क्रीडा

डायव्हिंग

Submitted by ललिता-प्रीति on 28 July, 2012 - 01:03

१३ दिवस, १३६ खेळाडू, ८ सुवर्णपदके

- १९०४ साली सेण्ट लुई इथल्या ऑलिंपिक खेळांमधे डायव्हिंगचा सर्वप्रथम समावेश झाला. लयबध्द डायव्हिंग या प्रकाराचा सिडनी २००० मधे सर्वप्रथम समावेश केला गेला.
१९व्या शतकात जिमनॅस्टस्‌ पाण्यात सराव करत. त्याला ‘फॅन्सी डायव्हिंग’ असे म्हटले जाई. आधुनिक डायव्हिंग या स्पर्धाप्रकाराची ही सुरूवात मानली जाते.

- लंडन येथे डायव्हिंगच्या स्पर्धा ऑलिंपिक पार्क-अ‍ॅक्वेटिक सेण्टर इथे भरवल्या जाणार आहेत.

- डायव्हिंगचा तलाव ५ मीटर खोल असतो.

- दोन प्रकारच्या डायव्हिंग-बोर्डचा वापर केला जातो :
१. प्लॅटफॉर्म : हा पाण्यापासून १० मीटर उंचीवर असतो.

जलतरण

Submitted by ललिता-प्रीति on 27 July, 2012 - 06:29

८ दिवस, ९०० स्पर्धक, ३२ सुवर्णपदके

- इ.स. १९०० मधील पॅरीस इथल्या ऑलिंपिक खेळांच्या वेळेस जलतरणाच्या स्पर्धा सीन नदीत भरवण्यात आल्या होत्या. १९०८ सालच्या लंडन ऑलिंपिक्समधे प्रथमच तरणतलावाचा वापर करण्यात आला. १९१२ सालच्या स्टॉकहोम ऑलिंपिक्समधे प्रथम महिला जलतरण स्पर्धा आयोजित करण्यात आल्या.

- १९०० सालच्या पॅरीस गेम्सच्या वेळेसच Underwater Swimmingच्याही स्पर्धा घेण्यात आल्या. खेळाडू जितका वेळ आणि जितके अंतर पाण्याखाली राहू शकेल, त्यानुसार त्याला गुण बहाल केले जात.

शब्दखुणा: 

फुटबॉल

Submitted by ललिता-प्रीति on 27 July, 2012 - 02:04

१३ दिवस, ५०४ खेळाडू, २ सुवर्णपदके

- १९०४ साली पॅरीस इथे झालेल्या ऑलिंपिकमधे फुटबॉलचा प्रथम समावेश करण्यात आला. त्यापश्चात प्रत्येक ऑलिंपिक स्पर्धेत हा खेळ खेळवला गेला, अपवाद १९३२ सालच्या लॉस एंजल्स येथील स्पर्धेचा.
महिला फुटबॉलचा समावेश सर्वप्रथम १९९६ सालच्या अ‍ॅटलांटा ऑलिंपिक स्पर्धांच्या वेळी करण्यात आला.

- एका सामन्यात ११-११ खेळाडूंचे दोन संघ एकमेकांशी झुंजतात. प्रत्येक संघाकडे ७ बदली खेळाडू असतात, जे मैदानातील खेळाडूची जागा घेऊ शकतात.

मिनिमलिस्ट शूजबद्दल चर्चा

Submitted by सानुली on 26 July, 2012 - 17:33

मॅरॅथॉन आणि १०के रनिंगच्या बाफवर मिनिमलिस्ट शूजबद्दल चर्चा चालू होती, तिच पुढे continue करण्यासाठी हा बाफ. "मी लिहिन" असं वैद्यबुवांनी सांगितलं आहे, तेव्हा बॉल त्यांच्या कोर्टात.

