अर्थाअर्थी एंपरर अर्थात सम्राट पृविट पृथ्विराज: एक वैश्विक दळण

Submitted by अश्विनीमामी on 6 July, 2022 - 08:59

तर मंडळी, ज्याला गिर्‍हाइक नाही ते ओटीटीवर ह्या नवीन न्यायाने सम्राट पृथ्विराज प्राइम वर येउन आदळला आहे. आज पाउस म्हणून कामाला दांडी मारुन घरीबसलेली पण लोणावळ्यास न गेलेली निरुद्योगी म्हातारी पिसे काढायला सज्ज आहे. ( अश्या परिस्थितीत सुद्धा न बघावा असा हा चित्रपट आहे पण आह विल टेक वन फॉ द टीम!! टीम माबो झिंदाबाद म्हणारे.)

तर अगदी पहिल्या पाटीपासुनच खिदळायला सुरुवात ते डिस्क्लेमर येते त्यात वी डोंट वाँट टु पोर्ट्रे एन्ही ब्ला ब्ला ब्ला ब्ला ब्ला ब्ला ब्ला ब्ला इन बँड लाइट. सो फार सो गुड. पण तेच खाली हिंदीत आहे तिथे ही हम किसी भी ब्ला ब्ला को खराब रौशनी में चित्रीत करनेका इरादा नहीं रखते है!!!!
एका वाक्यात तीन उर्दू शब्द ते ही चुकीच्या भाषांतराने!! उदय चोप्राला तरी बसवायचे होते चुका सुधारायला. ( जो खुदही एक गलत्ती है वो औरों की गलतियां क्या सुधारेगा!!!) तर असो आता पुढे. दोन तास बारा मिनिटा चा हा पीळ!!

आता जोहारचे पण आम्ही समर्थन करत नाही म्हणे. नशीबच आमचे.

आता एकदम एक हिंदीत जोश पूर्ण गाणे शत्रुचा नि:पात करु रक्त वाहवू वगैरे. थेट गोकुल में मोहन कुरुक्षेत्र मे ं अर्जुन गायक प्रथिराज म्हणतो!! उदय किधर है तू!! मग लंका मे राव्ण असे नको म्हणून लंका मे रावण को राम सतावन. मार्शल म्हण तात तसे देशी संगीत. एक ग्लाडीएटर सारखे थिएटर येते व हे गझनी मधील आहे. सीजी चे पर्वत वगैरे. एक हिरव्या निळ्या रंगाचे कपडे मुकुट तलवार वाला मिया भाई मोठ्या खुर्चीत बसतो. व एक राज गायक टाइप माणूस( सोनू सूद - क्या क्या करना पडता पैसे के लिये... ) उच्च कोटीच्या हिंदीत प्रचे कौतूक चालू होते. हे बरं चालतं

तो प्र आंध ळा झालेला आहे. पण त्याला अजून एक संधी देत आहेत दयाळू सुलतान. मग तो एक मोठा सीजी हत्यार घेउन सज्ज होतो.
मध्येच एक लहान पणची आठवण. कुठे तरी पाउस पडलेला आहे त्या एक थेंबाचा आवाज ह्या बाल प्र ने ऐकला आहे म्हणे. ह्याने अगदी मस्त क्रीम कलरचा ड्रे स केला आहे. डिझाइनर.

आता बिचारा सीजी सिंह येतो व हा त्याला रक्तमय पद्धतीने मारतो. राजगायक डोळे विस्फारून बघत आहे. बाकी कैदी आत आहेत साखळ दंड घालून. प्रेक्षकातले मिया भाई कौतूक करतात. हे बराच वेळ चालते दोन तीन अजून सिंह आले आहेत. पण धरम पाजींची सर नाही( सं धरम वीर!!) हा त्यांना ही मारून मला फक्त आधी चुनोती देउन सांगा मी कोणाशी पण द्वंद्व करेन म्हणून बेशुद्ध होतो. व राजगायक त्याची मलम पट्टी करत आहे.

