पीपली लाइव्ह आणि सिंपली सुसाईड.

Submitted by अभय आर्वीकर on 16 August, 2010 - 02:02

पीपली लाइव्ह आणि सिंपली सुसाईड.

मी नाही पाहीला हा चित्रपट. पण बातम्यावरून लक्षात येतंय की शेतकरी अनुदानाच्या लोभापायी आत्महत्या करतो, असा आभास त्या चित्रपटात निर्माण करण्यात आलेला आहे.
तसेही शेतकरी दारू पिऊन आत्महत्या करतात, वेडसर असतात म्हणुन आत्महत्या करतात, आळशी असतात म्हणुन आत्महत्या करतात आणि अशिक्षित असतात म्हणुन आत्महत्या करतात वगैरे-वगैरे अक्कलेचे तारे यापुर्वीच विचारवंतानी तोडलेच आहे,(संदर्भ; 'शेतकरी आत्महत्यांवर तज्ज्ञांची मुक्ताफळे') त्यात पुन्हा एका नव्या विचारवंताची भर पडली म्हणायची.
शेतकर्‍याच्या आत्महत्यांची कारणे शोधली जात नाहीत, उपाययोजना केल्या जात नाहीत आणि प्रामाणिक प्रयत्नही केले जात नाहीत.
याउट त्यांच्या जखमांवर मीठ चोळून विकृत चित्र उभे केले जाते. आणि त्याचा निषेध व्यक्त करण्याची साधी गरजही सामान्य माणसाला भासत नाही, काय म्हणावे याला?
ज्या सुसंस्कृत समाजाकडून त्याने न्यायाची अपेक्षा करावी तोच समाज जर असा विकृतीने पिडलेला आहे, हे जर त्याच्या लक्षात आले आणि तशी खात्री झाली तर मग तो न्यायासाठी स्वत:चे मार्ग स्वत:च शोधेल आणि अशा सुशिक्षित-सुसंस्कृत समाजाच्या विकृत विचारांपेक्षा असभ्य रानटी मावो/नक्षलवांद्यासारख्यांची सहानुभुती त्याला जवळची वाटली तर.......????????
तर त्याचे काही चुकते हे मी तरी त्याला कसे समजावणार.....?????????????????????
शेतकर्‍याला मुख्य प्रवाहापासून दुर फ़ेकून द्यायचे नसेल तर....
हे भारतियांनो त्या पीपली लाइव्हचा निषेध करा.
अगदी जमेल त्या मार्गाने... जमेल तसा....जमेल त्या पद्धतीने.......!!

गंगाधर मुटे
..................................................................................
कसा जोम यावा खुरटल्या पिकांना, नवे बीज ते अंकुरावे कसे?
तणांचाच जेथे असे बोलबाला, तिथे अन्य काही रुजावे कसे?
..................................................................................
.
.
ता.क- मी चित्रपट पाहीलेला नाही आणि पहावे असे वाटतही नाही. कारण शेतकर्‍यांच्या आत्महत्या विनोदाचा विषय होणे किंवा विनोदी चित्रपटात शेतकर्‍यांच्या आत्महत्येसारखा गंभिर विषय हाताळणे हेच मुळी विकृतीचे लक्षण आहे. हा विषय तीन तासाच्या एका चित्रपटातच काय दहा चित्रपटात सुद्धा आवाक्यात येणार नाही असा विषय एखाद्या चित्रपटात तोंडी लावून चघळण्याइतका किरकोळ वाटावा, ही विचारशैलीच शेतकर्‍यांकडे पाहण्याचा दृष्टीकोण स्पष्ट करून जाते. ’पीपली’ च्या जाहिरातीचा टीव्हीवरील छोटासा संवादच ऐकणे जेथे जड गेले तेथे माझ्यासारख्याला पुर्ण सिनेमा शांतपणे बसून पाहणे शक्य होईल?
.............................................................................................
दुपारी २.२४ वाजता

esakal.com - वरिल http://72.78.249.107/esakal/20100814/5039280691352829503.htm
या लिंकवरील पीपली (लाइव्ह) > आपल्या कोडगेपणाच्या कानाखाली काढलेला आवाज - हा त्या चित्रपटाबद्दल भाष्य करणार्‍या लेखातील काही भाग पहा.....