विषय: 

तिरंदाजी

Submitted by हिम्सकूल on 26 July, 2012 - 09:13

तिरंदाजी - खेळाबद्दल माहिती

- एकूण चार स्पर्धा - पुरुष वैयक्तिक, पुरुष सांघिक, महिला वैयक्तिक, महिला सांघिक

- एकूण सहभागी स्पर्धक १२८ (६४ पुरुष व ६४ महिला)
प्रत्येक सहभागी देशाच्या फक्त ६ खेळाडूंना सहभाग घेता येतो (३ पुरुष व ३ महिला)
वैयक्तिक प्रकारात ३ खेळाडू तर ३ खेळाडूंचा १ संघ

- तिरंदाजीचा समावेश १९०० साली झालेल्या पॅरिस ऑलिंपिकमध्ये केला गेला. त्यानंतर १९०८ साली लंडन मध्ये तिरंदाजी स्पर्धां वगळण्यात आली होती.१९२० साली एकदाच तिरंदाजीची स्पर्धां झाली.त्यानंतर ५२ वर्षांनी १९७२ मध्ये म्युनिक ऑलिम्पिकमध्ये तिरांदाजीला परत स्थान मिळाले ते अजूनही कायम आहे.

अमेरिकेच्या पूर्व किनार्‍यावर होऊ घातलेले उन्हाळी ए.वे.ए.ठि. २०१२

Submitted by स्वाती_आंबोळे on 17 July, 2012 - 10:48
तारीख/वेळ: 
25 August, 2012 - 11:00 to 18:00
ठिकाण/पत्ता: 
*****************************

चटणी मेरी..
3793 U.S. 1 Monmouth Junction, NJ 08852
(732) 422-7700
दुपारी १२:३० वाजता.
बुफे प्रत्येकी १२.९९ + ड्रिंक्स+टॅक्स्, ग्रॅचुईटी.. वगैरे..
.
नंतर मैत्रेयीकडे चहा.

*****************************

माहितीचा स्रोत: 
हॅ!
प्रांत/गाव: 

एअर रायफल शुटींग (माहिती हवी आहे)

Submitted by निवांत पाटील on 23 June, 2012 - 12:54

इथे कुणी एअर रायफल वापरतं का? अ‍ॅक्चुली हा प्रश्न मी मागच्या आठवड्यात विचारायला हवा होता. (गन विकत घ्यायच्या आधी) एनी वे. मला याबाबत मार्गदर्श्न हवयं. मी ०.२२ ची एअर रायफल घेतली आहे, टॉमी कंपनीची. आणि सराव भरपुर सुरु आहे (रोज साधारणपणे ७० ते ८० शॉट्स). पण मी जिथे नेम धरतो तेथे pellet न लागता दुसरीकडेच लागतो. सधारण पणे सेंतर वर नेम धरल्यास ५ वाजता जी पोझिशन अस्ते तेथे लागतो. दुकान्दाराचे म्हणणे असे आहे कि फायर करताना रायफल हलते त्यमुळे असे होते. पण १० शॉट पैकी १० (२० फुटावरुन) जर एकाच ठिकाणी लागत असतील तर मला वाटते कि काहितरी अ‍ॅ ड्जस्टमेंट चुकली आहे.

विषय: 

ब्रिजमधील अशीच एक गम्मत

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

आई-वडील आल्यामुळे आणि जयपण ईंटरेस्ट घेत असल्याने आजकाल रोज ब्रिजचा 'अड्डा' बसतो/जमतो. कालची अशीच एक गम्मत.

आमचा तीन बिनहुकुमीचा कॉल होता. बदामात माझ्याकडे गुलाम आणि एक पत्ता, जयकडे राणी आणि दोन पत्ते, आईकडे एक्का आणि ३ पत्ते आणि दादांकडे राजा आणि तीन पत्ते. चाली आलटून-पालटून दोन्हीकडे जात होती आणि तरीही माझ्या गुलामाचा हात झाला आणि शेवटचा हात आमचा आवश्यक असा नववा झाला तो चवकट सत्तीचा ज्यावर बदामचे राणी, राजा आणी एक्का असे तिघेही सर झाले.

(कुठेतरी लिहून ठेवायचे म्हणून इथे लिहीले आहे).

विषय: 
प्रकार: 
शब्दखुणा: 

युरोपियन कप फुटबॉल - २०१२

Submitted by लोला on 10 June, 2012 - 09:04

युरोपियन कप फुटबॉल (सॉकर) स्पर्धा सुरु झाली आहे. पोलंड आणि युक्रेनमध्ये हे सामने खेळले जात आहेत. फुटबॉल जगतात ही एक महत्त्वाची स्पर्धा आहे.
यावर चर्चा करण्यासाठी हा धागा-

वेबसाईट - http://www.uefa.com/uefaeuro/index.html

विषय: 

Pages

Subscribe to RSS - क्रीडा