इतका खून खराबा बास सुरुवातीला म्हणून जरा सॉफ्ट टच लगेच कनोज ला ट्रानसफर. हिरविणीचा राजवाडा. समोरच तळे आहे व त्यात हिरवी पाने व अनेक कमळे फुलली आहेत( सट्टल सट्टल) परत प्र चे कौतूक वाले गाणे. आजकाल हौशी तुनळी वाले कसे काही एक दोन नावांचीच तुतारी वाजवत राहतात मुद्दा सापडला नाही की तसे चालू आहे. हिरवीण गुलाबी ड्रेसात अवखळ पणा करत आहे. लहानच आहे ती मुलगी. ही काय मिस इंडिया एकदम आर्डिनरी गांव की छोरी दिसते. आता ह्यांचे दूरसे प्रियाराधन चालू आहे. नाव कोरलेले तीर पाठवणे, रंग
खुश्बू पाठवणे ही संस्कारी असल्याने हिने त्याच्या नावाचे कुंकू आधीच भाळी लावले आहे. लगेच होली कब है कब है होली!!

इधर तो बसंती की याद आना बनता है.

एक माणूस परत डोळ्याला पट्टी बांधून फागुन आयोरे. फेक राजस्थानी. हे एकीक डे. ह्याच्या कडे केशरी रंग. व एक सुमार गाणे. हिरव णी कडे त्या कमळ तळयात पडून अंग विक्षेप करणे मुली मुलींची संस्कारी होली. पियाला हे कर ते कर अशी प्रेमळ विनवणी. हे वाडे नक्की बाहुबलीत शोभतील असेच आहेत. लगेच हिरोला ती इथे असल्याचा भास होतो. हिने पण कंबरेला चेन बांधली आहे. पण शोभत नाही. आपली स्मिता बघा आज रपट जाये मधे. दोज लेडीज हँव सम इट . हद करदे पिया हद करदे हर सरहद को रद्द करदे म्हणे.

मिशीवाला म्हातारा पडोसन मधल्या ओम प्रकाश वाणी दिसत आहे.

आता मीर हुसेन गजनी महमुदाच्या भावाचे काही नाजूक प्रकरण आहे. त्याने एक बाई पळवून आणले आहे. व त्याला शरण हवे आहे.
आता प्र लगेच शरण मे आनेवालेका रक्षण करना हिंदू का धरम है मै धर्म का पालन करुंगा धर्म के लिये जियुन्गा मरुंगा. व
सोमनाथ मंदिरा संबंधी भावना प्रधान संवाद आहे. चित्रलेखाचा सन्मान आहे.

आता परत ते प्र कौतूक रक्त रंजीत गाणे आहे. व एक कौतूकाचा संवादही आहे. प्र चे व्हॅनिटी सीजी शॉट आहेत व प्र प्र असा कोरस.
बरोबर शंभर लोक्स घोडे स्वार.

सुलतान कुतुबुद्दीन ऐबकला अजमेर जिंकायला पाठवतो. हा लगेच प्र च्या दरबारात येतो. फाय्बर ग्लास च्या हत्तीचा दगड बनवला आहे
प्र लगेच मीर हुसेन चा मी प्रतिपाळ करेन ऐबक लगेच हाणा मारीची धमकी देतो. हाउ रूड. प्रेमाचा तिढा समजत नाही का ऐबक आता
लढावेच लागेल असा वाइट चेहरा करतो.

सर्व सैनीक डिझानर ड्रेसेस व केशरी फेटे लावून आहेत. ओव्हर किल रिअली.

लगेच प्रचंड युद्धाचा शॉट. मोठ मोठे सेनेचे शॉट्स आभाळातून बाणांचा वर्शाव शेवटी हत्तीवरचा सुलतान कोण आहे तो खाली पडतो
संजय दत्तची वीरश्री!! मग लढाई. प्र एकदम उडी मारून सुलतानाला पाडतो. मरायला टेकल्यावरही सुलतानाच्या चेहर्‍यावर भाव नाहीत.
सुलतान साखळदंड घालून दरबारात आला आहे. संजय दत्त रॉकी टाइप बंबईया हिंदीच बोलत आहे.

परत प्र चे कौतूक व त्यानंतर आगमन होते. जगात सर्वात वीर तो हाच. हा सुलतानाला तलवार घोडा वस्त्र देउन परत पाठवतो. हे सर्व राजगायकाला पंडिताला भट भटवे असे म्हणत आहेत व हसत आहेत.

