मीतर खेळणार पावसात भिजून

मीतर खेळणार पावसात भिजून

Submitted by पुरंदरे शशांक on 6 September, 2012 - 02:43

गड गड गुडुम आभाळ भरुन
वीज चमकली लकलक करुन

थेंब थेंब थेंब थेंब आले वरुन
टप टप टप टप आवाज करुन

सर सर सर सर आली धाऊन
पाणी वाह्यले खळखळ करुन

होड्या छान छान देना करुन
पाण्यात सोडीन एक एक करुन

मीतर खेळणार पावसात भिजून
पहा तू मज्जा घरात बसून

पावसात आता घेतो खेळून
अभ्यास नंतर टाकीन करुन

"बास बास" तुझं दे ना सोडून
येईल का पाऊस उद्या फिरुन ?????

Subscribe to RSS - मीतर खेळणार पावसात भिजून