मास्क म्हणलं की आधी ते चित्रपटातले आम्ही त्यांना वाचवू शकलो नाही म्हणणारे हिरव्या मास्कवाले डॉक्टर आठवतात. मास्क मध्ये पण बरेच प्रकार आले. मॅचिंग मास्क, कपल मास्क, फेस प्रिंट मास्क इ.
दोन दिवसांपूर्वी एक व्हिडिओ बघितला ज्यात एक छोटी मुलगी बाप्पांची मूर्ती घेऊन लपून बसते. आई विचारते तेव्हा म्हणते आपण गणपती बाप्पांना बाहेर घेऊन गेलो तर त्यांनाही कोरोना होईल ना?
पाल्याचे नाव : विजयालक्ष्मी
वय : ३ वर्षे १० महिने
खरंतर बुकमार्क स्पर्धेत भाग घ्यायचा विचार माझा होता. ब गटात. आज फ़ुरसत मिळाली आणि क्राफ्टचा डबा उघडला. पण आई काही करायला लागली की लुडबूड करण्याचा प्रत्येक बाळाचा जन्मसिद्ध हक्क असतो. तेव्हा आधी तिने बनवलेला बुकमार्क दाखवते.
साहित्य
रेडिमेड कपड्यान्चे प्राईस टॅग पुठ्ठे
आईचा जुना कुडता
कात्री
फब्रिक ग्लू
फैब्रिक कलर
भेंडी
हिरवा मार्कर पेन
जूना कुडत्याचे कापड कापून प्राईस टॅग वर चिटकवले. त्यावर फैब्रिक कलरनी भेंडीचे छापे मारले. मार्करने दांड्या रंगवल्या
वास्तविक पाहता शिवणकला हा माझा प्रांत नाही.कपड्याच्या काही किरकोळ दुरुस्त्या सोडल्यास आत्तापर्यंत माझा शिवणाशी दूरान्वयानेही संबंध आलेला नाही!
मात्र गेल्या वर्षी मायबोलीवरील काही मैत्रिणींमुळे embroidery शिकण्याचा योग आला.त्यामुळे बऱ्याच टाक्यांची ओळख झाली.
त्याचा फायदा असा झाला की कोरोनाच्या काळात रोजच्या वापरासाठी साधे मास्क विकत आणण्यापेक्षा हाताने मास्क शिवून बघावा ,जमेल असे वाटू लागले व मी स्वतःसाठी तीन पॅटर्नचे मास्क शिवले.
मायबोलीवरील मास्कच्या स्पर्धेमुळे काही तरी वेगळे करावेसे वाटू लागले. ही स्पर्धा आयोजित केल्याबद्दल संयोजकांचे आभार.
ब गट--
इथे बऱ्याच जणांनी पाने, फुले, क्रोशे, गणपती असे छान छान बुकमार्क्स बनवले आहेत. मी पण स्पर्धेत भाग घेण्याचं ठरवलं पण मला काहीतरी हटके बुकमार्क बनवायचं होतं. विचार करता करता मला हे सुचलं.
माझा इथे लिहिण्याचा पहिलाच प्रयत्न आहे. चूक झाल्यास क्षमस्व!
साहित्य: क्रोशाची सुई क्रमांक २.०, Anchor गडद गुलाबी धागा
वेळ: ४० मिनिटे
लांबी २८ सेंमी, रुंदी २ सेंमी
क्र. १

क्र.२

मास्क
वैशिष्ट्ये
1तीन पदरी(3 layered)
2 हातशिलाई करून बनवलेला
3 सुती
साहित्य: ड्रॉइंग पेपर,पेन्सिल,कात्री,मोजपट्टी-पॅटर्न काढून घेण्यासाठी,सुती कापड,सुई-दोरा,इलॅस्टिक,इस्त्री इ.
कृती:
1)27सेमी×20सेमी आकाराच्या ड्रॉइंग पेपरवर हवा असलेला पॅटर्न कापून घेतला.
2)मग त्याच्या सहाय्याने त्याच आकाराचे कापडाचे 3 तुकडे कापून घेतले.
3)ते तुकडे एकमेकावर अशा पध्दतीने जुळवून घेतले,की वरच्या व खालच्या तुकड्याची उलट बाजू बाहेरच्या बाजूस राहील.
मार्च्,एप्रिल्,मे काळामधे डॉक्ट्र्स्,नर्सेस्,तसंच अनेक सेवाभावी संस्थांना मास्क बनवून देण्यासाठी स्वयंसेवा केली,तेव्हा साधारण १५०-२०० मास्क्स बनवले होते.मास्क्सचे डिझाईन एकच ठेवायचे असल्या कारणानी फार कलाकुसर केली नाही आणि नेमका असा एक फोटो काढ्ला नाही,तेव्हा ग्रूप मधले मास्क्स असे फोटोज अपलोड करतेय्,चालत नसेल तर एंट्री बाद केली तरी चालेल 
साहित्य: उरलेले कागद्,दोरा, मणी
बुद्धिदेवता गणपतींच्या उत्सवात पुस्तकांचा बूकमार्क योग्य वाटला म्हणून तो बनवला 

माझ्यासारख्या आळशी आणि विसरभोळ्या लोकांसाठी जे पुस्तकाचे पूर्ण पानसुद्धा वाचून संपवत नाहीत आणि शेवटी कोणती ओळ वाचली ते सुद्धा लक्षात राहत नाही अश्याना बुकमार्कबरोबर सेन्टेन्स मार्कची सुद्धा गरज असते. अशांसाठी मी बनवलेला हा गणपती बाप्पा आणि उंदीरमामा यांचा बुकमार्क. यातील उंदीरमामा शिडीवरून खाली वर करतात आणि त्यांची शेपटी आपण शेवटचे कुठपर्यंत वाचलेय ते दर्शवते. तसेच या बुकशेल्फ मध्ये दोन कप्पे आहेत त्यात एखादी नोट उदा. फोन नंबर वैगैरे लिहून ठेऊ शकतो. सध्या मी एकामध्ये मायबोली हे पुस्तक आणि दुसऱ्यात गोल्डफिश पॉन्ड ठेवला आहे.