कट टू कनोज ते अगम्य श्लोकांच्या पार्श्वसंगीतावर कोणतरी गुरू हिरवेणी कडे येतात. हे साउथ पिक्चर मधल्या सारखे ड्रेस केलेले आहेत.
प्र ला दिल्लीत बोलावुन राज्याभि शेक करायचे चालले आहे असे कळते.

प्रच सिंहासना साठी ग्रेट आहे असे नाना सांगतात. इथे ही एक दावेदार आहे सिंहासना साठी. बारके युद्ध होणारच. आता घाटाचा सीन. हिरवीन या नं मला लग्न करुन न्यानं असा खलिता पाठव ते व दिल्ली मुबारक म्हणते. आता प्रचा दिल्ली राज्या भिषेक दाखिवला आहे.

ह्याला पब्लिक अन्नदाता म्हणत आहे. प्रचे मसनदीवर मोठ्या लोडाला टेकून बसलेले खूपच शॉट्स आहेत.

कन्नोज वाला माणूस अर्धी दिल्ली मागायला आला आहे. व दिली नाही तर लगेच युद्ध. जयचंद बरोबर. प्र आता कनोज पती बरोबर युद्ध करेल. कनोज पती फुल दिल्ली घ्यायलाच बसला आहे आता तर व फुल्टू युद्ध मोड मध्ये आहे. मग संयोगि ता चे स्वयंवराचे ठरत आहे.
पण ऑफ ऑल थिंग्ज प्रची मूर्ती बनवून त्याच्याशी युद्ध करणार म्हणे!!! संयोगिता प्र च्या बाजूने भांडते. व आपले पवित्र प्रेम व्यक्त करते. साक्षी तन्वर पण राजस्थानी ड्रेस घालून उभी आहे व संयोगिता ला गप्प करत आहे. सं प्र शी लग्न केले नाही तर जीवन भर कुंवारी राहील म्हणे.
अगेन व्हाइट ऑरेंज मीटिन्ग - हे फार रिपिटॅटिव्ह होत चालले आहे. सैन्याला युद्धच करायचे आहे.

हुस्श अजून दीड तास आहे. थोडा ब्रेक घेते.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कालच बायको म्हणाली, प्राईमवर पृथ्वीराज आलाय
त्यावर मी ईतका घाणेरडा लूक दिला...
लगेच ती म्हणाली, बघायचा मलाही नाहीये. मी फक्त सांगतेय तुला.

ओटीटीवर देखील हा पिक्चर फारसा बघितला जाईल असे वाटत नाही.
आता फक्त एकच शक्यता आहे - माबोवरचे काही धुरंदर याची खेचतील तर ईतर माबोकर कायेय म्हणून उत्सुकतेने बघायला जातील...

मी पिच्चर बघितलेला नाहीये पण इतरांकडून ऐकले ते असे कि
अक्षयकुमार अजिबात राजा वगैरे वाटत नाही. पृथ्वीराज कपूर कसा अकबर म्हणून अनारकली सॉरी मुघले आझम मध्ये शोभला. अक्षयकुमारचा काही गैरसमज झाला असावा कि हि वेलकम सारखी कॉमेडी सीरिअल आहे.
+ त्याच्या फेक मिशा! अस म्हणतात कि प्राडक्षनवाले त्याच्यावर नाराज होते. त्यांची इच्छा होती कि त्याने खऱ्या मिशा वाढवायला पाहिजे होत्या. आता अक्षयकुमारने तस का केल नाही? त्यालाच माहित.

