मनोरंजन

भाजी घ्या भाजी

Submitted by Kiran.. on 7 September, 2012 - 03:34

भाजी घ्या भाजी
कोबीची भाजी
सकाळी दुपारी तिन्ही त्रिकाळी
आवडीने खा ही कोबीची भाजी

फळं घ्या फळ
भरदार केळं
उठता बसता तिन्ही त्रिकाळी
पोटाला बरी जळगावची केळं

टीव्ही पहा टीव्ही
मालिकांचा टीबी
हिंदी मराठी चॅनेल कुठलेही
शिळ्याच मालिकांची मसालेदार ग्रेव्ही

गझल घ्या गझल
रतिबाची गझल
रोजचा पेपर चुकेल गं बाई
पण चुकणार नाही या माबोवर गझल

मीतर खेळणार पावसात भिजून

Submitted by पुरंदरे शशांक on 6 September, 2012 - 02:43

गड गड गुडुम आभाळ भरुन
वीज चमकली लकलक करुन

थेंब थेंब थेंब थेंब आले वरुन
टप टप टप टप आवाज करुन

सर सर सर सर आली धाऊन
पाणी वाह्यले खळखळ करुन

होड्या छान छान देना करुन
पाण्यात सोडीन एक एक करुन

मीतर खेळणार पावसात भिजून
पहा तू मज्जा घरात बसून

पावसात आता घेतो खेळून
अभ्यास नंतर टाकीन करुन

"बास बास" तुझं दे ना सोडून
येईल का पाऊस उद्या फिरुन ?????

मना मनात श्रावण...

Submitted by पुरंदरे शशांक on 5 September, 2012 - 04:47

थेंब धरेवरी येता
झाले हिरवे पिकून
पाना फुलात ओलावा
येई पुन्हा उमाळून

थेंब जरतारी साज
रंगारंगात न्हाऊन
पाचूवाणी झालं रान
दिठी गेली खुळावून

थेंब अलगद पाती
खुणावती कोणा कोण
असा लाजरा साजरा
मना मनात श्रावण...

बडबड गीत

Submitted by पुरंदरे शशांक on 4 September, 2012 - 00:58

चिमणा चिमणी राजा राणी
बाळ त्यांचं मोठ्ठं गुणी

तोतो (आंबो) करते खुळखुळ पाणी
दूदू पिते शाण्यावाणी

कित्ती बाई ते चळवळी
भुर्रर म्हण्ता हस्ते खळी

आ आ गाते गोगोड गाणी
गागू करते पाखरावाणी ....

शब्दखुणा: 

मराठी विनोद

Submitted by सन्तोश भास्कर पातिल on 3 September, 2012 - 11:23

एकदा एक लग्नाळू मुलगा मुलगी पाहण्यासाठी जातो.

प्राथमिक सोपस्कार (म्हणजे खोटे खोटे स्वागत ,चहापाणी , कांदेपोहे ईत्यादी इत्यादी) पार पडल्यानंतर मुला मुलीला थेट बोलायची संधी मिळते.

नव्या जमान्याप्रमाणे मुलगी जरा फॉरवर्ड असते तीच संभाषणाला सुरूवात करते.

मुलगी : तुला काय येते?

मुलगा : मला घाम येतो !
तुला काय येते?

मुलगी : मला गाता येते !

मुलगा : मग गाऊन दाखव.

मुलगी : गाऊन तर बाहेर वाळत घातला आहे .

मुलगा : मग असूदे, वाळू दे!

ह्यावर ती मुलगी बाहेर जाते व मुठभर वाळू घेऊन येते.
.
पुढे काय,असे विचारताय?

