हरेट असलेल्या क्युट शॅरापोव्हाला.. तिच्या सर्व्हिसवरुन डिवचायचे कारण नाही..:)

नंदिनी...बरोबर बोललीस..:)

त्यामुळे (आम्हा)सर्व पुरुषांमधे फेव्हरेट असलेल्या क्युट शॅरापोव्हाला.. तिच्या सर्व्हिसवरुन डिवचायचे कारण नाही.. >>> मुकुंदा Happy

गो फेडी...

.. आणि ल्युबिचिच बाहेर गेलाय... डेवेडेंकोच्या पण तंबूत गडबड आहेच.. पहिला सेट सहज हारलाय आणि दुसर्‍या सेट मध्ये ५-५ बरोबरी आहे...
फेडेक्स दुसरा सेट पण हरलाय... ७-५,६-४ अशी अवस्था आहे..

फेडरर २०१० मधे फक्त एक टायटल जिंकलाय ऑस्ट्रेलियन ओपन. त्याला hewitt, soderling, nadal, montanes, gulbis, berdych, baghdatis, davydenko एवढ्या जणांनी हरवलंय २०१० मधे.

नशीब फेडी तिसरा सेट कसातरी जिंकला... ६-४

तो फाल्ला (उच्चार काय आहे?) मस्तच खेळतोय.... फेडीची बॉडी लॅग्वेज 'जाउद्या ना घरी' अशीच आहे Sad

पण फाल्ला जखमी आहे असे समालोचक म्हणाला. तो ५ सेट टिकू शकणार नाही Sad फेडीचे नशिब बरे दिसतेय Happy

सिंडे तू... बांग्लादेश पाकिस्तान मेच बघती आहेस काय????

डेवेडेंको बाहेर पडायच्या मार्गावर.. ६-३,७-६,५-४ असा मागे पडलाय. फक्त त्याची सर्व्हिस आहे येवढाच काय तो फायदा..

सिंडे तू... बांग्लादेश पाकिस्तान मेच बघती आहेस काय???? >>> नाही. मी योग्य ती मॅच बघतीये. काळजी नसावी Proud

घेतला चौथा सेट. मधेच फायर इमर्जन्सीसाठी बाहेर जावे लागले Sad

गो फेडी!

मिल्या, तो स्ट्रॅटेजीचा भाग असतो कधी कधी. मागे पडलात तर उगाच दमून त्या सेटच्या जिंकण्याच्या मागे लागण्यापेक्षा जाऊ द्यावा, पुढचे असतातच. समोरचा दमणारा असेल तर चान्सेस वाढतात.

शारापोव्हाला 'हिणवले' इ. ज्यांचा समज झाला असेल त्यांनी तो आपल्या बुद्धीचा दोष समजावा. सर्व 'वीक' असणे आणि सातत्याचा काय संबंध?? तुम्ही अगदी १००% फर्स्ट सर्व टाकल्या पण त्यात स्पीड, व्हरायटी नसेल आणि समोरचा हाणत असेल तर काय उपयोग? एवढं कळत नाही??

Pages