.
दिग्दर्शिकेनं इथं मुख्य प्रदेश नावाच्या भारताच्या काल्पनिक राज्यातला एक गरीब शेतकरी नथ्था (ओंकारदास माणिकपुरी) कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या करण्याची घोषणा करतो, या "थीम'भोवती सगळी कथा मांडली आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा खरोखर गेल्या काही वर्षांत या देशाला लागलेला कलंक आहे. मात्र, याच विषयाकडं खेळकरपणानं पाहत, उपहासाच्या माध्यमातून दिग्दर्शिकेनं आपल्या बोथट झालेल्या संवेदनेला गदगदून हलविण्याचं काम केलं आहे. नथ्था आणि त्याचा मोठा भाऊ बुधिया (रघुवीर यादव) कर्जमाफीसाठी त्यांच्या भागातल्या पुढाऱ्याकडं जातात. तेव्हा तो त्यांची थट्टा करून आत्महत्या करण्याचा सल्ला देतो. मात्र, त्याच्या या तिरकस सल्ल्यानंतर नथ्था व बुधिया खरोखर आत्महत्या करण्याचा विचार करू लागतात.
.

१) असा घोषणा करून शेतकरी आत्महत्या करीत असतो? हे विकृत विचार नाही?
२) शेतकरी आत्महत्येकडे खेळकरपणाने पाहात? या वाक्यात आणी "बलात्कार होत असतांना मी खेळकरपणाने पाहत होतो" या वाक्यात मला फ़ारसा फ़रक आढळत नाही.
काय करावे या खेळकरपणाचे?
३) शेतकरी कर्जमाफ़ीसाठी कुणापुढे हात पसरतात? या उलट १० रुपये मुद्दल रक्कमेचे व्याजासहित ५०० रू फ़ेडता-फ़ेडता पिढ्या बरबाद झाल्या.
यातून एक गोष्ट स्पष्ट होतेय की हा समाज शेतकरी वर्गाकडे किती गांभिर्याने पाहतो.

त्याच्या आत्महत्येवर निट अभ्यास करता येत नसेल तर नका करू पण असा विकृतीपुर्ण विपर्यास का करता?
..
याला विकृत विचार म्हणणे पटत नसेल तर नेमके विकृत विचार कशाला म्हणायचे, हे जरा मला समजून सांगावे. माझ्या मनाचे दरवाजे सताड उघडे आहे.
............................................................
सायं ६,०० वाजता वाढवलेली पोष्ट.

काल आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या विधवांनी आमीरच्या पोष्टरची "होळी केली"

बातमी....

स्वतंत्रता दिवस के दिन रविवार को जहां एक ओर पूरा देश आजादी का पर्व मनाने में व्यस्त था तो दूसरी ओर महाराष्ट्र में पांच हजार विधवाएं आमिर खान की पीपली लाइव के पोस्टर जला रही थीं। विदर्भ जन आंदोलन समिति के बैनर के तले नागपुर से 150 किलोमीटर दूर यवतमाल जिले में जुटीं इन विधवाओं की बस एक ही मांग थी कि आमिर खान उनसे माफी मांगे और सरकार फिल्म पर प्रतिबंध लगाए।

कहते हैं कि आमिर की नई फिल्म के कारण विदर्भ के किसान और और हजारों विधवाएं गुस्से में हैं। क्योंकि इस फिल्म में दिखाया गया है कि किसान मुआवजे के लालच में आत्महत्या करते हैं। तिवारी कहते हैं कि आमिर खान को किसानों के मुद्दे से कोई मतलब नहीं है। वे बस अवार्ड जीतने के लिए फिल्म बनाते हैं।

आमिर खान की पीपली लाइव रिलीज होने से पहले से ही विवादों में रही है। महाराष्ट्र के किसानों ने इस फिल्म को प्रतिबंध लगाने के साथ सेंसर बोर्ड से सर्टिफिकेट वापस लेने की मांग की है।

दस साल में मर चुके हैं दो लाख किसान

एक दशक में देश में दो लाख किसानों ने आत्महत्या की है। इसमें विदर्भ क्षेत्र में चालीस हजार किसान शामिल है। लेकिन आज तक विधवाओं को अपने पति की मौत का मुआवजा नहीं मिला है। इलाके के किसानों का कहना है कि पीपली लाइव के कारण उन 1.60 लाख विधवाओं के सामने मुआवजे का संकट आ खड़ा हो गया है जिनके पतियों ने सरकार की गलत नीतियों के कारण आत्महत्या की थी। यह फिल्म राजनेता, अधिकारियों की सोच का समर्थन करती है। (दै.भास्कर मधिल संपादित बातमी)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गंगाधर मुटे,
चित्रपट पाहून हा बाफ सुरू केला असता तर बरं झालं असतं.
चित्रपटातला शेतकरी आत्महत्या करायला निघतो कारण जिवंत शेतकर्‍यासाठी कुठल्या योजनाच नसतात. मग पैसे आणायचे कुठून?