विषय: 

काळी मैना (का क क)

Submitted by पुरंदरे शशांक on 3 September, 2012 - 05:52

काळी मैना

किती साजिरी ती किती कृष्णवर्णा
कसे नाम साजे तिये काळि मैना
बहू वर्णी शोभे जरी मोहनाही
वदे लोक तीते परि ब्लॅकबेरी

उन्हाळ्यातचि भूवरी येत होती
अता शोभते ती सदाचिच राणी
असे व्यापूनी ती जनाच्या मनाते
तियेवीण सर्वा अती खंत वाटे

जनाच्या सदा अंजुळी शोभताहे
कुणाचा खिसा भार तीचाच वाहे
असे व्यापुनी सर्व विश्वासि राहे
तियेवीण तो व्यर्थ संसार पाहे

शब्दखुणा: 

कस्सा राव थांबू...

Submitted by अत्रुप्त आत्मा on 1 September, 2012 - 00:23

मूळ गीतः-काय बाई सांगू,कस्सं गं सांगू...!

कस्सा राव थांबू,कित्ती मी थांबू
आतून प्रेशर येतय आज
ताडी कच्ची मारुन आलोय आज...!

मधेच घुसुनी दांडी गुल
बाहेर माला प्रेशर फुल्ल
टुरटुरण्याचा अन् डबड्याचा
मंजुळ आतुन येइ अवाज
ताडी कच्ची मारुन आलोय आज...!

जरी थांबलो 'दाबुन' नीट
आतल्या आत,तरी पडते पीठ
पिळ-वटलेली अतडी अशी ही
लवकर ये रे...कित्ती हा माज
ताडी कच्ची मारुन आलोय आज...!

कृष्ण मोहिनी

Submitted by पुरंदरे शशांक on 31 August, 2012 - 05:01

खळखळणारा अद्भुत श्रावण
नाचत येतो ओला होऊन
रंग फुलांचे अंगी लेवून
गाणे गाई झर्‍याझर्‍यातून

हिरवा मरवा गंधित साजण
कृष्ण घनांना थोडे सारून
उन्हात वेडा रंग उधळतो
सप्तरंग देतो फिस्कारून

रेशीम कोवळ हिरवी कांती
सळसळ अंगी किती हा नवथर
रंगबिरंगी हसू ओठींचे
मनामनावर नाजुक फुंकर

असाच वेडा सुखवून जाई
कधी कळेना याचे अंतर
वसुंधरा का राधा वाटे
कृष्ण मोहिनी ही कोणावर

शब्दखुणा: 

खेळ मांडला ...

Submitted by अवल on 30 August, 2012 - 03:43

मानवी भाव-भावनांचा, खेळ मांडला मी
शतकी चलचित्रपटांची, गाथा मांडली मी

"राजा हरिश्चंद्रा"ची, पहिली वहिली कथा.....................(पहिला चलचित्रपट, १९१३)
गाऊ, बोलू लागली, ही "आलम आरा".........................( पहिला बोलपट, १९३१)
भारतीय चित्रपट पहिला, "आयोध्येचा राजा"................( पहिला पूर्ण लांबीचा भारतीय चित्रपट, पहिला मराठी चित्रपट, १९३२)
आली रंगूनी "सैरंध्री", शोभली सप्तरंगा.................... ..(पहिला रंगीत चित्रपट, जर्मनीत प्रोसेस केलेला,१९३३)
मिळू लागला न्याय, "अछुत कन्या" ला..................... (सामाजिक प्रश्नावरील चित्रपट, १९३६)

बाळ आणि तै

Submitted by पुरंदरे शशांक on 30 August, 2012 - 00:23

"मी जर आहे बाळाची ताई
बाळाला माझ्याकडे दे की गं आई "

"हो तर ताई
रुसु नका बाई
अजून हे बाळ छोटं कि नै
मान पण नीट धरतंच नै

मोठ्ठं होईल जरासे किनाई
हाकही मारेल तुला ते "ताई"

मग काय मजा ताईची बाई
बाळ आणि तै, बाळ आणि तै
आम्ही तर मधे कुणीचच नै"

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - मनोरंजन