चष्म्याच्या किमती किती खर्‍या किती खोट्या?

Submitted by यक्ष on 8 December, 2017 - 09:42

साधा वाचनाचा चष्मा. फुटला!!
(वर्षापूर्वीच जंगली महाराज रोडवरील प्रख्यात डॉ़क्टरांकडे डोळे तपासून तिथल्याच दुकानातून सुमारे ६५०/- ला (फ्रेम व काचा मिळून) चष्मा करवून घेतला होता. अगदी समाधान कारक होता.)
एका नामांकित कंपनीच्या शो रूम मध्ये १ तासाच्या माहिती कार्यक्रमानंतर व निरनिराळ्या काचांच्या मेनुकार्ड च्या चर्चा सत्रानंतर (फक्त काचा बदलासाठी - फ्रेम जुनीच ठेउन) सुमारे ३ ते ५ ह. एवढे ऑप्श्न्स आले. न घेता निघालो तेंव्हा 'फ्रेम फ्री' देउ असे आमिष दिले.
ते काही ठिक वाटले नाही म्हणून दुसर्‍या एका परदेशी कंपनीच्या शो रूम मध्ये चौकशी करता डोळे पांढरे व्ह्यायची वेळ आली. त्याने नुसत्या काचा (त्या वेगवेगळ्या कोटिंग बद्दल काय खरे काय खोटे देव जाणे! (माहितीत्रकातील सगळे फोटो परदेशी व्यक्तिंचे त्यात देशी एकही नाही! ) सुमारे ७ ते १० ह. पर्यंत अंदाज सांगितल्यावर तिथून सटकलो!
चिरंजिवांन्ना एव्हाना माझी दया आली असावी. त्याने बर्‍याच ठिकाणी हेलपाटे मारून एका गावठाण एरियातून चष्मा करवून आणला व माझ्या हवाली केला. घातला व एकदम पटला. उत्सुकतेने किंमत विचारली. "साधे कांच लावलेत - हाय फाय नाही - खर्च १५०/- रुपये - सांभाळून वापरा" असे सुनवल्यावर उडालोच!.
डोळे भरून आले!. एकदम छान वाटले!.
चिरंजिवांन्नी चांगले काम केले म्हणून आणी (मला वाटणार्‍या) योग्य किमतीत चांगला चष्मा मिळाला म्हणून!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

दिडशे रुपयात साधा वाचनाचा चष्मा करुन हवा असतांना नामांकित आणि परदेशी दुकानांत जायचेच कशाला म्हणतो मी...? त्या नामांकित आणि परदेशी दुकानांत तुमच्या येण्याजाण्याचाच, तुम्हाला अटेन्ड करण्याचा त्यांनाच पडणारा भुर्दंड हजारेक रुपये असेल. त्यात तुम्ही खरेदी केलीच नाही म्हणजे त्यांना हजार रुपयाला गंडवून आलात.

आणि इथे येऊन खर्‍या खोट्या किंमतीवर धागा काढायचा.... काहीही काय य?

यक्ष किमतीबद्दल फार नाही बोलत थोडसं काचेबद्दल बघा पटतंय का?? तर साधारण दीडशे रुपयाला जी ग्लास घेतली ती काच निकृष्ट दर्जाची असते त्याला पटकन क्रॅश पडतो ज्यामुळे डोळ्यांना त्रास होण्याची शक्यता आहे . ५-६ हजार ही थोडी अती किंमत आहे कदाचित तेवढी असेलही त्याची क्वालिटी पण साधारण २-२.५ हजार पर्यंत चांगली ग्लास मिळेल. त्याची फर्स्ट कॉपी ९०० पर्यंत मिळते. नंबर मोठा असेल आणि मोबाईल लॅपटॉप वगैरे जास्त वापरत असाल तर ग्लास मध्ये तडजोड करू नका फ्रेम हलकी वापरा पण ग्लास शक्यतो चांगल्याच वापरा.
चांगल्या ग्लासला स्क्रॅच लवकर पडत नाहीत. पावसात पाणी साचून राहत नाही. मोबाईल वा लॅपटॉप मधून बाहेर पडणाऱ्या अपायकारक प्रकाश डायरेक्ट डोळ्यांवर पोचत नाही अथवा कमी प्रमाणात येतात. मला जाणवलेले फायदे एवढेच आठवेल तसं लिहिणीच

