'स्टँडर्ड व पुअर्स' या जगातील सर्वात मोठय़ा पतमापन संस्थेने भारताचे पतमानांकन निगेटिव्हमध्ये घटवून 'भारत हा गुंतवणूक करण्यायोग्य देश नाही' असा शिक्का मारला आहे. 'मूडी' या संस्थेने मात्र थोडासा दिलासा देत 'भारतीय अर्थव्यवस्था फार वाईट स्थितीत नाही' असे मत व्यक्त केले आहे. या सर्वांवर संयुक्त पुरोगामी आघाडीने राजकीय इच्छाशक्तीचा अभाव दाखवून कळस चढविला आहे. सरकारच्या निष्क्रीयतेमुळे देश आर्थिक अराजकतेच्या मार्गावर उभा असून आर्थिक सुधारणांच्या रुतून बसलेल्या गाडीला धक्का देणे फार गरजेचे आहे.
फ्लॅट चा एफ एस आय वाढवून घ्यायचा झाल्यास काय काय करावे लागते?
तसेच साधारण किती खर्च येतो या बद्दल कोणी माहिती देऊ शकेल का?
कोकणासाठी हवी जलवाहतूक
कोकणाच्या निसर्गाचा बाज काही निराळाच. तिथलं प्रसन्न करणारं वातावरण, हिरवळ हवीहवीशी वाटते. मात्र, उन्हाळ्याची सुट्टी, गणेशोत्सवात कोकणात जाणं कठीण होत असतं. या काळात ट्रेनचं बुकिंग न मिळणं, खाजगी बसेसची मुजोरी अशा समस्या येत जातात. मात्र, त्याच वेळी जलवाहतुकीचा चांगला पर्याय चाकरमान्यांना मिळाल्यास फायदा होऊ शकेल. सर्वसामान्यांना जलवाहतुकीने मोठा आधार मिळू शकेल. त्याशिवाय स्थानिक पातळीवरदेखील रोजगारनिमिर्तीस हातभार लागू शकेल.
नमस्कार मायबोलीकरांनो,
जुन्या लँड विक्रीतुन काही गेन झाला असल्यास त्यातून दोन घरे घेता येऊ शकतात का? कुणी जानकार आहेत का इथे? टॅक्स अव्हॉइड करण्यासाठी काही मार्ग सुचवु शकता का?
दोन-तीन सी एं ची मतं घेतल्यामुळे थोडे कन्फुजन आहे.
डे ट्रेडिंग आणि मुविंग अॅवरेज
डे ट्रेडिंगचा प्रयत्न बहुतेकजण करतच असतात. पण बर्याच वेळेला यात सातत्य नसते. काल निफ्टीमध्ये एक लॉट बाय केला. दहा रु लॉस झाला. आज टिस्को १०० शॉर्ट केले, तर नेमका टिस्को वर गेला. उद्या वेळ नाही मिळणार. मग परवा दोन ते साडेतीन एवढाच वेळ मिळेल, त्यात काहीतरी करुन बघू. स्वतःचे ऑन लाईन अकाउंट असले तरी लोड शेडिंग, चार तास लाइट नसणे, लाइट असले की नेट बंद पडणे.. आणि एवढं सगळं जमवून जरी काही केलं तर वरचा अनुभव आहेच. 
फोरेक्स ट्रेडिंग ( करन्सी ट्रेडिंग)
फोरेक्स ट्रेडिंग ( करन्सी ट्रेडिंग) कसे करतात? असे अकाउम्त कुठे आणि कसे खोलावे? फोरेक्सची माहिती कुठून मिळवावी?
शेअर मार्केट : लाइव बाय सेल सिग्नल सॉफ्टवेअर
ह्ल्ली शेअर मार्केटसाठी आणि कमोडिटीसाठी लाइव बाय सेल सिग्नल देणारी सॉफ्टवेअर मिळतात. कुणाला त्यांचा काही अनुभव आहे का? सगळेजण ९०-९५% सक्सेस रेट देतात.. कुणी असे सॉफ्टवेअर वापरले आहे का?
http://mcxncdexnifty.weebly.com/index.html इथे एक उदाहरण म्हणून दिले आहे, याशिवाय निफ्टीबाय्सेल, श्री चक्र, एझीलाइवट्रेड असे अनेक सॉफ्टवेअर्स आहेत..
सुरुवातीला ते काही फी घेतात. त्यानंतर डेटा युसेज फी दर महिन्याला द्यावी लागते म्हणे.
सध्या कोणकोणते टर्म इंश्युअरन्स बाजारात आहेत आणि त्यातल्या त्यात कोणता टर्म इंश्युअरन्स सर्वांत चांगले फायदे देणारा आहे, यावर चर्चा करण्यासाठी हा धागा.
कृपया लिहा. धन्यवाद.
शेअर मार्केट ब्रोकरचे अनुभव
इक्विटी आणि एफ ओ साठी चांगला ब्रोकर कोणता? सध्या कमीत कमी ब्रोकरेज कोणाचे आहे?
आय सी आय सी आय चे अकाउंट सोपे, चांगले आहे. त्यांची कॉल ट्रेड सुविधापण चांगली आहे. पण ब्रोकरेज अगदी जास्त आहे.
एस एम सी मध्ये माझे अकाउंट होते. पण तिथले लोक न सांगताच आपल्या अकाउंटला ट्रेड करतात, असा मला तरी अनुभव आला होता.
बी एम ए वेल्थ क्रिएटर सध्या सगळ्यात कमी बोकरेज घेते असे ऐकून आहे. कुणाला काही अनुभव आहे का?
प्रिपेड ब्रोकरेजचा अनुभव कसा आहे? बर्याच जणांच्या त्याविषयी तक्रारी आहेत.
'शेअर मार्केटसाठी आमच्या कंपनीत अकाउम्त काढा.
तुमच्या अकाउंटवर आम्ही ट्रेडिंग करु.
नफा झाला तर तुमचा ( किमान दरमहा ५%)
नुक्सान झाले तर आम्ही* ते भरुन देऊ. '
असा एस एम एस मला आला. मी त्याच्याशी बोललोदेखील. अशा प्रकारचे मेसेजेस आनखी कुणाला आले आहेत का? ब्रोकर फर्म नावाजलेली आहे. मुद्दाम इथे नाव देत नाही. हा एस एम एस पाठवणारी व्यक्ती मुंबईची आहे. कुणाला असा काही अनुभव आहे का?
* ( 'आम्ही' म्हणजे कोण? आणि कसे? ते मला माहीत नाही. म्हणजे ती व्यक्ती का ब्रोकर फर्म)