ट्रेलर बघितल्या पासूनच 'नक्को' असं वाटलेलं. अक्षय कुमारचा 'बाला' लूक च एक्स्टेंड केल्यासारखा वाटतोय फक्त केस वाढलेले. ती मानुषी तर केवढे चपटे केस घेऊन मिरवतेय. अजिबात प्रॉमिसिंग वाटत नाही. तिला कॉन्ट्रॅक्ट नुसार मिळाला असावा हा सिनेमा. (मिस वर्ल्ड झाल्यावर असतं असं कॉन्ट्रॅक्ट म्हणे १-२ सिनेमांचं )
ह्या सगळ्या ऐतिहासिक बायका पुस्तकात वाचताना कसल्या भारी सौंदर्यवान वाटतात. त्यांच्या सौंदर्याचं वर्णन २ पानं
भरून असतं. सिनेमा निघाला की अशा तेलकट चपट्या कशा काय निवडतात? eg. दिपिका as मस्तानी, पद्मावती.
ऐश्वर्या आणि ह्रितिक शोभेल होते पण जोधा-अकबरमधे.

शेवटी हा हिंदी पिक्चरच्या लैनीवर गेला असणार. कुठलाही हिंदी पिक्चर असो शेवटी तो
"xxxxxx ची अमर प्रेम कहानी" च्या वळणावर जातो.

Happy मलाही नकली वाटली, मी (अनेक कारणांनी) सिनेमा पंधरा मिनिटात बंद केला. ती ही मिशी तर नव्हे, ह्या गाण्यातली जी अक्षयने पुन्हा वापरली असं वाटलं.
अक्षयचा एकंदर लूक फेक वाटला, मानुषीचा वावर अतिशय निस्तेज आहे.

ऐतिहासिक सिनेमे सध्या कसे बनतात याचा अचूक आणि मनोरंजक वेध घेतलाय. अक्षय कुमार ऐतिहासिक कपडेपटात विसंगत वाटतो. त्याने आता उप्पर की बंदूक - भाग १, २, ३ / असंभव ध्येय - १,२ ,३ असे क्रुझीय चित्रपट बनवावेत.
या परीक्षणामुळे शहाणे लोक या सिनेमापासून दूर राहतील.माझ्यासारखे बघू तरी कसं कसं केलंय नेमकं तसं तसं म्हणून वेगळ्या पद्धतीची करमणूक शोधायला बघतील. एसी करण्ट असतो तशाच पद्धतीने मनोरंजन पण होतं अशा सिनेमांनी. (एसी करण्ट म्हणजे एकदा पॉझिटिव्ह एकदा निगेटिव्ह वाली साईन वेव्ह) !

धाकड
पृथ्वीराज
नंबी

सगळे लडबडले .
देशप्रेम शिकवत फिरत होते

प्र ला दिल्लीत बोलावुन राज्याभि शेक करायचे चालले आहे असे कळते >>> Happy अमा, त्यावेळच्या नृत्याचे वर्णन म्हणून वेगळा "श" वापरलात का? Happy

पण ऑफ ऑल थिंग्ज प्रची मूर्ती बनवून त्याच्याशी युद्ध करणार म्हणे!!! >>> त्यापेक्षा त्या सुलतानाची मुर्ती बनवायची. कोणाला पत्ताही लागला नसता असे त्याच्या अभिनयाच्या वर्णनावरून वाटते.

संजय दत्त रॉकी टाइप बंबईया हिंदीच बोलत आहे. >> Lol दरबाराती हुजर्‍यांनी माबदौलत, शहेनशाह-ए-हिंद वगैरे उपाध्या लावून स्वागत केल्यावर सिंहासनावर बसून सुलतान "बोले तो वाट लगेला है" असे म्हणतोय असे डोळ्यासमोर आले Happy

“ संजय दत्त रॉकी टाइप बंबईया हिंदीच बोलत आहे” - इथे त्याच्या कन्सिस्टंन्सीला मानलं पाहिजे. त्याने पानिपतमधल्या अब्दालीला सुद्धा सर्किट-मुन्नाचा फील दिला होता. उद्या अफझलखानाचा रोल मिळाला तर शामियान्यात महाराजांना ‘झप्पी’ दिल्याशिवाय रहाणार नाही. Happy

अमा Lol

या सिनेमातली माझ्यामते एकमेव इंटरेस्टिंग गोष्ट - संजय दत्त सोनु सूदला भट असे संबोधताना दाखवला आहे. पण जेव्हा सूद त्याच्या मृत्युचे भाकीत त्याला साळसूदपणे सांगतो तेव्हा दत्त लाडात येऊन त्याला "भट-वे" असे संबोधतो. हे भट-वे त्याच्या टपोरी अ‍ॅक्सेंटमध्ये, त्या संदर्भात प्रचंड हास्यास्पद आहे.
उर्वरित सिनेमा फक्त राजसूय यज्ञात सत्यनारायणाप्रमाणेच केळीचे खुंट लागतात, वैष्णव असलेल्या चाहमान-चौहान राज्यात सर्व शैव पद्धतीचे गंध लावून फिरत असत वगैरे मौलिक माहितीचे आदान-प्रदान आहे.

