शेती आणि शेतकरी

रेझिलियन्स

Submitted by निनाद on 7 September, 2011 - 00:46

दलजीतचं लग्न झालं आणि ती भारतातून ऑस्ट्रेलियात आली. नवर्‍याबरोबर समाधानाने संसार चालला होता. नवर्‍याला शेतीची आवड असल्याने अनेक वर्षे शहरात नोकरी केली आणि पैसे जमवले. ऑस्ट्रेलियात संत्री आणि द्राक्षांची शेती घेतली. काही काळ स्थिर होण्यात गेला. दलजीतचा सारा वेळ मुलांचे संगोपन आणि घरकाम यातच जात असे. तीन मुले पदरी असतांना चाळिसाव्या वर्षी अचानकपणे नवरा गेला!

पुरस्काराचा भुलभुलैया

Submitted by अभय आर्वीकर on 23 November, 2010 - 01:18

पुरस्काराचा भुलभुलैया

“स्टार माझा” तर्फे, घेण्यात आलेल्या ब्लॉग माझा-३ स्पर्धेत मला मिळालेल्या पुरस्काराबद्दल आपण माझेवर प्रेम व्यक्त करून अभिनंदन केलेत त्या बद्दल मी आपणा सर्वांचा अत्यंत ॠणी आहे, त्याबद्दल आपले सर्वांचे खूपखूप आभार. भविष्यातही आपणाकडून असेच उदंड प्रेम मिळत राहील ही अपेक्षा.

गुलमोहर: 

‘रानमेवा’ काव्यसंग्रह प्रकाशन

Submitted by अभय आर्वीकर on 31 October, 2010 - 12:30

‘रानमेवा’ काव्यसंग्रह प्रकाशन

नमस्कार मित्रांनो,
माझा ‘रानमेवा’ हा पहिलावहिला काव्यसंग्रह बुधवार दिनांक, १० नोव्हेंबर २०१० ला शेगाव (जि.बुलढाणा) येथे मा. शरद जोशी यांच्या अमृतमहोत्सवा निमित्त आयोजीत शेतकरी महामेळाव्यात लाखो शेतकर्‍यांच्या साक्षीने मा.शरद जोशी यांचे शुभहस्ते प्रकाशित होत आहे. आपणही उपस्थित राहून आपले आशीर्वाद द्यावेत, यास्तव हे आग्रहाचे निमंत्रण.

गुलमोहर: 

बेल्जियन वाडीवर एक दुपार

Submitted by मितान on 4 October, 2010 - 18:09

बर्‍याच दिवसांपासून एखाद्या बेल्जियन शेतावर जाण्याची ईच्छा होती. आमच्या एका डच मित्राच्या कानावर घालून ठेवले होते. एका दुपारी पॅट्रिकचा फोन आला की शनिवारी दुपारी ४ ते ५:३० अशी एका शेतकर्‍याची वेळ मिळाली आहे. मनात आले, शेतकर्‍याची अपॉइन्टमेन्ट म्हणजे फारच झालं! असेल बुवा इथला शेतकरी घड्याळावर चालणारा. गावाकडे शेतकर्‍याकडून तीनच वेळा ऐकलेल्या: सकाळ, दुपार, संध्याकाळ.

गुलमोहर: 

पीपली लाइव्ह आणि सिंपली सुसाईड.

Submitted by अभय आर्वीकर on 16 August, 2010 - 02:02

पीपली लाइव्ह आणि सिंपली सुसाईड.

मी नाही पाहीला हा चित्रपट. पण बातम्यावरून लक्षात येतंय की शेतकरी अनुदानाच्या लोभापायी आत्महत्या करतो, असा आभास त्या चित्रपटात निर्माण करण्यात आलेला आहे.
तसेही शेतकरी दारू पिऊन आत्महत्या करतात, वेडसर असतात म्हणुन आत्महत्या करतात, आळशी असतात म्हणुन आत्महत्या करतात आणि अशिक्षित असतात म्हणुन आत्महत्या करतात वगैरे-वगैरे अक्कलेचे तारे यापुर्वीच विचारवंतानी तोडलेच आहे,(संदर्भ; 'शेतकरी आत्महत्यांवर तज्ज्ञांची मुक्ताफळे') त्यात पुन्हा एका नव्या विचारवंताची भर पडली म्हणायची.

विषय: 

हा देश कृषीप्रधान कसा?

Submitted by अभय आर्वीकर on 22 March, 2010 - 12:04

हा देश कृषीप्रधान कसा?

- सोनिया गांधी या जागतिक राजकारणाच्या केंद्रबिंदू आहेत.
- अमिताभ बच्चन शतकातील सर्वोत्कृष्ट गायक आहेत.
- रवि शास्त्री क्रिकेटचा प्राण आहे.
- लातुर हे जागतिक दर्जाचे शहर आहे.

गाय,वाघ आणि स्त्री

Submitted by अभय आर्वीकर on 28 January, 2010 - 12:44

माझ्या वाघास दात नाही...... या गझलेतील
"गायीस अभय देण्या,वाघास दात नाही" असा मतला आहे. त्या निमित्ताने थोडक्यात या मतल्या मागची पार्श्वभुमी उलगडण्याचा मी केलेला प्रयत्न. बघा तुम्हाला पटतेय का ते?

विषय: 

आधी अंडे की आधी कोंबडी ?

Submitted by अभय आर्वीकर on 12 January, 2010 - 04:28

चर्चेदरम्यान एक प्रश्न आला आहे.
आधी अंडे की आधी कोंबडी ?
याला पण उत्तर आहे काय? असा प्रश्न विचारला आहे.
हा प्रश्न राहुनच गेला. काय आले असेल आधी.... आधी अंडे की आधी कोंबडी ?
माझ्याजवळ पण याविषयी एक तर्क आहे.
जाणकारांनी याबाबत उत्तरे किंवा तर्क द्यावेत.
(या संदर्भात शेवटचे प्रतिसाद वाचावेत.)
...................................................................................

कोंबडी, अंडी आणि प्रजासत्ताकदिन

आधी काय निर्माण झाले असावे.?
कोंबडी की अंडी ?
अनेकदा अशा तर्‍हेच्या प्रश्नामध्ये आपण पुरते गुरफटुन जात असतो.

विषय: 
Subscribe to RSS - शेती आणि शेतकरी