जपानमधे एप्रिल महिन्याचा शेवटचा आठवडा आणि मे महिन्याचा पहिला आठवडा मिळुन एकूण ५-६ दिवस सुट्टी असते, ज्याला GW अर्थात "गोल्डन वीक" म्हणतात. शनिवार रविवारला जोडुन अजुन काही सुट्ट्या काढल्या की सलग ८-१० दिवसही मिळतात, म्हणुन तो "गोल्डन".
गोल्डन वीकला असं फिरण्याचं हे तिसरं वर्ष.
'नेमाने' गोल्डन वीकला फिरायला गेलो, तेही एका ठरलेल्या कंपुबरोबर.
वयाने २४-२७ च्या आसपास... अर्थात सगळे एकाच वेव्हलेंथवर. ....
" लय मज्जा " वगैरे वगैरे...
नेमाने जाणे झालेच, पण त्याहीपेक्षा नेमाने त्या प्रवासाचे यथासांग वर्णन केल्यामुळे भेट दिलेल्या स्थळाप्रमाणे येणारी मजा वेगळी असली जरी, तरी 'तोचतो'पणा टाळावा असा ठराव मांडला.
काय काय करायचं ते ठरवायच्या आधी "हे करायचं नाही" हे अधोरेखित वगैरे करुन बुलेटट्रेन अर्थात शिंकानसेन मधे "हर हर महादेव" म्हटलं.
काय काय करायचं नाही याची यादी: -
- आपल्या भाषेचा अभिमान असावा. जरुर, पण म्हणुन तो परप्रांतात जाऊन दाखवु नये. उगाच अगम्य भाषेत घोषणा देउ नयेत. तिथेही तिथला राज ठाकरे असु शकतो. त्यातुन आपलं नशीब सहसा टींबटींब, आणि आपण पांडु असतो, हे नेहेमी लक्षात ठेवायचं.
- फिरायला फक्त आपण गेलेलो नाहीये. "इथल्या बहुतांश पोरी इतक्या सुंदर कशा?" , असा प्रश्न मनात आणु नये. बाकीचेही बाहेरुन येऊ शकतात.
- दुकानदार पोरगी सुंदर असेल, आणि सगळ्यांना जपानी येत असेल तरीही एका वेळी एकाने बोलावे. तिला दोन कान असले, तरी एका वेळी एकच समजते.
- एखादी पोरगी फार सुंदर दिसली तरी लगेच मित्राला सांगु नये. "लगेच नको" म्हटलं तरी तो आपलाच मित्र. तो लगेच बघतो आणि मग आपल्याला ओशाळायला होतं. (कारण सहसा तीही तेव्हाच बघते..)
- त्यातुन तीने फार कमी कपडे घातले असले, तरी तेही आपापसात बोलु नये. आपल्या भाषेतसुद्धा. तिला शब्द समजले नाहीत, तरी आपल्याविषयी आहे, हे समजतं.
- किमोनो घातलेल्या पोरी दिसल्या की उगाचच त्यांचे फोटो काढु नयेत. विचारुन काढावेत.
*नाही म्हटल्या तर काढु नयेत. - उगाच फार फोटो काढु नयेत एकाच जागेचे. नंतर बॅटरी संपते, चार्जिंग करायला मिळत नाही.
- एशियन लोकांना फोटो काढताना बोटाने "व्ही" चिन्ह करुन दाखवायची सवय असते. त्यावरुन फालतु जोक करु नयेत. फोटो काढताना आपण काय करतो? "हाताची घडी?" / "एका बाजुला कलुन उभे राहतो" का असे?? हे आठवावे, "व्ही"बद्दल प्रश्न पडणार नाही.
- मित्र-मित्र फिरायला गेलो असलो तरी गळ्यात गळे घालुन चालु नये. गैरसमज होतात.
"असं आहे होय? मैत्रिण चालते का? मैत्रिण शोधतो. हॅहॅहॅ..." असा फालतु जोकही मारु नये. - "ऑरकुट फोटो" जास्ती काढु नयेत. म्हणजे "क्योटो टॉवरच्या समोर उभे राहुन, तो हातात असा लोंबकळत पकडला आहे" अशी थिम वापरु नये. जुनी झाली. सगळे वापरतात. जसं "तळहातावर ताजमहाल" वगैरे..
- संध्याकाळी ६:००-६:३० नंतर गॉगल घालु नये.
- "इथे 'शाकाहारी' जेवण का मिळत नाही?" असा वाद घालु नये. हे पुणे नाही. खास करुन "तुमच्या पिझ्झा बेस मधे अंडे असते का हो?" असे तर चुकुनही विचारु नये.