चित्रपट पाहा, त्यात काय सांगितलं आहे ते समजावून घ्या आणि मगच मत मांडा.

मी ही नाही पाहिला, बघून सांगतो.

>>पण बातम्यावरून लक्षात येतंय की शेतकरी अनुदानाच्या लोभापायी आत्महत्या करतो, असा आभास त्या चित्रपटात निर्माण करण्यात आलेला आहे.

हे खरं असेल तर चित्रपटाचा निषेध करावा तितका थोडाच आहे. पण एकदा चित्रपट पहावा लागेल किंवा बघून आलेल्यांशी बोलावं लागेल.

दोघांपैकी आत्महत्या कोण करणार अशी चर्चा सुरू आहे असे दृश्य आहे एक त्यात विनोदनिर्मितीचा प्रयत्न दिसला. अतीशय राग आला. शेतकरी आत्महत्या हा काय विनोदाचा विषय आहे? Angry

गंगाधरजी ,
चित्रपट मीही अजून पाहिला नाही आहे त्यामुळे मी तुमच्या आरोपाबद्दल काही बोलु शकत नाही .

पण तुमच्या भावनांचा पूर्ण आदर ठेऊनही मला असे वाटते की जोवर तुम्ही स्वतः तो चित्रपट पाहत नाही तोवर हा Prejudiced निषेध करू नये , किमान शहरी लोक या निमित्ताने शेतकर्याच्या समस्याचा विचार तरी करतील हे ही कमी नाही ना ?

मला पण वाटतं की चित्रपट पाहूनच काय ते सांगता येईल. तुमच्याच नाही तर आमच्याही जिव्हाळ्याचाच प्रश्न आहे शेतकर्‍यांच्या आत्महत्या म्हणजे. तुम्ही बातम्यांवरुन म्हणताय की अनुदानासाठी आत्महत्या असा आभास निर्माण केला गेला आहे. तो बघण्याचा एक अँगल असू शकतो परंतु मला वाटतं की एवढ्या सिरियस विषयाची अशी खिल्ली उडवण्यासाठी कुणी चित्रपट काढेल एवढं इनसेंसिटीव्ह कुणीही नसावं, विशेषकरुन भारतासारख्या कृषीप्रधान देशात. चिनूक्स म्हणतो तसाच अर्थ असावा, जो आपल्यातल्या संवेदनशील माणसाला एक फटका देऊन जातो.

गाभ्रीचा पाऊस हा सिनेमा बघितला आहे का तुम्ही?? तो पण शेतकरी आणि त्यांच्या आत्महत्या यावर बराचसा बेतलेला होता.

मुटेजी,
बाजारात तुरी आणि.....
असे नको. चित्रपट पाहुन निषेधाचे कारण स्पष्ट करा. प्रतिक्षेत.

>>ब्लॅक कॉमेडी, satire अशा काही गोष्टींबद्दल ऐकलं आहे का?

भरपूर ऐकलं आहे, आणि तसले चित्रपट पाहीलेही आहेत.

संपूर्ण चित्रपटात त्या शेतकर्‍याला आत्महत्येपासून रोखण्यासाठी मूलभूत उपायांबद्दल कोणीच बोलत नाही. कारण योजनाच नसतात. कृषिमंत्र्याचं लक्ष निवडणुकांवर असतं. शेतकर्‍यांनी शेती करणं सोडावं, असं तो सांगतो. प्रसारमाध्यमंही या बातमीकडे trpसाठी बघतात.
हा चित्रपट पूर्णपणे शेतकर्‍यांची बाजू घेतो.
दुर्दैवानं शेतलर्‍यांनाच चित्रपटातला आशय कळत नाही. हरी महातो दिसण्याची त्यामुळे अपेक्षाच नाही.

<<पण विषय कुठला निवडावा याला काही मर्यादा आहे की नाही. तेही भारतीय संदर्भात?>>

एका ज्वलंत विषयावर चित्रपट निघू नये?

