दैनंदिन जीवनात पडणारे किरकोळ प्रश्न आणि उत्तरे

Submitted by वेलांटी on 16 September, 2022 - 01:12

रोजच्या दैनंदिन जीवनात नेहमी किरकोळ प्रश्न पडत असतात, ज्याची उत्तरे पटकन मिळाली तर बरे असे वाटते. कधी काही महत्वाची पण तातडीने माहिती हवी असते. अशा प्रश्नांसाठी हा धागा काढत आहे. जेणेकरून अनेक प्रश्न आणि उत्तरे एकाच धाग्यावर मिळतील आणि त्याचा फायदा अनेकांना होईल.
विषयाचे बंधन नाही. तुम्हाला पडणारे किरकोळ प्रश्न इथे विचारा, ज्यांना माहित आहेत त्यांनी उत्तरे द्या.
सुरूवातीला मला पडलेला प्रश्न विचारते, रोज जेवणानंतर बडिशेप खायची सवय असेल तर भाजलेली बडिशेपच खाल्ली पाहिजे का? कच्चीच बडिशेप खाल्ली तर काही दुष्परिणाम होतो का?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

न चालायला काय झाल्यानी! पथ्य पाळले की झाले! तुमच्या होम्योपदीची पथ्ये बाकी फार कडक हो!
पण खरं सांगायचं तर नाही चालत. कारण हॉम्योपदी प्लासिबो वर चालतं, आणि म्हशी विचार करू शकत नाहीत. त्यांना जोक ही समजत नाहीत म्हणे !

“ आमच्या चांदीचं एक शिंग विचार करकरून सव्वा दोन इंच लांब झालंय.” - इशान्येकडून नैऋत्येकडे गेली असणार. त्याशिवाय असं होणार नाही. विचारून पहा एकदा शिवराम गोविंदला.

उजव्या हाताची बोटं भयंकर दुखताएत..स्पेशली मुलांना धपाटे घातल्यावर..कशामुळे?? >> मला वाटतं इथे धपाटे घालण्याची पद्धत चुकत असावी. आपल्या हाताचा प्रत्येक जॉइंट हा तरफेसारखा काम करतो. जिथे बल लावायच आहे, तिथून जितका लांबचा जॉइंट बल लावण्यासाठी निवडाल तितकं चांगलं. तुम्ही कदाचित हात मनगटात वाकवून बोटांनी धपाटा देत आहात काय? त्यापेक्षा बोटांपासून हाताच्या कोपरापर्यंत हात ताठ ठेवा आणि कोपरापासून हात हलवून धपाटा मारून बघा. अधिक उपयोगासाठी कोपरदेखील ताठ ठेवून खांद्यापासून हात फिरवून बघा, त्याने तुम्हाला जास्त जोर विनासायास लावता येईल. आमचा आर्डरली असाच हाणतो.

शिवाय मार पडताना तो बोटांतून न पडता तळहातावरून पडला तर ते बल तुमच्या हाताच्या जास्त मोठ्या भागावर पसरेल आणि पॉइंट लोड येणार नाही, बोटे सुरक्षित राहतील. मुलांच्याही शरीरावर त्याने पॉइंट लोड येणार नाही ज्याने दुखापत व्हायची शक्यता कमी होईल. तळहात किंचित वाकवून शड्डू ठोकल्याप्रमाणे मारल्यास कमी बल लावून जास्त आवाज काढता येईल आणि आवाजाच्या मानाने मार कमी बसेल. इथे ॲक्शन इतकीच रिएक्शन असते हे तत्त्व आहे.

हपा ऊत्तम पोस्ट !

कधी रस्त्यावर बाचाबाची झाल्यास एखाद्याला छातीवर हात ठेऊन धक्का देतानाही मनगट दुमडून तिथून जोर काढू नये तर हात ताठ ठेऊन शरीरातले सगळे बल छातीत एकवटून तिथून फोर्स जनरेट करावा. समोरची व्यक्ती आणखी मागे ढकलली जाते आणि कोलमडल्याने तिचा आत्मविश्वास डळमळीत होऊन आपल्याला घाबरते.

बाकी तो आवाजी फटाका मोठ्या पोराला खोटे खोटे मारून लहान पोराचे समाधान करायला वरचेवर वापरावा लागतो.

Light 1 चाचू सेहत के लिए तू तो हानिकारक है... Light 1 नको गं मारू मुलांना असं काही सांगायचं तर कसं बदडायचं याच्या अजून आयडिया देतायत एकेक... Happy

कशामुळे नक्की कसं सांगणार?! फार मोबाईल्/किंडल इ वापरल्याने, खूप थंडीमुळे, मुलांना बदडल्याने, वाणसामानाच्या जड पिशव्या उचलल्याने अशी बरीच कारणे असू शकतात. एकेक कमी करून बघ. नाही फरक पडला तर डॉक्टर गाठ

हपा Lol उपयुक्त पोस्ट.

