हल्लीच मी आणि अजून काही मायबोलीकरांनीही आपापले युट्यूब चॅनेल्स सुरू केलेत. त्याबद्दल मायबोलीवर सांगावे यास्तव हा धागाप्रपंच. मी माझ्या चॅनेलंबद्दल सांगेन. बाकीचे आपापल्या चॅनेलबद्दल सांगतील.
मी गेले नऊ वर्ष तांब्यापितळ्याच्या तारांपासून स्वतः डिझाईन करून दागिने व कलाकृती बनवते आहे. साडेपाच वर्षे झाली नी याच नावाने माझा छोटासा ब्रॅण्डही आहे तारांचे दागिने आणि इतर वस्तूंचा. काही मायबोलीकरांशी माझा इतर ठिकाणी संपर्क आहे त्यामुळे त्यांना माझ्या या सगळ्या उद्योगांबद्दल माहिती आहेच.
स्वयंपाकघरातील वापरून खराब झालेले लाकडी स्पॅचूला वापरून बनवलेले वॉल हँगिंग.
बेस म्हणून हल्दीरामचा ड्रायफ्रुट्सचा गिफ्ट बॉक्स घेतला आहे.
.

खास यावर्षीच्या दिवाळी अंकासाठी बनवलेली क्ले मिनिएचर मॅग्नेट्स..
गरमा गरम भाजलेलं मक्याचं कणीस!


स्टॉल वरची मोठ्या तव्यावरची खूप सारे बटर घालून बनवलेली पाव भाजी
मी बनवलेल्या मिनिएचर्स मधले हे सर्वात खरे खुरे वाटणारे मिनिएचर.. हे बनवताना वाटले नव्हते इतके सुंदर होईल असे.. मुळात मी शुद्ध शाकाहारी आहे त्यामुळे हे बघून तोंडाला पाणी सुटण्याएव्हढे खरे खुरे झाले आहे की नाही माहिती नाही.. 
रोस्टेड चिकन विथ बीअर
भाच्याला फुटबॉल प्रिय तर भाचे सुनेला जर्मन भाषा प्रिय। मग त्यांच्या लेकासाठी हा फुटबॉल विणला

भाचे जावयाला क्रिकेट प्रिय! मग त्याची हौस पुरवली 
Customized clay miniature..
हे इडली, मेदूवडा फॅन्स साठी स्पेशल.. 

.

.
कॉटन दोरा वापरून बहिणीच्या सहा वर्षाच्या नातीसाठी हा फ्रॉक क्रोशाने विणलाय


कुर्त्याच्या बाह्या ज्या वापरल्या गेल्या नाहीत पण कापड चांगले आहे म्हणून टाकूनही द्याव्याशा वाटल्या नाहीत. अशाच बाह्यांचे कापड वापरून मी मास्क हातशिलाईने शिवला आहे.