मना मनात श्रावण...

मना मनात श्रावण...

Submitted by पुरंदरे शशांक on 5 September, 2012 - 04:47

थेंब धरेवरी येता
झाले हिरवे पिकून
पाना फुलात ओलावा
येई पुन्हा उमाळून

थेंब जरतारी साज
रंगारंगात न्हाऊन
पाचूवाणी झालं रान
दिठी गेली खुळावून

थेंब अलगद पाती
खुणावती कोणा कोण
असा लाजरा साजरा
मना मनात श्रावण...

Subscribe to RSS - मना मनात श्रावण...