तांत्रिक बाबीबद्दल तज्ज्ञ लोकाऔनी लिहिलेल़ बरं.
भिंगाचं वजन.
नुसता वाचायचा आहे म्हणून ठीक आहे.
लांबचा, सतत घालायचा चष्मा वापरून नाकावर खुणा पडतात. तिथे लाइटवेट लेन्सेस नी फरक पडतो.
शिवाय तुमच्या लुकमध्येही फरक पडतो.

चष्मा नुसता वाचायचा आहे. तेही फक्त अगदी बारिक असेल तरच लागतो. अन्यथा लॅपटॉप वापरतांन्ना बहुतांशी लागत नाही.
योग्य वस्तू असल्यास योग्य किंम्मत देइनही. फक्त चष्म्याचा काचा योग्य प्रकारे कुठे मिळतील माहिती मिळाल्यास उत्तम. 'फर्स्ट कॉपी' हा प्रकार कुठे मिळेल?
नानाकळा आप्ले उत्तर आवड्ले. धन्यवाद!

तर साधारण दीडशे रुपयाला जी ग्लास घेतली ती काच निकृष्ट दर्जाची असते त्याला पटकन क्रॅश पडतो ज्यामुळे डोळ्यांना त्रास होण्याची शक्यता आहे .
<<
हे स्टेटमेंट करण्यासाठी
काच.
तिचा दर्जा.
भिंगे.
डोळे.
डोळ्यांना होणारी इजा.
काचेला स्क्रॅच (यासाठी डायमंड वा क्वार्ट्झ क्रिस्टल लागतो) इ. पैकी बाबतींत आपल्या अभ्यास/अधिकाराबद्दल काही लिहिणार का?
माझ्या ज्ञानात भर पडेल.

रच्याकने. "क्रॅश" (Crash) नाही पडत, स्क्रॅच (Scratch) उर्फ चरा पडतो.

चष्म्याच्या किंमती (फ्रेम आणि काच), वेगवेगळे हा खरेच संशोधनाचा विषय आहे. दुकानागणिक किमतीत चढ उतार दिसून येतात. लाईट वेट काचा आणि फ्रेम असावी, पण त्यामुळे खिसाच इतका हलका होतो की आपण दुकानातून हवेतच बाहेर पडतो.

प्रोग्रेसिव्ह काचेच्या किंमती मध्ये एक नवीन iphone 6 येईल.

माझे आजोबा गेली कित्येक वर्ष काचेचा चष्मा वापरताहेत. अजुनपर्यंत कधीही त्यावर साधा ओरखडाही पडला नाही. Polycarbonate च्या लेन्स महागही पडतात व चरे पडण्याची भीतीही असते.

खास अभ्यासु लोकांसाठी --
एकदा दिडशे रुपयांची काच जमिनीवर फेका आणि एकदा १५००-१६०० ची काच नक्किच फरक कळेल Happy

काचेला स्क्रॅच (यासाठी डायमंड वा क्वार्ट्झ क्रिस्टल लागतो) >> आरारा, काचेला स्क्रॅच बोली भाषेत लिहिलं असावं. काचेच्यावर जे परावर्तन प्रतिबंधक कोटिंग असते ते चांगल्या प्रतीचे नसेल / चष्म्याची काळजी घेतली नाही तर त्याला वर्षभरात स्क्रॅच जातात.
नंबर जास्त असेल तर हाय इंडेक्स काचा बऱ्याच महाग असतात. (इथे कदाचित लागू नाही).
चष्मा हा माझा दागिना आहे, साधारण २ वर्षे टिकणाऱ्या आणि जागेपणी का_य_म लागणाऱ्या दागिन्यावर ऐपती प्रमाणे पैसे खर्च करायला मला आवडतात.