चित्रपटात आत्महत्येची नव्हे, कृतिशून्य शासनाची, कृषिमंत्र्यांची, राजकारण्यांची, प्रसारमाध्यमांची खिल्ली उडवली आहे.

बरोबर आहे चिनुक्स, तसं असेल तर वर म्हटल्याप्रमाणे चित्रपट पहावाच लागेल.

मुटे सर, तुम्हीही जमल्यास चित्रपट पहावा. शेतकर्‍यांची बाजू घेणारा असेल तर निषेध नव्हे तर कौतूक करावे लागेल.

मंदार , गंगाधरजी , आपण तिघेही हा चित्रपट आधी पाहू आणी मग चर्चा करू . Happy
माझ्या ज्या मित्रानी काल पाहिला त्यान्ची प्रतिक्रिया ही चिनूक्स सारखीच होती .

>>चित्रपटात आत्महत्येची नव्हे, कृतिशून्य शासनाची, कृषिमंत्र्यांची, राजकारण्यांची, प्रसारमाध्यमांची खिल्ली उडवली आहे. << चिनूक्सशी सहमत. कालच विदर्भात आमिर खानचे पोस्टर्स जाळण्यात आले, पण किती जणांनी हा चित्रपट पाहिलाय व पाहिलेल्यातील कितींना हा कळलाय हे महत्वाचे.

कालच विदर्भात आमिर खानचे पोस्टर्स जाळण्यात आले, पण किती जणांनी हा चित्रपट पाहिलाय व पाहिलेल्यातील कितींना हा कळलाय हे महत्वाचे.

विदर्भात आमीरखानचे पोस्टर्स ज्या शेतकर्‍यांनी जाळलेत, त्यांचे अभिनंदन. आणि त्यांचे मी समर्थन करतो.
कारण...
- चित्रपट न पाहताच पोस्टर्स जाळण्याएवढा शेतकरी रिकामटेकडा असावा, असे मला वाटत नाही.
- ज्यांनी पाहिला त्यांना कितपत कळले असावे ही शंका रास्त आहे. पण शेतकर्‍यांचा विषय शेतकर्‍याला निट कळेल अशी मांडणी हवी की नाही?
त्याने जे पाहिले, त्यावरून त्याने जो अर्थ घेतलाय त्या अर्थाने पोष्टर जाळणे सुसंगत असेल तर त्याच्या मताचा सन्मान व्हायला हवा.
त्याला सारासार विचार करण्याएवढी अक्कल नाही, असा बिगरशेतकरी समाजाने कायमचा हट्ट धरून बसणे योग्य नव्हे.

कृतिशून्य शासनाची, कृषिमंत्र्यांची, राजकारण्यांची, प्रसारमाध्यमांची खिल्ली उडवली आहे.<<
ज्या अर्थी ह्या गोष्टीचे राजकारण केले जात आहे तेव्हा हा सिनेमा येऊच नये असे प्रयत्न होणे अपेक्षीतच होते.

मला अमिरचे सिनेमे पहायला आवडतात, वेगवेगळे विषय मांडण्याचा त्याचा प्रयत्न मनापासूनचा वाटतो.

मी चित्रपट पाहीलेला नाही आणि पहावे असे वाटतही नाही. कारण शेतकर्‍यांच्या आत्महत्या विनोदाचा विषय होणे किंवा विनोदी चित्रपटात शेतकर्‍यांच्या आत्महत्येसारखा गंभिर विषय हाताळणे हेच मुळी विकृतीचे लक्षण आहे. >>>>>. काहीही. उलट शेतकर्‍यांच्या बाबतीत उदासिन असलेल्या लोकांवर भाषणबाजी न करता भाष्य केलेले वाटले.
चित्रपट बघितल्याशिवाय बोलण्यात काय अर्थ आहे. Uhoh

कालच विदर्भात आमिर खानचे पोस्टर्स जाळण्यात आले, पण किती जणांनी हा चित्रपट पाहिलाय व पाहिलेल्यातील कितींना हा कळलाय हे महत्वाचे.>>>>> अगदी. दुर्दैवाने असल्या स्टंट्स मागे राजकीय पोळी भाजुन घेणे हाच उद्देश असतो. Sad

त्याला सारासार विचार करण्याएवढी अक्कल नाही, असा बिगरशेतकरी समाजाने कायमचा हट्ट धरून बसणे योग्य नव्हे.
>>>> असं नाहिये हो ! पण एवढ्या लोकांनी खरंच हा चित्रपट पाहूनच ही कृती केली असेल का याबद्दल शंका येतेय कारण आपल्याकडे सगळ्याच ठिकाणी भरकटवणारे खूप लोक असतात आणि त्यांचे अंधानुकरण करणारेही खूप असतात. आधीच भयानक परिस्थितीने हळवे झालेले मन, अशावेळेस जाळपोळीला उद्युक्त करणे सोपे असते. त्यांच्या मनस्थितीचा गैरफायदाही घेतला जाऊ शकतो वैयक्तिक स्वार्थासाठी.

