डे ट्रेडिंग आणि मुविंग अॅवरेज
डे ट्रेडिंगचा प्रयत्न बहुतेकजण करतच असतात. पण बर्याच वेळेला यात सातत्य नसते. काल निफ्टीमध्ये एक लॉट बाय केला. दहा रु लॉस झाला. आज टिस्को १०० शॉर्ट केले, तर नेमका टिस्को वर गेला. उद्या वेळ नाही मिळणार. मग परवा दोन ते साडेतीन एवढाच वेळ मिळेल, त्यात काहीतरी करुन बघू. स्वतःचे ऑन लाईन अकाउंट असले तरी लोड शेडिंग, चार तास लाइट नसणे, लाइट असले की नेट बंद पडणे.. आणि एवढं सगळं जमवून जरी काही केलं तर वरचा अनुभव आहेच.
पण कोणत्याही.. अगदी कोणत्याही शेअरचा किंवा निफ्टीचा ग्राफ पाहिला..सलग ७-८ दिवसांचा, तर त्यात ढीगभर अप डाउन झाल्याचे दिसून येतात. मग नेमके आपल्याच वेळेला हे चढ उतार कुठे गायब होतात? आपण काही केलं की एक तर शेअर हलतच नाही, आणि हललाच तर विरुद्ध दिशेला.... हे असं का? हे गणित मला बर्याच दिवसात चकवत होतं.
यावर उपाय म्हणजे .. मार्केट मधील एखाद्या शेअरमधील एखाद्या महिन्यातील सगळ्याच हालचाली आपल्याला कॅच करता आल्या तर? हल्ली बाय सेल चे सिग्नल देणारे सॉफ्ट वेअरही मिळतात. त्यात काही पेरामिटर फिक्स केलेले असतात.. काही आपणही फिक्स करु शकतो.. पण इथेही अनियमितपणे ट्रेडिंग केले की फारसं काही पदरात पडत नाही. एकंदरच ट्रेडिंगमध्ये सातत्य राखणं हाच यावरचा उपाय आहे, हे लक्षात आले.
१. निफ्टी किंवा कोणताही एक चांगला वर खाली होणारा शेअर निवडावा.. ( मी टिस्को, इन्फोसिस टेस्ट केले आहे.. पुढे सांगेनच.)
२. एक चांगले चार्टिंग सॉफ्टवेअर घ्यावे. त्यावर ५ मिनिटापासून एक तासापर्यंत कँडल ग्राफ अरेंज करता येतात. मी १० , १२, १५ मिनिट ग्राफ टेस्ट केले आहेत. त्यावर तो शेअर सेट करावा.
३. आता तिसरा महत्वाचा मुद्दा. बाय आणि सेल सिग्नल देऊ शकणारा कोणतातरी एक चांगला इंडिकेटर सेट करावा. मी ३-१३ मिनिट ई एम ए, आणि १०-२० मिनिट ई एम ए टेस्ट केले आहेत. जेंव्हा तीनचा ग्राफ तेराच्या ग्राफला क्रॉस करुन वर जातो, तेंव्हा बाय आणि उलट झाले की सेल. हेच लॉजिक १०-२० किंवा ७-२१ अशा पेअर्स घेऊन करता येईल. एक्सपोनेन्शल मु.अॅ. ऐवजी सिंपल मु. अॅ . देखील वापरता येईल. यापैकी काही निवडावे, पण सतत बदलू नये. आता ग्राफ पाहिलात तर त्यावर बाय सेलचे पॉइंट दिसतील....
४. हे बाय सेल सिग्नल एंट्री लेवल दाखवतात. पण प्रश्न आहे तो एक्झिटचा.. बर्याचदा १-२ रु. पृऑफिट घेऊन आपण बाहेर पडतो आणि मोठी मुव हातची निघून जाते. यावर उपाय म्हणजे ग्राफवर येणार्या सगळ्या बाय सेलच्या संधी साधणे.. आणि जेंव्हा पुढचा सेल बायचा सिग्नल येईल तेंव्हाच बाहेर पडणे. म्हणजे बाय नंतर जेंव्हा सेलचा सिग्नल येईल, तेंव्हाच सेल करणे आणि जुनी बाय पोझिशन क्लोज करुन नवीन सेल पोझिशन घेणे..
आता प्रत्येक सिग्नल हा प्रॉफिट देईलच असे नाही.. यात दोन ठिकाणी धोका होऊ शकतो...