यक्ष चष्म्याच्या दुकानात मिळेल आता तुमच्या भागात कुठे आहे ते मला माहित नाही
आरारा मला जे माहितीय ते सांगितलं. ज्ञान वाटण्याचं काम गूगलने घेतलंय बघा सोयीनुसार शब्द वापरून काही भेटतंय का ?
आणखी एक आपल्या शब्दांच्या खजिन्यातले काही शब्द उदार द्या राव लय भारी वाटतं वाचायला. सुचतं जबरा हा तुम्हाला. तुमचे प्रतिसाद वाचून नेहमी वाटतं तुम्ही विरोधी पक्ष नेते असता तर सत्ताधारी पक्षाने तुम्हाला घाबरून कामं केली असती. अवंतराबद्दल क्षमस्व

साधा वाचनाचा चष्मा Happy
वाचनाच्या वेळीच चष्म्याचा जास्त आणि महत्वाचा वापर होतो. वाचताना डोळ्यांना जास्त ताण दिला जातो. त्यामुळे शेजारच्या गच्चीवरची कबूतरं बघायला हलक्या दर्जाचा चष्मा वापरला तरी चालेन, पण वाचायला चांगल्या दर्जाचाच वापरा Happy

असो,
मला चष्म्याची फार आवड आहे. पण दुर्दैवाने माझे डोले अंधारात रॉकेट चालवावे ईतके महान आहेत. त्यामुळे लहानपणीपासून माझे चष्मा घालून मिरवण्याचे स्वप्न हे स्वप्नच राहिले. आयुष्यात गॉगल कित्येक आले आणि गेले. पण चष्म्यातून जो एक डिसेंट लूक दिसतो, (आठवा बाजीगरचा शाहरूख खान) तो मात्र मी नेहमीच मिस करायचो. पण जॉबला लागलो आणि अचानक साक्षात्कार व्हावा तसा एक मार्ग सापडला. मी पीसीवर काम करताना डोळ्याला त्रास होतो सांगून अ‍ॅन्टीग्लेअर चष्मा विकत घेतला. दुसर्‍याच पगारात तब्बल साडेतीन हजारांचा चष्मा, डोळ्यांना शून्य नंबर असून. तोपर्यंत कधी एवढा किंमती गॉगलही घेतला नव्हता.

माझ्या मालकीची चष्म्याची

चष्मे विकणे हा माझा प्रायमरी धंदा नाही, पण, माझ्या मालकीची चष्म्याची दुकाने आहेत.
हो.
अनेकवचनी.

अँड आय सिम्प्ली लव्ह 'ऑफसाईट' एमेन्सी एम्प्लॉईज व्हू बाय १५० रुपीज स्टफ, @ १५ के. Lol कारण युक्नो, यूसला ते डॉलरमधे यापेक्षा जास्त महाग अस्तं, अन आय अ‍ॅम विअरिंग झाईस युक्नो.

यांना 'ब्रँडेड' म्हणून जे खपवले जाते, तेच देशी जनतेला दीडशे रुपयांत मिळते.

काँप्युटर व्हिजन सिंड्रोमचा इलाज "ए आर सी" कोटिंगची काच नव्हे तर २०-२०-२० आहे, हे फुकट सांगून माबोवरच्या "समाजा"ला समजेल यावरचा विश्वास, माझ्या पूर्वीच्या आयड्यांसोबत कधीच उडालाय.

ती सो कॉल्ड कोटिंग, हे तुमच्या काचेवरचे पॉलिमरचे हाफ लॅब्म्डा, उर्फ व्हिजिबल लाईटच्या अर्ध्या (अ‍ॅवरेज) वेव्हलेंग्थ थिकनेसचे कोटिंग असते. यामुळे "डिस्ट्रक्टिव्ह" इंटरफेरन्स पॅटर्न तयार होऊन "ग्लेअर" कमी होते.

याचा मुख्य उपयोग नाईट ड्रायव्हिंगसाठी असतो.