त्याने जे पाहिले, त्यावरून त्याने जो अर्थ घेतलाय त्या अर्थाने पोष्टर जाळणे सुसंगत असेल तर त्याच्या मताचा सन्मान व्हायला हवा. >>>> मताचा सन्मान व्हायलाच हवा. पण पोस्टर जाळून मताचा सन्मान होईल का? त्यापेक्षा काय चुकतंय हे व्यवस्थितपणे योग्य व्यक्तिंपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. म्हणजे संबंधित व्यक्ती तो घेतला गेलेला अर्थच अभिप्रेत आहे किंवा नाही ते सांगू शकतील. नाहितर नुसते गैरसमजच होतील.

पण जर का या चित्रपटामुळे शेतकर्‍यांच्या (पर्यायाने सर्व समाजाच्याच, कारण शेतकरीच अन्नदाता आहे) समस्या सगळ्यांसमोर आल्या तर शेतकर्‍यांना अजून चांगला पाठिंबा समाजाकडून मिळेल.

गंगाधर मुटे,
चित्रपट न पाहता मतप्रदर्शन करणे अयोग्य आहे. आणि जर तुम्ही चित्रपट पाहणार नसाल, तर कृपया लोकांची दिशाभूल करू नका.

गंगाधरजी चित्रपट न पहाता कसे मत नोंदवू शकता?

मी हा बाफ न बघता आत काय लिहीले आहे हे न वाचताच प्रतिक्रिया दिली तर हास्यास्प्द नाही होणार? तो केवळ मनातला तर्क नसेल?

तुम्ही जरुर चित्रपट पहा मगच मत नोंदवा.

एक्झॅक्टली. मुटे, पोस्टर कोणी जाळली, त्यांना चित्रपट किती कळला म्हणून जाळली की त्यांना कोणी भडकवलं म्हणून जाळली ह्याचा तरी विचार करा एकदा. तुम्ही प्रगतीशील शेतकरी आहात. तुम्ही चित्रपट पाहून, त्यावर विचार करून उलट तुमच्या शेतकरी मित्रांना चित्रपटाबद्दल सांगू शकता. पण चित्रपट न पहाताच ऐकीव घटनांवर जाहीर एकांगी विधानं का करताय? प्रत्येक गोष्टीला किमान दोन बाजू असतात हे तरी समजून बोला. चित्रपट म्हणजे वाईटच हेच गृहितक असेल तर काहीच होऊ शकत नाही. जिथे मन प्रीजुडाईस्ड आहे, तिथे कोणत्याच चर्चेला वाव नसतो. चर्चा हवी असेल तर मन सर्व विचार ऐकण्यासाठी, विचार करण्यासाठी उघडं ठेवा.

वरील सर्व प्रतिसाद वाचलेत.

त्यात व्यक्त झालेली मते मला प्रतिसादवाचण्यापुर्वी, हा बाफ उघडण्यापुर्वीही
माहित असलेलीच मते आहेत. त्यामुळे तुम्ही काय म्हणता हे मला कळलेलेच आहे.
तसा मी तुमचे विचार समजून घ्यायचा पुन्हा प्रयत्न केला आणि यापुढेही करणारच आहे.

पण मला नेमके काय म्हणायचे आहे हे कोणी समजाऊन घ्यायचा प्रयत्न करणार काय?

शेतकरी अनुदानाच्या लोभापायी आत्महत्या करतो असे चित्रण त्यांत नाही काय?
कुणी तरी सांगावे, ही अपेक्षा.

<शेतकरी अनुदानाच्या लोभापायी आत्महत्या करतो असे चित्रण त्यांत नाही काय?
कुणी तरी सांगावे, ही अपेक्षा.>

नाही. जमीन सोडवण्यासाठी पैसे आवश्यक असतात. गावातला पुढारीच सांगतो की जिवंत राहून काही होणार नाही, आत्महत्या केली तर पैसे मिळतील. दोघा भावांपैकी एकाने आत्महत्या केली तर मिळणार्‍या पैशातून जमीन सोडवता येईल, असा विचार केला जातो.