बार्सिलोना म्हणतेय तसं मोबाईल, किंडल,खूप थंडी, त्या थंड पाण्यात घरकाम वगैरे मुळे होत असावं..तो इमोजी बॉल आणून बेसिक एक्सरसाईज सुरू करावी आधी.

जास्त काळ दुखत रहात असतील बोटं तर बार्सिलोना म्हणतात तसे थेट डॉक्टरना विचारलेलं बरं. कॅल्शियमशी संबंधित असू शकेल. हरपा यांनी भौतिकशास्त्राच्या नियमानुसार खूप छान सांगितले आहे. त्यानुसार वेगवेगळ्या तऱ्हेने बेडवर टेबलवर हाताचा तळवा आपटून नक्की कशा प्रकारे मार पडल्यास तळवा जास्त दुखतो हे पहा. त्यानुसार डॉक्टरांशी बोला.

माझी बोटे दुखणे मानेचे (सोपे ) व्यायाम सुरू केल्यावर खूप कमी झाले.
टीप- स्वतःच्या जबाबदारीवर करून बघा.
टीपेची टीप- टीप नाही लिहिली तर या पोस्टवर ( वैचारिक) हल्ले होण्याची दाट शक्यता वाटली.

मोठ्या शहरांमध्ये गुगल मॅप एकदम नीट चालते.
छोट्या गावात, शहरांत गुगल मॅप अडाणी होते हा स्वानुभव.
विशेषतः छोट्या गावाना जोडणाऱ्या रस्त्यावरून जाताना शॉर्टकट म्हणून ते असे रस्ते दाखवते जे बैलगाडीने अथवा ट्रॅक्टरने जाण्यासारखे असतात.
भंडारा धरणाच्या बॅकवॉटर मध्ये गाडी घाला असे सारखे सारखे सांगत होते हा ही एक अनुभव.

सहा महिन्यांंपूर्वी असाच एक धागा काढलेला कोणीतरी तो उडवला गेला होता.

>> मीच काढला होता. Admin ने तंत्रज्ञान, आरोग्य, प्रवास असे वेगवेगळे विषयांवरचे प्रश्न एकाच धाग्यावर आले तर विषयानुरूप मायबोलीवर केलेले वेगवेगळे कप्पे काय कामाचे असे सांगून तो बंद केला होता.

गुगल मॅप डोंगराळ एरियात खूप गंडतं.आम्हाला शॉर्टकट म्हणून एकदा मातीच्या मोठ्या ढिगाऱ्या समोर आणि दुसऱ्या वेळा एका तळ्याच्या समोर नेलं आहे.गुगल मॅप अधिक मानवी नॅव्हीगेटर(म्हणजे आजूबाजूला माणसं) असं दोन्ही वापरुन चांगले परिणाम मिळतात.

मध्ये अशी एक बातमी वाचली होती.
रात्री ची वेळ होती आणि गूगल map नी जो रस्ता दाखवला त्या वर एक गाडी धावत होती.पण तो रस्ता मध्येच संपत होता.
Driver च्या लक्षात नाही आले अचानक रस्ता संपला आणि ती गाडी नदीत पडली
अंधाऱ्या रात्री headlight ल पण मर्यादा असतात.
खूप दूरवरचे स्पष्ट दिसणे मुश्कील.

उ बो Lol तोच सल्ला मिळाला होता घरातल्यांकडून.

इतर वेळी माझ्या लक्षात पण आलं नाही कि बोटं दुखताएत मुलांना फटके लावणं निमित्त झालं आणि समजलं.

मुलांना भावनिक पातळीवर च कंट्रोल करावे.त्यांना मारणे,त्यांच्या मताना किंमत न देणे ह्याचे गंभीर परिणाम होतात

>> लहान मुलांना फटके मारावेत का?
>> नवीन धाग्याचा विषय आहे.

+१ बरेच पोटेंशियल आहे
मायबोलीवरच नव्हे आंतरराष्ट्रीय स्तरावर सुध्दा यावर देशा देशांच्या कल्चरनुसार विविध मते आहेत. चीन सारख्या देशात मॉल मध्ये मुलांना मारण्यासाठी छड्या मिळतात हे वाचून मध्यंतरी अनेकांना धक्का बसला होता. तेच युरोपात अमेरिकेत मुलांना मारणे कायद्याने गुन्हा आहे.

मी गेले चार वर्षे या प्रश्नाचे उत्तर शोधतोय.
मायबोलीवर असा धागा आहे का शोधतो, नसल्यास काढतो.

Pages