पण ट्रकवाले असल्या टेक्नॉलॉजीसाठी पैके मोजण्याची शक्यता नसल्याने, तुम्हा सर्व हुशार लोकांना कॉम्प्युटरसाठीचे अ‍ॅण्टीग्लेअर चश्मे खपवायची सिस्टिम जगभरात आहे. (Where you can control the bloody brightness and contrast of the monitor with a few simple buttons present on that screen. Yet, you are supposed to "need" A.nti R.eflective C.oating = ARC glasses)

या चष्म्याला चष्म्याच्या डबीत येतं ते "मायक्रोफायबर" क्लॉथ सोडून बनियनने पुसलं तर 'क्रॅशेस' पडणारच, हे नक्की.

असो.

फुकटात, (गूगल न वापरता, कष्टपूर्वक मिळवलेलं) इतकं ज्ञानदान पुरे.

Where you can control the bloody brightness and contrast of the monitor with a few simple buttons present on that screen. Yet, you are supposed to "need" A.nti R.eflective C.oating = ARC glasses)

>> हाय हाय.. हे तर मी बालवाडीत असल्यापासून करतोय. Happy गेली बारा वर्षे रोज सरासरी बारा तास वर्षाचे बाराही महिने स्क्रीनसमोर बसुन कधीही डोळ्यांना थकवा जाणवला नाही त्याचे गुपित ह्या लो-ब्राइटनेस-कॉन्ट्रास्टमध्ये आहे का? धम्माल!!

एंटी ग्लेअरने काही विशेष फरक पडत नाही हे मला आधीही माहीत होते आणि अनुभवावरून पक्के झाले. मी सुद्धा माझ्या पीसी आणि मोबाईलचा ब्राईटनेस आटोक्यात ठेवतो. माझी गर्लफ्रेंड त्यामुळे चिडते कारण गॅलरीतील फोटो कमी ब्राईटनेसमध्ये कमी चांगले दिसतात. पण नुसते फोटो बघायला ब्राईटनेस वाढवत डोळ्यांशी खेळ कोण करणार..

पण माझ्या अँटीग्लेअर चष्म्याचा सारा खर्चा फ्रेमवर आहे.. खतरा फ्रेम आहे त्याची. मी त्यात बाजीगरचा शाहरूख दिसावे ईतकीच माझी अपेक्षा होती, पण मी चक्क कहो ना प्यार है चा हृत्विक रोशन दिसू लागलो.
बरं वाटतं जेव्हा कॉम्प्युटरवर बसले असताना पोरी येता जाता मागना टपली मारून हाय हॅन्डसम बोलून पुढे जातात Happy

मॉरल ऑफ द स्टोरी - काचा कसल्याही घ्या, वाटल्यास नुसत्या खाचाच ठेवा. पण फ्रेम जबर्रदस्तच असली पाहिजे आणि तुमच्या चेहरेपट्टीला सूट झाली पाहिजे !

ऋणम्या,

अजून फुकट सल्ला देतो, चष्म्याच्या बाबतीत. अजून तुम्हाला अंधारात रॉकेट चालवायला दिसतंय ते ठीकेय, पण फ्रेम बाबतीत दोन तीन गोष्टी.

१. चेहरा उभा अन फ्रेम आडवी, चेहरागोल मग फ्रेम चौकोनी वगैरे बावळटपणा आहे. डोळा व व्हिज्युअल फिल्ड गोल आहे, फ्रेम गोल हवी.
२. दुनियेला माझं तोंड कसं दिसतंय यापेक्षा, मला दुनिया कशी दिसते ते जास्त महत्वाचे.

*व्हिज्युअल फिल्ड = नजरेचा आवाका. तुम्ही समोर बसून माझ्या तोंडाकडे पहाता, तेव्हा त्यासोबत वर-खाली, उजवी-डावीकडे जवळजवळ १८०-२०० अंशापर्यंतचा भाग तुम्हाला दिसत असतो. चष्मा फ्रेम लहान केली, की झापड लावलेल्या टांग्याच्या घोड्याप्रमाणे तुमच्या नजरेचा आवाका मर्यादित होतो.

