.

Submitted by शांत प्राणी on 22 June, 2022 - 15:01

.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लेख
मध्यंतरी नायकच खलनायकाच्या भुमिकेत काम करू लागल्याने खलनायकाचे महत्व लोप पावतेय का असे वाटू लागलेले.
पण पुन्हा चित्र बदलले..
सविस्तर नंतर.. यावर माझा रुमाल.. शुभरात्री Happy

छानच लिहिलं आहे. आइये मेहेरबां गाण्यामुळे हा चेहरा चांगला लक्षात आहे. तीसरी मंझिल खूप पूर्वी बघितला आहे.

छान लिहिलंय..
के. एन. सिंग म्हटल्यावर "कहीं पे निगाहें कहीं पे निशाना" हे गाणं डोळ्यासमोर येतंच..

छान लेख व उत्तम आढावा. के. एन.सिंग यांना पाहिलेच की हा माणूस पाताळयंत्री असणार असे वाटायचे.

BTW तिसरी मंझिल मध्ये के. एन.सिंग कुठे होते? प्रेम चोप्रा व प्रेमनाथ होते ना?

धन्यवाद सर्वांचे.

वावे, हे गाणं आठवत होतो, काल काही केल्या आठवले नाही. धन्यवाद उल्लेख केल्याबद्दल. Happy

BTW तिसरी मंझिल मध्ये के. एन.सिंग कुठे होते? >>> लिंक वर क्लिक करून पहा.
https://m.imdb.com/title/tt0061073/fullcredits/cast

मस्त लेख

असं वाटतं हा माणूस उगाच खलनायक झाला
हिरोला साजेसे रूप आणि शरीरयष्टी असतानाही

तोच तोच पणाचा अतिरेक करण्यात अमरीश पुरी पण होते
चित्रविचित्र गेटअप केले तरी मूळ गाभा तोच
अर्थात यात निर्माते दिग्दर्शक यांचाच दोष कारण नंतर इतक्या सुंदर भूमिका केल्या आहेत त्यांनी
बघता बघता खलनायक ते करारी पण प्रेमळ बाप असे ट्रान्सफॉम् झाले
फार थोडे खलनायकानी हे केलं

छानच लेख.
आज तीसरी मंझील बघे न. हा चित्रपट गाण्यांच्या मध्ये मध्ये खूप बोअर आहे बाई.

त्रिशुल सिनेमात. हेमा मालिनी व शशी कपूर मध्ये केमिस्ट्री आहे व तिला पण तो आव्डतो. तश्या अर्थाने. अमिताभ ह्या फॅमिलीला डिस्ट्रॉय करायच्या हेतुने पेटलेला आहे. पण इतके सॉफिस्टिकेटेड वागतो. एकाठिकाणी हेमा शशी अमित क्लब मध्ये बसलेले असतात तर अमित ज्या पद्धतीने शशीच्या कार कीज लपवतो. ते फार उच्च सॉफ्ट अ‍ॅक्टिन्ग आहे. एकदा सीन घरी जाउन परत बघते मग लिहिते. पण व्हिलनी असावी तर अशी. सिल्क ने गळा कापावा तसे.

छान लेख.
अनिरुद्ध, कहीं पे निगाहें साठी +११

लेख चांगला आहे पण उगीचच गुल्लुला वाईट म्हणायची गरज नव्हती. त्याच्या काळात त्याने खुप मस्त खलनायक साकारले आहेत. (एक उदाहरण म्हणून १६ डिसेंबर पहा)

आमच्या मित्रमंडळीत, के एन सिंग विलन ऐवजी विनोदि नटांत गणला जायचा. सगळ्या चित्रपटांत कायम असलेली त्याची स्टाइल, डायलॉग डिलिवरी इ. विनोदिच होती...

चांगला लेख आहे.
अमा काय आठवण काढलीत! मस्त सीन आहे तो. त्रिशूल ऑटाफे मूव्ही Happy

पण व्हिलनी असावी तर अशी. सिल्क ने गळा कापावा तसे.
>>>>
अगदीच, त्रिशूल आणि त्या दिवारमधूनही अमिताभला काढा. काहीच शिल्लक उरत नाही. भले दिवारचे डायलॉग भारी असतील पण त्यासाठीही अमिताभच हवा.

मला शाहरूखच्याही डर-अंजाम विरुद्ध बाजीगर मध्ये याचसाठी बाजीगर उजवा वाटतो. सायकोपंती दाखवताही येते आपापल्या स्टाईलने. पण बाजीगरमध्ये कसला धूर्त अभिनय करतो डोळ्यातून. कमाल म्हणजे निरपराध लोकांचे जीव घेणार्‍या शाहरूखबद्दल शेवटी तो मरताना सहानुभुतीही वाटते. आणि काजोलबद्दल सहानुभुती वाटू नये म्हणून उगाचच आणि एक छुपाया भी नही जाताचा लव्ह अँगल घुसवलाय.