आणि आत्महत्या करताना कसला लोभ असतो हो? काहीच्या काही.
चित्रपट बघा.

इतर बाफवर तुमचा आरडाओरडा पटत नसला तरी तुमचीही एक बाजु म्हणुन त्याला एक वेळ खपवुन घेता येउ शकते. पण इथे तुम्ही जो आरडाओरडा चालवला आहेत तो अत्यंत अतार्किक आहे. मुळात चित्रपट बनविण्याच्या काही पध्दती असतात. एखद्या विषयावर ब्लॅक ह्युमर सिनेमा तयार करायचा अधिकार चित्रपट निर्मात्याला असतो. मधे अर्षद वारसी,जोन अब्राहमचा असाच एक सिनेमा अफगाणिस्तान विषयावर आला होता. काबुल एक्सप्रेस. त्यात तुमचा शेतकरी कुठेच नव्हता. तुम्हाला तो ब्लॅक ह्युमर कळत नसेल तर समजावुन घ्या,पण अशी एकांगी विधाने करु नका.
मुळात शेतकर्‍यांचे प्रश्न मांडायचा हक्का फक्त तुम्हालाच आणि तुमच्याच style ने दिले आहेत अशा थाटात हा बाफ सुरु झाला आहे.

शेतकरी अनुदानाच्या लोभापायी आत्महत्या करतो असे चित्रण त्यांत नाही काय?
---- असे चित्रण त्यात आहे हे तुम्हाला कसे माहित?

गंगाधरराव : सिनेमा एक सशक्त माध्यम आहे आसपास जे घडतं ते दाखवण्याच... मग त्या जाणिवात उणिवा असु शकतात पण त्याच इथे डिसेक्शन कशाला ? सिनेमाने क्रांती होत नसते अन तसला इतिहास नाही मग त्यावर इतक प्रि-पोश्चरस होण फारसं संयुक्तीक वाटत नाही. मी मध्यंतरी बीबीसीवर "हार्ड टॉक" सदरात ऑलीव्हर स्टोनची मुलाखत बघीतली त्यात त्याला प्रश्न विचारणार्‍यान खुप टोचल - अमेरीकन व्यवस्थेविरोधात सिनेमे बनवण्यासाठी... ( 'वॉलस्ट्रीट' नावाचा एक नितांत सुंदर सिनेमा त्यान अमेरीकन आर्थीक व्यवस्थेवरची कमेंट होईल असा बनवला होता...आता तो परत त्याच धर्तीवर एक सिनेमा घेऊन येतोय..या पार्श्वभुमीवर ही मुलाखत होती..) पण त्यानही प्रांजळपणे सांगितल की जे मला भरपुर संशोधन करुन कळतं ते मी माझा व्ह्यु पॉईंट म्हणुन लोकांसमोर ठेवत असतो.. त्यात क्रांती आणण्याचा हेतु नाही अन अमेरीकन व्यवस्था बदलण्याची ताकद तर निश्चीतच नाही. असो... तर हेही फारसं वेगळ नाही...!!!

विदर्भात आमीरखानचे पोस्टर्स ज्या शेतकर्‍यांनी जाळलेत, त्यांचे अभिनंदन. आणि त्यांचे मी समर्थन करतो.
कारण...
- चित्रपट न पाहताच पोस्टर्स जाळण्याएवढा शेतकरी रिकामटेकडा असावा, असे मला वाटत नाही.
- ज्यांनी पाहिला त्यांना कितपत कळले असावे ही शंका रास्त आहे. पण शेतकर्‍यांचा विषय शेतकर्‍याला निट कळेल अशी मांडणी हवी की नाही?
त्याने जे पाहिले, त्यावरून त्याने जो अर्थ घेतलाय त्या अर्थाने पोष्टर जाळणे सुसंगत असेल तर त्याच्या मताचा सन्मान व्हायला हवा.
त्याला सारासार विचार करण्याएवढी अक्कल नाही, असा बिगरशेतकरी समाजाने कायमचा हट्ट धरून बसणे योग्य नव्हे.
>>>> पण पिक्चर न पहाताच तुम्ही हे कसं काय ठरवणार बुवा? Uhoh

Pages