३. फ्रेम सोन्याची घेतली, तरी वजनाला कमी ठेवा. उदा. सोन्याची अंडरपँट घालून २४ तास फिरता येणार नाही. जड होईल. कंटाळून काढून ठेवावी वाटेल Rofl

दुनियेला माझं तोंड कसं दिसतंय यापेक्षा, मला दुनिया कशी दिसते ते जास्त महत्वाचे>>> खरंय Happy पादत्राणांबाबत तर मी हे कसोशीने पाळतो. पण काही गोष्टी शायनिंग मारण्यापुरताच थोड्या वेळापुरत्या वापरायच्या गोष्टींना आपण अ‍ॅडजस्ट करतो ईतकेच.

बाकी फ्रेमचा आकाराउकाराबद्दल आपण जे म्हटले ते पटले.
डोळा व व्हिज्युअल फिल्ड गोल आहे, फ्रेम गोल हवी. >>>> सुदैवाने मला गोल फ्रेम शोभतात म्हणून वाचलो, माझे गॉगलही बरेच गोल आणि मोठालेच असतात. तरी ईतरांसाठी ही माहिती लक्षात ठेवेन.

उदा. सोन्याची अंडरपँट घालून २४ तास फिरता येणार नाही >>> सोन्याची अंडरपॅंट फक्त सुपरमॅनलाच शोभेल. कारण त्याची वर असते. नाहीतर देसी बॉय जॉन अब्राहमला शोभावी कारण त्याचे वर काही नसते. पण आपल्यासारख्यांनी वापरायचे काही कारणच नाही, उगाच सोन्याचा पिवळाधम्मक रंग बघून गैरसमज व्हायचे Happy

सोन्या,
तुझ्या सोन्याच्या कळसाचा पिवळाधम्मक रंग, अन तुझी सोन्याची झळाळी असलेली सोनेरी आकलनशक्ती यांची सांगड घालणं हे काम करावं अशी अजूनही माझी इच्छा होत नाहिये.
तेव्हा आता गाईगाइ कर. उशीर झालाय.

मला सोने शोभत नाही.
म्हणजे सोन्याचे कसलेच दागिने शोभत नाहीत. चांदीचेही नाहीत.
मला गॉगल शोभतो. हातातले घड्याळ शोभते. मोठाला पट्टा शोभतो. हे मी जास्तीचे पैसे खर्च करून वापरतो.
पण मला गळ्यातली चैन, हातातले कडे, ब्रेसलेट, अंगठी, पैंजण यापैकी काही शोभत नाही. त्यामुळे उगाचच सोने मिरवायला किंवा दुसरा घालतो म्हणून, किंवा फॆशन आली म्हणून उगाच मिरवायला आजवर काही घातले नाही, यावर कधी खर्चा केला नाही.
मूलभूत गरजा भागल्यानंतरचा अतिरीक्त पैसा आपण फार कष्टाने कमावतो. त्यामुळे तो त्याच गोष्टींवर वापरावा ज्यांचा आपल्याला खरेच शौक आहे. नुसते दिखाव्यासाठी काही करण्यात अर्थ नाही.

पोस्ट जनरल आहे, पण विषयाला धरूनच आहे. नुसते चष्म्याचा किंमतींची चर्चा करण्यत काय अर्थ आहे?

नुसते चष्म्याचा किंमतींची चर्चा करण्यत काय अर्थ आहे?

>> मग आता चष्म्याच्या धाग्यावर चष्मा सोडून कोणाकोणाच्या कशाकशाच्या किंमतींची चर्चा करण्याची इच्छा आहे? माझ्याकडे तुझ्यासाठी हेच किंमती विचारण्याबद्दल बरेच प्रश्न आहेत. पण मग अ‍ॅडमिन वेमा धावत येतील, अभद्र विषयांतर केल्याचा ठपका ठेवून मला उडवतीलही.... काय करायचं बोल...?