नसिरुद्दीन शहाचे ‘सरफरोश’मधले कामही असेच सुसंस्कृत खलनायकीचे आहे. जबरदस्तीने गावातून हाकलवून लावल्याची चीड, नविन देशात स्वतःला प्रूव करण्याचा प्रयत्न, ख़ालिस उर्दू आणि कलाकाराचा अंदाज त्याने अप्रतिम दाखवले आहे.

BTW तिसरी मंझिल मध्ये के. एन.सिंग कुठे होते? >>> लिंक वर क्लिक करून पहा.
https://m.imdb.com/title/tt0061073/fullcredits/cast

imdb मध्ये ढीग लिहीले असेल पण विकी मध्ये के. एन. सिंग या चित्रपटात होते याचा उल्लेख नाही.
https://en.wikipedia.org/wiki/Teesri_Manzil

हे दोन्ही बाजूला ठेवू. मी दोन वेळा पाहिला तरी मला के. एन.सिंग तिसरी मंझील मध्ये आहेत हे आठवत नाही. आता परत पहातो आणि चेक करतो.

विकी मध्ये उल्लेख आहे की.
It starred Shammi Kapoor and Asha Parekh, along with Laxmi Chhaya, Premnath, Prem Chopra, Iftekhar, Helen, K. N. Singh and Salim Khan. The film became a hit at the box office.

तिसरी मंझील च्या नामावलीत यांचा उल्लेख आहे पण चित्रपटातले आठवत नाहीत. मध्ये मध्ये संशयाने पहाणारा वेटरचा रोल तर यांनी नाही ना केला? चेक करावे लागेल.

It starred Shammi Kapoor and Asha Parekh, along with Laxmi Chhaya, Premnath, Prem Chopra, Iftekhar, Helen, K. N. Singh and Salim Khan. The film became a hit at the box office.
हो हे वाचले पण खालती cast मध्ये यांचा उल्लेख किंवा Plot मध्ये यांचा उल्लेख कुठेच नव्हता. तिसरी मंझील च्या नामावलीत यांचा उल्लेख आहे पण चित्रपटातले आठवत नाहीत. मध्ये मध्ये संशयाने पहाणारा वेटरचा रोल तर यांनी नाही ना केला? चेक करावे लागेल.

>>>>नसिरुद्दीन शहाचे ‘सरफरोश’मधले कामही असेच सुसंस्कृत खलनायकीचे आहे. जबरदस्तीने गावातून हाकलवून लावल्याची चीड, नविन देशात स्वतःला प्रूव करण्याचा प्रयत्न, ख़ालिस उर्दू आणि कलाकाराचा अंदाज त्याने अप्रतिम दाखवले आहे.

सहमत आहे. खासच काम होतं.

आवारा मध्ये के एन सिंग आहेत का? बहुतेक हो. मस्त काम आहे त्यांचं. लहान राजकपूरला वाईट मार्गाला लावतात ते.

छान लेख. पण गुलशन ग्रोवर चांगला होता. तो माणूस अजुनही तरुण दिसतो, भारी व्यक्तिमत्व आहे.

छान लेख आहे. के एन सिंग जुन्या चित्रपटांमधे पाहिले आहेत. पण स्पेसिफिक भूमिका लक्षात नाहीत. वर गेलेली भुवई व हातात सिगार्/चिरूट वगैरे असे जनरल लक्षात आहे.

नंतरच्या काळात अमिताभच्या कालिया मधे त्याचे काही स्मगलर मित्र नंतर दाखवले आहेत त्यात एक के एन सिंग होते.

सर्वांचे आभार.

गुलशन ग्रोव्हर ९० च्या दशकात गेट अप ग्रोव्हर म्हणून प्रसिद्ध झाला होता. त्या काळात त्याने प्राणप्रमाणेच प्रत्येक पिक्चर मधे वेगळं मॅनरिझम असावं म्हणून बॅड मॅन किंवा एखादी लाईन चित्रपटभर वापरली. प्रत्येक पिक्चर मधे वेगळा गेट अप केला. त्या काळातल्या त्याच्या सगळ्या भूमिका लाऊड असायच्या. अनेक हिरो आणि अनेक व्हिलन अशा पिक्चर्समधेही तो हटकून असायचा. त्याबद्दल लिहीले आहे. त्याच्या चांगल्या भूमिका अर्थातच आहेत. तो वाईट अभिनेता आहे अशा अर्थाने कुठेच उल्लेख नाही.