कस्सा राव थांबू...

Submitted by अत्रुप्त आत्मा on 1 September, 2012 - 00:23

मूळ गीतः-काय बाई सांगू,कस्सं गं सांगू...!

कस्सा राव थांबू,कित्ती मी थांबू
आतून प्रेशर येतय आज
ताडी कच्ची मारुन आलोय आज...!

मधेच घुसुनी दांडी गुल
बाहेर माला प्रेशर फुल्ल
टुरटुरण्याचा अन् डबड्याचा
मंजुळ आतुन येइ अवाज
ताडी कच्ची मारुन आलोय आज...!

जरी थांबलो 'दाबुन' नीट
आतल्या आत,तरी पडते पीठ
पिळ-वटलेली अतडी अशी ही
लवकर ये रे...कित्ती हा माज
ताडी कच्ची मारुन आलोय आज...!

''जाऊ दिलं...'', नी फसलो मी
तू आत मेल्या शिगरेटी पी...!
पेपर वाचायची एकच जागा
कशी विसरू मी शिकलो आज
ताडी कच्ची मारुन आलोय आज...!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

@सकाळी सकाळी कायच्या काय पोस्ट केलेस तु. >>> आपल्यात ही घटना (जास्ती करुन) रात्री घडते काय?

अत्यंत सुलभ कविता. मिसळीच्या उपयुक्त माहितीनंतर हे इशारे पण मस्टच होते Wink

जर कधी मराठी सिनेमा काढला(च) तर मराठीतल्या सलमानसाठी हे गाणं नक्कीच घेईन. सिनेमाचं नाव ठरवण्यात आलेलं आहे.
ओये , मी बिल दिलं प्रिये

@सकाळी सकाळी कायच्या काय पोस्ट केलेस तु. >>> आपल्यात ही घटना (जास्ती करुन) रात्री घडते काय?

>>>
अ आ, हे सकाळीच घडते पण, सकाळी सकाळी असले वाचायला लै वन्गाळ वाटते राव, म्हणुन फक्त...