नानाकळा मूळ धागा चष्म्याच्या किंमतीचा नसून चष्मा आणि तत्सम वस्तू घेताना त्यांचा उपयोग, त्यांची आवड (शौक), लेटेस्ट फॅशन, आणि ती फॉलो करायचा अंगातील किडा... या सर्वांची सांगड घालत त्यावर किती पैसे खर्च करावेत असा बघा..

अरारा , चष्मे विकणे हा माझा प्रायमरी धंदा नाही, पण, माझ्या मालकीची चष्म्याची दुकाने आहेत >> हा प्रतिसाद आवडला !! धन्यवाद माहिती करता.

मी इथे बरेचदा चष्मे उगीच महाग किंमतीला कसे विकतात ते पाहिलेले आहे. आपले देशातले चष्मेवालेच चांगले.

आणि मग मी तो कसा बघावा हे तुम्ही कोण सांगणार?
>>>
नानाकळा, तात्विकद्रुष्ट्या धागा माझा असता तरी तो तुम्ही कसा बघावा हा सर्वतोपरी तुमचाच हक्क आहे Happy
शेवटी जो तो आपल्या चष्म्यातूनच जग बघतो Happy

मी इथे बरेचदा चष्मे उगीच महाग किंमतीला कसे विकतात ते पाहिलेले आहे.
>>
चष्मा इन्शुरन्समध्ये कवर केला असेल की लोकं वाट्टेल त्या किमतीला घेतात आणि विकणारे पण विकतात.

फ्रान्समध्ये एका छोट्या गावात काही दिसव राहिलो होतो कामानिमित्त. गावात उंची रेस्तराँ तुडुंब, जे अपेक्षित होते. आणि दुसरा पोप्युलर धंदा चष्म्याच्या दुकानाचा. हापिसात पन जो तो अरमानी, रेबॅन, yves laurent वगैरे एकदम भारीभारी फ्रेम घालून. मग एकाला विचारले बाबा काय भानगड आहे ही. तो म्हणाला वर्षाला काहितरी १०००/१५०० युरोपर्यंतचा चष्मा स्टेट इन्शुरन्समध्ये कवर्ड आहे. त्यामुळे प्रत्येक जण महाग चष्माफ्रेम वापरतो. परत त्यात १२००चे बिल करायचे, १००/१५० तो दुकानदार तुम्हाला सरकवतो वगैरे प्रकार मजबूत.

किंमतीबद्दल सांगत नाही पण काचेत फरक नक्की असतो.
तुमचा रिडिंगचा दोन्ही डोळ्यांचा नंबर समान असेल तर रेडिमेड चष्मे घेता येतात. कंम्प्युटरने 1.36, 1.41 असे नंबर दिले तरी 1.25 किंवा 1.5 नंबरचेच वापरावे लागतात. कुणाचा 1.29,1.31 असला तर त्याला 1.25 फारच छान वाटतो. खूप फरक असला की चष्मा बनवूनच घ्यावा लागतो.
परदेशी चानेलवरचे कार्यक्रमांत चष्म्यावाल्या माणासांच्या काचा चमकत नाहीत, थेट डोळेच दिसतात तसे इकडे होत नाही. काचा चमकतात.शिवाय तिकडे क्म्प्युटरने दिलेल्याच अचूक आकड्यांइतके नंबरचे भिंग बनवत असतील तर महागच पडेल.

या संदर्भातच, पण सनग्लासेस (त्या चष्म्यांना व गॉगल्सला मराठीत काय म्हणतात?) बद्दल मला हेच प्रश्न पडले होते.
अशा चित्रविचित्र नावच्या कंपन्या त्या त्या देशात खरच अस्तित्वात असतात का?
त्यांचे सनग्लासेस खरेच एवढ्या महाग किमतीला विकण्याजोग्या योग्यतेचे असतात का? ते मोजण्याचे प्रमाण काय असते?
त्यावर कोणी अधिकारी माणुस लेख लिहिल का?
या फॅशन सनग्लासेस मधील यु.वी प्रोटेक्शनमुळे खरेच डोळ्यांना सुरक्षा मिळते का? ते न घालता वावरण्याचा तुलनेत कितपत?
पोलराइझ्ड म्हणुन मार्केट केलेले सनग्लासेस सामान्य माणसाला रोजच्या आयुष्यात खरेच उपयोगी असतात का? कितपत?

