इतर खेळ - बॉक्सिंग, तिरंदाजी, जलतरण

Submitted by रंगासेठ on 20 September, 2010 - 04:14

सध्या टेनीस, क्रिकेट, फुटबॉल या खेळांची चर्चा चाललीय, त्यांच्यासाठी स्वतंत्र धागे पण आहेत. पण इतर काही खेळ आहेत त्यांचासाठी स्वतंत्र असा धागा नाहीये. तेव्हा त्यात काही उल्लेखनीय घटना घडल्या की त्यांची माहिती या गप्पांच्या पानावर येउदेत.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पुण्याच्या सुचेता कडेठाणकर या मुलीने नुकतीच मंगोलियाभ्रमण मोहीम पूर्ण केली. त्याचा दुवा:
https://bitly.com/oAQslB

सुचेता साहसी व दमछाकी क्रीडाप्रकारात (endurance games) प्रवीण आहे. तिचे अनुभव आणि प्र.चि. कोण्या माबोकरास मिळवता येतील का?

आपला नम्र,
-गा.पै.

कराटे च्या सुद्धा स्पर्धा होतात पण त्याची बातमी पेपर मधे येत नाही..... मी स्वत: कराटे मधे नॅशनल / इन्टर नॅशनल मेडलीस्ट आहे पण अजुनही मुलींसाठी खेळामधे करीयर करण्यासाठी अजिबात अनुकूल नाही. अतिशय अनुत्साही वातावरण असते. खुप त्रास होतो हे पाहून.