वाघास दात नाही

Submitted by अभय आर्वीकर on 27 January, 2010 - 08:07

वाघास दात नाही......

गायीस अभय देण्या, वाघास दात नाही
रजनीस जोजवीण्या, सूर्यास हात नाही.

फुलल्या फुलास नाही, थोडी तमा कळींची
एका स्वरात गाणे, साथीत गात नाही.

रंगात तू गुलाबी, रूपात का भुलावे
वांग्या तुझ्या चवीला, मुंगूस खात नाही.

खांद्यास नांगराचा का भार सोसवेना ?
प्राशू नको विषा रे, देहास कात नाही

अभयात वाढलेली, वाचाळ राजसत्ता
राजा पहूडलेला, राजत्व ज्ञात नाही.

..... गंगाधर मुटे ...

........................................................
वृत्त - गा गा ल गा ल गा गा X २
.......................................................

गुलमोहर: 

छान!

मतला/ पहिली ओळ डोक्यावरून गेली. वांगे आवडले, फुलल्या फुलास आणि शेवटला पण ठीके. बाकी कै कळले नै Sad
पण तुमचे किती कौतुक करावे! झपाटले गेलातच तुम्ही गझलेने Happy पुलेशु.

गंगाधरजी.. कल्पना चांगल्या आहेत..:)
थोडी सफाई पाहिजे..:)
तुम्ही चांगलं लिहिता म्हणूनच राग मानणार नसाल तर एक छोटि सुचना करतो. गझलेचा प्रत्येक शेर सहज कळण्यासारखा असावा. त्यामुळे आपण एकदा गझल लिहून झाल्यावर त्रयस्थाच्या दृष्टीतून वाचून पहा, जर शेर सहज कळला तर उत्तमच नाहितर त्यात अजून थोडी सफाई आणायचा प्रयत्न करा..:)
मी गझलकार वगैरे नाही कारण माझ्या स्वतःच्या रचनेत मला सफाई आणणं अवघड पडतं..:) प्रयत्न चालू आहेत. बघु कधी यश मिळतं..:)

प्राशू नको विषाला,जिवणास कात नाही.

हे जिवण काय आहे??

तुमचा प्रयत्न छान आहे. गजलेत व्याकरणाचे किंवा गजल म्हणुन इतर काही दोष असतीलही, मला त्यातले काहीच कळत नाही, पण तुमची भावना मात्र चांगली व्यक्त झालीय..

वर देवाने जे म्हटलंय तेही विचार करण्याजोगे आहे.

छायाजी,साधनाजी धन्यवाद..!!
साधनाजी बदल केलाय.
केवळ चांगली भावना व्यक्त करुन कसे भागेल ?. जे लिहायचे ते साचेबंद आणि शुद्धलेखनासहित लिहावे लागेल नाहीतर हे साहित्यक्षेत्र आपल्याला किनार्‍यावर फेकुन देईल.समुद्र कसा काडीकचरा किनार्‍यावर फेकुन देतो?. तस्सच.

मतला माझ्याही डोक्यावरून गेला.....पण दिल जीत लिया गंगाधरभाय आपने ! Happy

वांग्याचा(मुट्यांचे वांगे अमर रहे! :)) आणि शेवटचा शेर एकदम सह्ही !

धन्यवाद प्रकाशभाई...!!
...............................
"गायीस अभय देण्या,वाघास दात नाही"
हा मतला डोक्यावरून गेल्याच्या प्रतिक्रिया आल्यात त्या निमित्ताने थोडक्यात या मतल्याचा अर्थ उलगडण्याचा मी केलेला प्रयत्न. बघा तुम्हाला पटतेय का ते?
येथे वाचा.
गाय,वाघ आणि स्त्री : मतल्याचा अर्थ

गाईचे प्रेम,भुतदया वगैरे दिखावाच. जर तसे नसते तर गाय फक्त शेतकर्‍यांच्याच दारात नसती दिसली.
गाय दिसली असती कलेक्टर, मंत्रालय,राजकिय पक्षांची कार्यालये वगैरे ठीकाणी गाय बांधलेली आढळली असती आणि सकाळी उठून कलेक्टर शेण सावडतांना आणि मुख्यमंत्री दुध काढतांना आढळले असते. >>> गंगाधरराव , कलेक्टर कार्यालयात , मंत्रालयात गाय दिसली तरच भुतदया ...अजिबात पटलं नाही .

श्रीजी,यासंदर्भात भुतदया या शब्दचा अर्थ लेखातील संदर्भापुरताच घ्यावा. कारण भुतदया शब्दाची व्याप्ती फार मोठी आहे. तेवढी व्याप्ती लक्षात घेतली तर भुतदया हा शब्दच वापरणे कठीन होईल.
या शब्दाऐवजी पर्यायी शब्द वापरायला हवा होता असे तुम्हाला म्हणायचे असेल तर ते मला मान्य आहे. Happy

गंगाधर , गझल या काव्यप्रकाराच वेड हे असच असत .तुमच्या रचनेतील गझल पहा आवडते का .

गाईस अभय आता वाघास दात नाही
ते बोळके अताशा काहीच खात नाही

बहरातल्या फुलाना नाही तमा कळीची
पुसती न ती तिला का साथीस गात नाही

रंगास तू गुलाबी रूपास का भुलावे ?
तव लोभ , प्रेम वेड्या त्या कंटकात नाही

खांद्दास दफ्तराचा का भार सोसवेना ?
आनंद ही अताशा त्या शैशवात नाही

बाणा कसा जपावा ,लवचीक जो कणा ना
अभिमान ''मी मराठी'' मुळचा घरात नाही

छायाजी,किती मेहनत घेनार तुम्ही ?
विद्यार्थी पास झाला तर बरे ,नाहीतर तुमची मेहनत वाया जायची. Happy
सुधारित गझल एकदम आवडली.

छायाजि चि गझल जास्त चान्गलि वातलि,
अन ति प्रतिक्रिया आमच्या पर्यन्त पोहोच्विन्याचा तुमचा खिलादुपना त्याहुनहि कितितरि जास्त चान्गला वातला.........

गंगाधरजी,

खांद्यास नांगराचा का भार सोसवेना ?
प्राशू नको विषा रे, देहास कात नाही

अभयात वाढलेली, वाचाळ राजसत्ता
राजा पहूडलेला, राजत्व ज्ञात नाही.

वा ! क्या बात है.

छायाजी,
खांद्दास दफ्तराचा का भार सोसवेना ?
आनंद ही अताशा त्या शैशवात नाही

बाणा कसा जपावा ,लवचीक जो कणा ना
अभिमान ''मी मराठी'' मुळचा घरात नाही


तुम्ही तर कमाल केलीत. मी हळु हळु फॅन झालो आहे गजल चा. पाटणकर, पांचाळांनंतर कोण हा प्रश्न आता उरला नाही. मला वाटायच गजल फक्त विदर्भातच पिकते. छायाजी आपण हे ही खोट ठरवल.