एकदा सनग्लासेस घेताना, हा चष्मा यु.वी प्रोटेक्टेड आहे असे सेल्समनने सांगीतल्यावर हे पडताळुन कसे बघायचे असे विचारले असता, असे पडताळुन बघता येत नाही, अशी कुठलीही मशीनच नसते असे मला सांगीतले.
ती मशीन दिसणार नाही, अशापद्धतीने तिचासमोर उभे राहुन हे सांगीतले. अशी काही मशीन नसते हे धडधडीत खोटे बोलले. तेव्हा मग वरिष्ठ अधिकारी आला व त्याने त्याला बाजुला व्हायला सांगुन, त्य्या मशीन मधे तो चष्मा ठेवुन व एकदा न ठेवता यु.वी प्रोटेक्शन पडताळुन दाखवले.
तर ही अशी मशीन खरेच यु.वी. रेज बनवते का - टेस्टींगसाठी? असे मशीन मधे यु.वी रेज बनवने व ते अशा पद्धतीच्या दुकानात सामान्या माणसाच्या अवाक्यात ठेवणे धोकादायक नाही का? की ती मशीन पण बनावट असते?

आ.रा.रा. जी आपण उपयुक्त माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद!
आपले "Where you can control the bloody brightness and contrast of the monitor with a few simple buttons present on that screen".. हे वाक्य अत्यंत महत्त्वाचे वाटले. मी ती आवर्जून घेण्याचा प्रयत्न करतो. T.V. , laptop ह्याचा brightness माझ्या घरी करतोच (वापरही आवश्यक तेवढा करतो आणी LED असल्याने तेही बरे पडते) पण इतर ठिकाणीही (वस्तुंच्या मालकांच्या परवानगीने) brightness अँडजस्ट करून देतो. साधा हिशोब लावतो...बरोबर का चूक नेमके महित नाही...पण आजुबाजूला पाहून एकदम screen कडे पाहिल्यास डोळे जर एकदम विस्फारत असतील तर त्या screen चा brightness डोळ्यांन्ना सहज वाटावा ह्या पातळीवर आणण्याचा प्रयत्न करतो (Kindle सारखे). रात्रीचे Long Drive असेल तेंव्हा ट्रक, मोठ्या गाड्या ह्या त्यांच्या 'प्रखर' प्रकाशासठी कुप्रसिद्ध आहेतच तर आपणच शहाणपणा करून आपली गाडी मगचा पुढचा अंदाज घेउन बर्‍यापैकी control मध्ये घेउन त्यांचा लाइट शक्य तेवढा टाळतो. घरी LED चे lights वापरून indirect lighting ची व्यवस्था करवून घेतली. आपणच आपल्या डोळ्यांन्ना जेवढा शक्य तेवढा कमी त्रास देणे केंव्हाही चांगले, आपल्याच 'long-term' उपयोगात येतील हा उद्देश!

मागच्याच आठवड्यात मला रांजणवाडी आली होती कारण रानात उसतोड चालू असताना बराच धुरळा खाल्ला होता डोळ्यांनी.बाहेर जाताना दिवसा गॉगल वापरणे गरजेचे आहे.अल्ट्राव्हॉयलेट लै ड्यांजर.
चष्मा घेताना थोडे पैसे मोजावेत ,चांगले मिळते व खराब होत नाहीत.(स्वानुभव)
आमच्या घराजवळ नाला आहे ,तो तुंबल्यावर त्यातून बरेचsewer gas फसफसत बाहेर पडतात व आमच्या घरात येतात.दारं बंद ठेवली तरी.यात अमोनिया लै बेकार करोझीव्ह गॅस आहे डोळ्यांसाठी ,रेटीनापासून ते ऑप्टीक नर्व्हपर्यंत काहीही बाद होऊ शकते.(पोल्ट्रीमध्ये कोंबड्यांची विष्ठा सडून अमोनिया बाहेर पडतो व त्यांचे डोळे खातो.एरेशन नसेल तर बरेच पक्षी पार्शल वा पुर्ण आंधळे होतात.)
तक्रारी करुन भिकार%& लोकांनी काहीच केले नाही.त्यामुळे रिलोकेट करायचा प्रयत्न चालू आहे.आपल्याजवळ असे काही होत असेल तर डोळ्यांवर बेतू शकते.नाला,डंपिंग ग्रांऊंड्स पासून लांबच घर घ्यावे हा फुकट सल्ला.