- हॅम म्हणजे डुक्कर. पोर्क म्हणजेही डुक्कर.
- काट्या-चमच्याने/चॉप स्टीक्सने खाता येत नसेल, तर खुशाल हाताने खावे, पण "हाताने खाणेच बरोबर कसे", "भारतीय संस्कृती" वगैरे कुठल्या कुठे जाऊ नये.
- "तुम्ही भारतीय का? लय भारी!!" असं कोणी म्हटल्यास लगेच हुरळुन जाऊ नये. तो सौजन्याचा एक भाग असतो.
- "जपानी मंदिरामधे देवासमोर मदिरा का ठेवलेली असते?" हा प्रश्न विचारु नये.
असली तर असुदे. तुम्हाला मिळणार नाहीये. - "सामुराई दिसला नाही नाई?", "गेईश्या दिसली नाही नाई" हे जुने जोक मारु नयेत..
ह्या आणि इतरही काही गोष्टींचा "क्योटो-प्रोटोकॉल" बनला.
'क्या पता, कब लौटना पडे देस' म्हणत 'जपानच्या पंढरीला-क्योटो"ला सर्वात आधी.
त्यानंतर जवळच 'नारा' आणि तिथुन थेट 'ओसाका' ला जायचे ठरले. तीन दिवसांची सहल.
पहिला मुक्कामः - क्योटो अर्थात 'क्यो~तो'.
(क्रमशः)
(पुढच्या भागात : "क्योटो-नारा-ओसाका" बद्दल)
सुरुवात तर लय भारी झालिय
सुरुवात तर लय भारी झालिय
>> "लगेच नको" म्हटलं तरी तो
>> "लगेच नको" म्हटलं तरी तो आपलाच मित्र. तो लगेच बघतो
>> फोटो काढताना बोटाने "व्ही" चिन्ह करुन दाखवायची सवय असते >> अतिशय बाश्कळ
>> 'शाकाहारी' जेवण का मिळत नाही?" ... "हाताने खाणेच बरोबर कसे", ... "जपानी मंदिरामधे देवासमोर मदिरा का ठेवलेली असते?" >> अगदी अगदी! असे बरेच नग असतात!
लै भारी..... येउद्या लवकर
लै भारी..... येउद्या लवकर
ऋयामसान, जपानमध्ये राहून
ऋयामसान, जपानमध्ये राहून सुद्धा क्योटो???
बाकी वर्णन लिहायला सुरुवात करा बिगी बिगी, वाचतोच आहोत.
काय काय करायचं नाही याची यादी
काय काय करायचं नाही याची यादी चांगलीय...... विनोदाची शैलीही छान !!!
तुझ्या सगळ्या लेखाला" " असं
ऋयाम सान , तुस्सी ग्रेट हो.. याला जॅपनीज भाषेत काय म्हणायचं??
काय काय करायचं नाही याची
काय काय करायचं नाही याची यादी: - >>
पुणेरी पाट्यांशी स्पर्धा करतीये ही यादी.
लवकर लवकर लिहा.
(No subject)
धम्माल सुरुवात....
धम्माल सुरुवात....
सुरुवात मस्त..
सुरुवात मस्त..
सुरुवात चांगली झालीये.
सुरुवात चांगली झालीये. फोटोसकट वर्णन येऊ द्या.
धन्यवाद सर्वांना पुढचं
धन्यवाद सर्वांना
पुढचं लवकरच टाकतो. m_( )_m
@आभार्स!!!
जब्बर !! प्रतिक्रियेत हा, हा
जब्बर !!
प्रतिक्रियेत हा, हा आणि हा आवडला असं टाकावं म्हणून पुन्हा आकडे तपासले. आणि शेवटी हे लिहावं लागलं.
"१ ते १७ जब्बरदस्त आहेत :-)"
पुढचा भाग लवकर येउदे..
क्योतोकॉल, आय मीन प्रोटोकॉल
क्योतोकॉल, आय मीन प्रोटोकॉल भारी आहे.
अरे लई भारी आहेत रूल्स !! फार
अरे लई भारी आहेत रूल्स !! फार आवडले!
धन्यवाद वटवट सत्यवान, रुनी
धन्यवाद वटवट सत्यवान, रुनी पॉटर, बस्के!
रुनी पॉटर, तुमचा क्योतोकॉल शब्द चोरतो. माफ करा
भाग १ टाकला आहे. जरुर वाचा
( क्योटो-नारा-ओसाका ) :- भाग १: क्योटो
ऋयाम जबरी चालू आहे. सगळे
ऋयाम जबरी चालू आहे.
सगळे प्वाईंट १०० टक्के मान्य!!
धन्यवाद एम्बीजपान
धन्यवाद एम्बीजपान