काळी मैना

काळी मैना (का क क)

Submitted by पुरंदरे शशांक on 3 September, 2012 - 05:52

काळी मैना

किती साजिरी ती किती कृष्णवर्णा
कसे नाम साजे तिये काळि मैना
बहू वर्णी शोभे जरी मोहनाही
वदे लोक तीते परि ब्लॅकबेरी

उन्हाळ्यातचि भूवरी येत होती
अता शोभते ती सदाचिच राणी
असे व्यापूनी ती जनाच्या मनाते
तियेवीण सर्वा अती खंत वाटे

जनाच्या सदा अंजुळी शोभताहे
कुणाचा खिसा भार तीचाच वाहे
असे व्यापुनी सर्व विश्वासि राहे
तियेवीण तो व्यर्थ संसार पाहे

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - काळी मैना