१. जर ट्रेंड टिकला नाही तर .. तर एकतर अगदी कमी लॉस किंवा अगदी कमी प्रॉफिट.. मार्केट अगदी नॅरो रेंजमध्ये असेल, तर ही परिस्थिती येते. काही ट्रेंड फार काळ टिकत नाहीत. अगदी झिग झॅग किंवा व्हिप सॉ मुवमेंट मिळतात.. पण तरीही बाय सेल चालूच ठेवायचे. कारण कोणता ट्रेंड जास्त प्रॉफिट देणार आहे, हे आपल्याला माहीत नाही.
२. जर दिवसाअखेरची पोझिशन कॅरी केली आणि मार्केट गॅप अप किंवा गॅप डाउन मध्ये गेले, तर आदल्या दिवशीचा ट्रेड लॉस मध्ये जाणार.. हा लॉस बर्याच वेळेला मोठा असतो.
पण काही वेळेला मोठा प्रॉफिटही मिळू शकतो.
इथे दोन प्रकारे जाता येईल.. १. रोज साडेतीनला पोझिशन क्लोज करणे आणि रोज सकाळी पुन्हा नवी एंट्री घेणे.. २. पोझिशन चालू ठेवणे.. जे काही गॅप अप डाऊन व्हायचे ते होवो.
साधारणपणे महिन्याचे ४-५ दिवस असे गॅपचे असतात. तिथेच चकवा असतो. इतर दिवशी इंडिकेटर चांगली हालचाल दाखवतात.
रोज सरासरी २-३ असे एक महिन्याच्या २० दिवसात सुमारे ५० बाय सेल सिग्नल मिळतात, ते सगळेच्या सगळे ट्रेड करायचे आहेत. त्यात काही नफा देतील, काही तोटा देतील. काही वेळेला शेअर हलणारच नाही. पण तिथे वेट अँड वॉच ठेऊन पोझिशन कंटीन्यु करायची.
पण असे लॉसेस बुक करुनही दोन महिन्यात खालील पॉइंट मिळाल्याचे मला बॅक टेस्टिंगमध्ये दिसले.. यामध्ये गॅपमुळे झालेले नुकसानदेखील समाविष्ट आहे.. ( १ लॉट फ्युचर)
निफ्टी... ७०० , टिस्को... १२०, इन्फोसिस... ४००
( लॉट साइझ ५०, ५००, १२५ अनुक्रमे)
कमोडिटीमध्येही हे करता येते. पण कमोडिटी मार्केट सकाळी १० ते रात्री १२ असते.. सगळे बाय सेल पॉइंट साधणे थोडे अवघड आहे. निफ्टी किंवा निफ्टीमधील कोणताही चांगला शेअर घेऊन, वेगळ्या वेगळ्या टाइम स्केलचा ग्राफ घेऊन आणि वेगळेवेगळे इंडिकेटर्स घेऊन जाणकारानी आणखी यात बदल करावेत असे वाटते. १ शेअर, १ ग्राफ, १ इंडिकेटर हीच मेथड ठेऊन एक चांगला इंडिकेटर सगळ्यानी मिळून शोधावा असे वाटते. निफ्टी, टिस्को, इन्फोसिस, रिलायन्स, बँक ऑफ इंडिया, बजाज ऑटो, स्टेट बँक, बँक निफ्टी, हिरो, हे शेअर चांगले वाटतात. युनिटेक, अशोक लेलँड असले आळशी म्हशीगत चिखलात रुतलेले शेअर याकामी फारसे उपयोगी ठरणार नाहीत. याकामी चांगले सॉफ्टवेअर कोणते त्याचीही चर्चा व्हावी असे वाटते. काही वेब साइटवर फ्री इंट्रा डे ग्राफ असतात, पण ते डिले असतात. त्यामुळे स्वतःचे सॉफ्टवेअर व स्वतःचा टिक बाय टिक डेटा याला पर्याय नाही असे वाटते. मार्केटमध्ये डेटा वेंडरकडून चांगला फास्ट डेटा अल्पदरात मिळू शकतो.
मु. अॅ. सारखा आणखी कोणता इंडिकेटर उपयोगी पडेल?
१०-२० चांगला वाटतो.. स्मूथ
१०-२० चांगला वाटतो.. स्मूथ असतो.
टेक्निकली SMA / EMA हे
टेक्निकली SMA / EMA हे overlays आहेत Indicators नाही
overlays म्हणजे काय? जरा
overlays
म्हणजे काय? जरा समजावून सांगा.
इंडिकेटर पैकी काय उपयोगी
इंडिकेटर पैकी काय उपयोगी पडेल?