पायस, धाग्यावर पायधूळ झाडलीत धन्यवाद हो. चार चांद लागले. पण तुमचे पण इन्पुट द्या हो. मला तुमच्या इतके छान विनोदी नाही लिहिता येत.

तर पुढे:

साक्षी तणावाखाली व र पॅन इंडिया नॉर्थ इंडिअन घुंगट वाला ड्रेस घालून बसली आहे. राजकुमारीचे लगन फक्त प्रेमा साठी होत नसते असे कडक स्वरात सांगते. हिरवीण क्या प्रेम करणेका हक नाही.
साक्षी जेम्सः जिस समाज में हम रह रहे है वहा स्त्री प्रेम के लिये लडना शौर्यकी बात है. पुढे डिरेक्ट मनु स्मृतीचः विवाह से पहले पुत्री को पप्पा के आदेश का पालन कर णा होता है . विवाह के बाद पती के आदेशोंका पालन करणा होता है. पती मेल्यानंतर पुत्र के आदे श का पालन करना होता है. ( सेन्सॉर बोर्ड मेला कि काय!! होली काली मां) हिरवीण कधी उर्दु मिश्रीत तर कधी एकदम यतो धर्म ततो ... वगैरे बोलत आहे. प्र ला स्वयंवर ला बोलवत च नाहीत. त्याला बोलवा नाहीतर मी यज्ञात उडी घेइन अशी धमकी देते. हे प्रेम अजून एकमेकांना न बघता सुरु कसे झाले !! ही मिस्ट्रीच आहे.

अगम्य संस्कृत श्लोक मारवाडी पद्धतीने पाया दाबून बायका नमस्कार करत आहेत व स्वयंवराचा सीन आहे. मुलगी पडद्या आडून येत आहे पण समोरुन दिस्तेच की. इथे महाभारतातली रुपा गांगुली आठवते. हात लावला तर चटका बसेल इतकी जबरद्स्त दिसत असे ती. ते दाढी वाले सद्गुरू म्हणतात की प्रत्येक राज्याचे कौतूक होईल व मग तुला पटले तर तू माळ घाल. अमोझॉन रिव्यू सारखे. ही एकदम धर्माचे पालन करायला नकारच देते व निघून जात आहे. जयचंद रागाने तिच्या मागे येतो. ती तडक मूर्तीला माळ घालून टाकते. वडील तिला मारायला निघाले आहेत. साक्षी तण वर लगेचच तलवार मागे घेते. दर वाक्यात धर्म अधर्म ब्ला ब्ला चालू. आहे.

आता वेट वेट पांढर्‍या घोड्यवरून व बाकीचा फौज फाटा घेउन मिशीवाला प्र आला आहे. व संयोगिताला उचलून गोड्यावर बसवतो. सारे राजे वडील तलवार धरून फक्त बघत आहे. तर हिची मेड आम्हाला पण घे म्हणते. इतर सेविका पण सैनिकाच्या मागे बसतात मग निघून जायच्या ऐवजी डायलॉग बाजी. हिंमत असेल तर तिला परत नेह. साक्षी तन्वर लापण जायचे असावे. एक पोरगी संज य दत्त च्या मागे बसली आहे तिथे ही फिट झाली असती.

