डोळस राधा

'डोळस' राधा (मुलाखत)

Submitted by मंजूताई on 13 July, 2012 - 02:01

काही नावांमध्ये असा अवीट गोडवा असतो की तो कुठल्याही काळात कमी होत नाही अन ती नावं कधी जुनाट, आऊट डेटेडही वाटत नाही, रमा, सई, मीरा... अश्याच ह्या यादीतलं एक नाव राधा. राधा अन माझी भेट होऊन दोन वर्षे झाली असतील. माझ्याकडे बरीच पुस्तकं होती ती कुठल्यातरी वाचनालयाला भेट द्यायची होती. डॉ चोरघडेकाकांनी राधाला सांगितलं अन ती पुस्तक घ्यायला आली. ती माझ्या घरातून पुस्तकं तर घेऊन गेली पण तिने माझ्या मनात घर केलं. मध्यंतरी दोन वर्षात गाठभेट झाली नाही. जेव्हा अशी लेखमाला लिहिण्याचा विचार करत होते त्या यादीत अर्थात राधाचंही नाव होतंच. राधा आपलं घर कुटुंब सांभाळत 'लुईराम' वाचनालय चालवते.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - डोळस राधा