ऑवरलेस- हे चार्ट च्या वर
ऑवरलेस- हे चार्ट च्या वर प्लॉट होतात , तुम्च्या वरच्या चार्ट वरतीच ते बरोवरीने दिसतील. आणखी काही उदा, म्हणजे envolope, बोलिंजर बँड्स.
वॉल्युम, ओपन ईंट्रेस्ट, MACD, ई. झाले ईंन्डीकेटर्स. मी डे ट्रेड फारसे करु शकत नाही (ऑफिसातुन शक्य नाहि), पण जनरली EMA बरोबर कँडल्स्टीक पॅटर्न बघायला हवेत. तुमच्या बहुतेक चार्ट मधे एन्गल्फ किंवा फ्लॅग फॉर्म झालेला दिसेल.
इंट्राडे कोण करतय का?
इंट्राडे कोण करतय का?
इंट्राडे कोण करतय का? >>> मी
इंट्राडे कोण करतय का?
>>> मी तरी करत नाही ..म्हणजे करायला आवडेल पण आय डायरेक्ट च्या माझ्या अकाउंटला ती फॅसीलिटी नाकारलीये ( अर्थात त्या बदल्यात ब्रोकरेज फक्त ०.२५ पै पडते )
असो .
जामोप्या मला काय वाटत की इन्ट्रा डे ही जुगार अन फ्युचर्स ही जुगारच ...मग मोठ्ठी बोलु लाव ना ...फ्युचर्स खेळुया ...र्यावर एखादा लेख टाक .
.
बायदवे ....गेल्या २ महिन्यात ज्या भयानक प्रकारे लॉस झालाय ...ते पाहुन ऑप्स्नच चा अभ्यास करुन हेजिंग करायला सुरुवात करायला लाग्णार असे दिसते
इंट्रा डे करतोय पण अजुन तरी
इंट्रा डे करतोय पण अजुन तरी यश आले नाही.अशी किती लोकं आहेत ज्याना इंट्रा डे त यश मिळाले आहे.मी ही धडपडतोय पण एकदा LOSS झाला की पुन्हा आर्डर प्लेस करू वाटत नाही.६०,००० चे ४१,००० झालेत तरी पण अजुन आशा वाटते आहे.एक दिवस SUCCES होवू.
या वेबसाइटवर इंट्राडे ग्राफ
या वेबसाइटवर इंट्राडे ग्राफ काही शेअरचे मिळतात.. http://indialivecharts.com/ ते वापरुन करा .. कदाचित फायद्यात याल.. समोर ग्राफ नसताना ट्रेडिंग करणे म्हणजे लॉसच होणार.. ग्राफ बघून करा
Setups is the key to success
Setups is the key to success with a strict risk management strategy....
जामोप्या, चार्टिंग सॉफ्ट्वेअर
जामोप्या,
चार्टिंग सॉफ्ट्वेअर जे लाईव्ह डेटा चार्ट करेल असं माहिती आहे का एखादं? फ्री असेल तर उत्तमच..
फ्री काही नस्ते मालाक.
फ्री काही नस्ते मालाक. सॉफ्टवेअरच्या किमती ५००० पासून २ लाखापर्यंत आहेत. डेटा मात्र ५०० रुपयात मिळू शकतो.
आय डायरेक्ट च्या माझ्या
आय डायरेक्ट च्या माझ्या अकाउंटला ती फॅसीलिटी नाकारलीये>>>>>>>>>>>का?
कसली फॅसिलिटी?
कसली फॅसिलिटी?
इनट्राडेची
इनट्राडेची
असे कसे होईल? कॉल सेतरला फोन
असे कसे होईल? कॉल सेतरला फोन करुन बघा
असे कसे होईल? कॉल सेतरला फोन
असे कसे होईल? कॉल सेतरला फोन करुन बघा
>>> जामोप्या , प्रीतिभुषण ... आय डारेक्ट वाल्यांच्या ब्रोकरेज काही तरी .७५ पै आहे ...त्या ऐवजी मला .२५ मिळाला पण नो इन्ट्रा डे .....
जामोप्या, पेड चांगलं
जामोप्या,
पेड चांगलं सॉफ्टवेअर सांगा माहिती असले तर? लाइव्ह डेटा चार्ट करणारं.