मागे जयचंद बाकीचे राजे जे उगी च टायम वेस्ट झाला म्हणून उखडले आहेत. ते मुलीला कुमरी म्हणत आहेत. स्त्री संमान वगैरे बोलणी चालत आहे. यातो प्राण या प्रण असे जयदेव साक्षीचा बेत काय आहे!! जहर प्या म्हणोन नवृयाला सांगते!! ये क्या खिचडी पक रही है. पण ते जाउदे इथे कधीही न भेटलेले प्रेमी एकांतात आहेत व प्रेमाराधन चालू आहे. मिशीवाले एकदम शिळ्या उपम्या सारखे फ्रेश दिसत आहेत. तुम कविता से भी खूब सुरत हो . ही लगेच इशक हुस्न वगैरे करायला लागते इथे बरी उर्दूच लागते.

आता राज्यात दोन वेग वेगळ्या घोड्यांवरून आगमन. चौहान लोकांची बैठक बसली आहे. व हिरवीणीला परत पाठवा परत लग्न करुन आलेली आहे. चौहान मॅन परत लडकी की डोली पिता के घरसे अर्थी पतीके घर से निकली है तो ही करेक्ट है म्हणतो. ही पंचायत मध्ये तुमच्या एका देवाने पण बायको पळवली होती. तर चौहान दाढिवाला छोकरी तू पंचायतसे प पंजा लढवत आहेस असा इशारा देतो. पंच व्हाइट फेटा वाले आहेत.

लगेच प्र कुरुक्षेत्रात १० अक्ष्होहिणी सेना मेली धर्मासाठी आता एक चौहा न मरे तो क्या.( पण इथे प्रेक्षक प्रोडुसर डिस्ट्रिब्युटर मरत आहेत त्याचे काय!!) मग देवा ब्रामण अगनी साक्षीने लगन होते. व लगेच सुरज उवा मध्यम टाइप गाणे चालू होते. काय तर घोड्यावरौन वाळवंटात रपेट. दिवसा रात्री पण तेच. बाहेर जेवण धनुर्बाण शिक व णे. हिरविणीने अंघोळ करून केस सोडून पुजेचा धूर देत फिरणे व हिरो ने तिच्याकडे लस्टिली बघणॅ. - नॉर्थ इंडियन रोमान्स चा लोएस्ट कॉमन डिनॉमिनेटर. - पण पिक्चर फेल गेला तो गेलाच.

ज्यचंद प्र ला पकडून आणावे असा आधेस देतो. व धर्म वगैरे करून अ‍ॅटेक करायला येतात प्र वर. गौड पुर किल्ला इथे लढाई होते. भट व संजय दत्त युद्धाला जायचे म्हण त आहेत. पण सम्राट बायकोला घेउन कुलदैवताच्या दर्शनाला गेला आहे तो यायची वाट बघत आहे. संजय दत्त अधोन मधून सवडीने डोळ्याला बारीक पट्टी बांधून आहे. बाकीचे चार एक्स्ट्रा पण मौत को बोलो चामुंड आ रहाहे हा आरहा वो जारहा है करून जातात व गुडपुर किल्ल्यापाशी लढाई होते. एकदम जय भवानी जय अंबा इकडे प्र बायको बरोबर टिपर्‍या खेळत आहे. काय हे. एक दूत तरी पाठवायचा होता. इदर लोगा मररे इन्हे इशक्बाजी कररा.

ते रासलीला फ्लो अर एकदम पर्गो लेव्हलचे आहे. इकडे संद पण मरतो. ६४ लोक्स मरतात. स्मॉल अफेअर. पण सर्व साध्या कपड्यात आहेत. तो शैव तिलक लावलेला राज भट पण शेजारी बसून धीर देत आहे. हे सर्व हिरवीणीस चांद म्हण तात. किती गोड ना. अगदी खरो खरच्या चंद्रासाअर्खीच आहे. हे फ्युनरल टाइप शोक व्यक्त मध्येच गुलाबी फेटे वाले एक फौज येते व केशरी कपडे कुंकु घेउन त्या मेलेल्यांचे पुत्र आलेले आहेत.