पेड, चांगलं..... तिथेच तर घोळ
पेड, चांगलं..... तिथेच तर घोळ आहे.! वापरल्याशिवाय कळनार कसं ? गुगलवर चार्तिन्ग सोफ्त्वेअर असं सर्च करा. ढीगभर मिळतील
>>>>>पेड चांगलं सॉफ्टवेअर
>>>>>पेड चांगलं सॉफ्टवेअर सांगा माहिती असले तर? लाइव्ह डेटा चार्ट करणारं.
फाल्कन किंवा आयरीस
फुकटाला शेवटी लिमिटेशन्स येतात.
Check NinjaTrader software,
Check NinjaTrader software, if you have a data provider, you can use the software free. I am not sure if it can connect to any Indian data providers but the charting capabilities are awesome. You can develop your own strategies as well as indicators, good luck!
मायबोलीवर,
मायबोलीवर,
आपल्या मायबोलीमध्येच लिहित चला!
एक विसरलो, शेरखानचे सॉफ्टवेअर
एक विसरलो, शेरखानचे सॉफ्टवेअर प्रोफेशनलच्या थोडे जवळ पोचते.
भारतः तो वेगळाच मुद्दा आहे,
भारतः तो वेगळाच मुद्दा आहे, काही वेळेस पटकन उपयुक्त माहिति पुरवणे ह्या कडे अधिक कल असतो....
यासाठी लागणारे अॅमीब्रोकर ए
यासाठी लागणारे अॅमीब्रोकर ए एफ एल...
swing indicator.txt (15.18 KB)
..
..
जाप्यारे..........नमस्कार....
जाप्यारे..........नमस्कार..........
"३. आता तिसरा महत्वाचा मुद्दा. बाय आणि सेल सिग्नल देऊ शकणारा कोणतातरी एक चांगला इंडिकेटर सेट करावा. मी ३-१३ मिनिट ई एम ए, आणि १०-२० मिनिट ई एम ए टेस्ट केले आहेत. जेंव्हा तीनचा ग्राफ तेराच्या ग्राफला क्रॉस करुन वर जातो, तेंव्हा बाय आणि उलट झाले की सेल. हेच लॉजिक १०-२० किंवा ७-२१ अशा पेअर्स घेऊन करता येईल. एक्सपोनेन्शल मु.अॅ. ऐवजी सिंपल मु. अॅ . देखील वापरता येईल. यापैकी काही निवडावे, पण सतत बदलू नये. आता ग्राफ पाहिलात तर त्यावर बाय सेलचे पॉइंट दिसतील...."
हे तीन तेरा करणारे लिखाण करुन तुम्ही काय साध्य करत आहात? स्वत:ला कशाला काय म्हणतात ते माहिती नाही नी इतरांच्या चर्चेत कसले माठ्यासारखे येऊन ख्या ख्या करत बसताय?
तुम्ही आज पर्यंत स्वतःचा काय फायदा करुन घेतलात डे ट्रेडिंग मध्ये ते सांगा.....बहुधा नुकसान असण्याचीच शक्यता आहे...खरं बोला...........
(ओवरलेज नि ईंडिकेटर्स मधला
(ओवरलेज नि ईंडिकेटर्स मधला फरक कळत नाही नि डे ट्रेडिंग वर पुस्तक लिहितायत!)
काय? जामोप्या ह्यांनी पुस्तक
काय? जामोप्या ह्यांनी पुस्तक लिहिले?
काल परवा पर्यंत तर ते विचारत होते की हे इंडिकेटर चांगले की ते. आता डायरेक्ट पुस्तक!
तुम्ही आज पर्यंत स्वतःचा काय
तुम्ही आज पर्यंत स्वतःचा काय फायदा करुन घेतलात डे ट्रेडिंग मध्ये ते सांगा.....बहुधा नुकसान असण्याचीच शक्यता आहे...
निफ्टी... ७०० , टिस्को... १२०, इन्फोसिस... ४००
( लॉट साइझ ५०, ५००, १२५ अनुक्रमे)
हे माझे एक महिन्याचे रीडींग मी दिले आहे.. इतराना शक्य असेल तर त्यान्नीही वेगळे पेअर्स वापरुन बघावे, असे सुचवले आहे.
हे काही माझे नवीन इन्वेन्शन नाही.. असे करणारे ढीगभर आहेत.. पण मु अॅ नेमका कोणता वापरावा, सिंपल, एक्स्पोनेन्शन, डबल, की ट्रिपल एक्स्पोनेन्शल , वाइल्डर की वेड... हे मात्र ज्याला त्याल अनुभव घेऊनच ठरवावे लागेल.. त्यासाठी हा धागा काढला होता.
Pages