को ण तरी पैसे वाला जयचंद्र ला भेटायला आला आहे. दिल्ली का सौदागर म्हणे. ह्याने उगीचच दारवानाला पैसे दिलेत. ज. त्याला गझनीला
पा ठवून सुलतानाशी एक डील करवतो. प्र फेमिनिस्ट पण आहे. बायकोला नटवून दरबारात बसवणार आहे. सवाल बराबरी का है. मेरे आपका स्थान बराबर, हक बराबर हे ते. वर खाली नाय साइड्वेज. ही नटुन बसते पण दरबारात कोणीच बोलत नाही शेवटी एक म्हातारा येतो. प्र लगेच एक वाक्य सोडतो. राणी ला आतच ठेवा म्हणतो. प्र फुल फेमिनिस्ट मोड मध्ये आहे. भट लगेच काही तरी मंदीर इशू काढतो. चांद लगेच उठून क्षमामागते शासन धर्मसे चलता है, स्त्री चे महत्व सांगते. हिला उगीच फुटेज दिले आहे. पण आपले भाग फुटे आहेत. हिला काय पण बोलता येत नाही. स्त्री के सन्मान मध्ये तलवार उठा वतात सर्व लोग करत जय भवानी जय भवानी. ही बैठक कलर स्कीम अनेक भगव्या शेड्स व्हाइट मध्ये आह्त. व रानीजी ला न्याय निवाडा करायचा हक्क मिळतो. दरबार खतम.

आता हपिसला जाउन हायटेक खर्डेघाशी करायला होवी. बाकी उद्या लिहि ते. पैसे फेकणारा सौदागर सुलताना कडे आलेला आहे.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चौहान यांच्या जीवनावर एक चित्रपट आला आहे असे समजते. बहुधा त्याच चित्रपटाची कथा आहे. संगीत अपलोड केलेले आढळले नाही.

मस्त चिरफाड केलेय आता त्यात काय त्यासाठी बघायची इच्छा होतेय.

धाकड
पृथ्वीराज
नंबी

सगळे लडबडले .
देशप्रेम शिकवत फिरत होते-- रॉकेट्री बघा ब्लॅककॅट थिएटर ला आहे तोंपर्यंत, पैसे वाया जाणार नाहीत. आर माधवनने चांगले काम केले आहे सरप्राईज एलिमेंट शाहरुख पण आहे पण त्याही पेक्षा नंम्बि नारायणन या ध्येयवेड्या माणसासाठी बघा .

ह्या सगळ्या ऐतिहासिक बायका पुस्तकात वाचताना कसल्या भारी सौंदर्यवान वाटतात. त्यांच्या सौंदर्याचं वर्णन २ पानं
भरून असतं. सिनेमा निघाला की अशा तेलकट चपट्या कशा काय निवडतात? eg. दिपिका as मस्तानी, पद्मावती.
ऐश्वर्या आणि ह्रितिक शोभेल होते पण जोधा-अकबरमधे.
>>>
@मी चिन्मयी - अगदी अगदी. यांना मॉडेलसारख्या अभारतिय सौंदर्य असलेल्या राण्या का दाखवाव्या वाटतात? आत्ता उठून कॅटवॉकला जातील असे वाटते. पुस्तकातल्या सौंदर्याचे वर्णन समजत नसेल तर स्वातंत्र्यपूर्व काळातल्या खर्‍याखुर्‍या राण्यांचे (गायत्रीदेवी, त्यांची आई, हैद्राबादच्या बेगमा वगैरे) फोटो बघून घ्या एकदा. नजर ठरत नाही असे आरसपानी सौदर्य आणि अंगभूत आब असतो. मुगल-ए-आज़म च्या दुर्गाबाई, मधुबाला जाऊ द्या, निगार सुलताना काय कुर्रेबाज दिसली होती. झुबैदा मधे बघा - रेखा आणि करिश्मा कपूर खर्‍या राणीसारख्या दिसतात. अगदी केकता कपूरच्या जोधा अकबरमधल्या राण्यासुद्धा बर्या वाटल्या होत्या यांच्यापेक्षा.

मृणाल देव तरूण असताना धडाधड ऐतिहासिक सिनेमे काढले असते तर बरं झालं असतं. अजून वेळ गेलेली नाही. आपली अनुष्का शेट्टी आहे. ती जोपर्यंत सुंदर दिसतेय तोपर्यंत (प्रवडत असेल तर) तिला घेऊन सर्व ऐतिहासिक राण्यांची पात्रं साकारून घ्या. सिनेमे नंतर पूर्ण केले तरी चालतील.

Pages