मागच्याच आठवड्यात मला रांजणवाडी आली होती कारण रानात उसतोड चालू असताना बराच धुरळा खाल्ला होता डोळ्यांनी.बाहेर जाताना दिवसा गॉगल वापरणे गरजेचे आहे.अल्ट्राव्हॉयलेट लै ड्यांजर.
चष्मा घेताना थोडे पैसे मोजावेत ,चांगले मिळते व खराब होत नाहीत.(स्वानुभव)
आमच्या घराजवळ नाला आहे ,तो तुंबल्यावर त्यातून बरेचsewer gas फसफसत बाहेर पडतात व आमच्या घरात येतात.दारं बंद ठेवली तरी.यात अमोनिया लै बेकार करोझीव्ह गॅस आहे डोळ्यांसाठी ,रेटीनापासून ते ऑप्टीक नर्व्हपर्यंत काहीही बाद होऊ शकते.(पोल्ट्रीमध्ये कोंबड्यांची विष्ठा सडून अमोनिया बाहेर पडतो व त्यांचे डोळे खातो.एरेशन नसेल तर बरेच पक्षी पार्शल वा पुर्ण आंधळे होतात.)
तक्रारी करुन भिकार%& लोकांनी काहीच केले नाही.त्यामुळे रिलोकेट करायचा प्रयत्न चालू आहे.आपल्याजवळ असे काही होत असेल तर डोळ्यांवर बेतू शकते.नाला,डंपिंग ग्रांऊंड्स पासून लांबच घर घ्यावे हा फुकट सल्ला.

चशमा ही माझ्या आयुष्यातली भळभळती जखम आहे.
मला ०.७५ दोन्ही डोळ्याला आणि एका ला अक्सीस आहे.
चित्रांगदा ची जाहिरात पाहून महाग दुकानातून ५००० चा चशमा(११५० टाटा डिस्काउंट मिळवून) आणला.काही दिवसांनी चष्मा लावल्यावर डोळ्याला जास्त त्रास होतोय असं वाटायला लागलं.(बनियान ने पुसला नाही तरी) स्क्रॅच पडले.
मध्ये हापिसात गांगल चे फ्री चेक होते त्यांनी चशमा आणि अक्सीस नाही सांगितले.मध्ये लेन्सकार्ट ला कॉन्टॅक्ट लेन्स घेतल्या.चष्म्यापेक्षा जास्त चांगला डोळा लाईक एक्सपिरियन्स येईल म्हणून.टी लेन्सेस रोज १५ मिनिट घालून लावता येईनात.फोल्ड व्हायला लागली.फोल्ड न होता डोळ्यापर्यंत आली तर डोळा घाबरून मिटायला लागला.इथे विचारलं तर इब्लिस रावांनी (ते माझ्यासाठी मायबोलीवरचे हाऊस एम डी आहेत) ०.७५ डायॉप्टर ला लेन्स म्हणून येड्यात काढले.परत चशमा काढला तर त्याने पायर्या चुकू लागल्या(आय नो हे वाचायला अत्यंत नाईव्ह वाटतेय ☺️☺️☺️)
आता औंध ला दिव्या आय क्लिनिक ला परत नंबर काढला.पेरिफेरल व्हिजन ची टेस्ट स्वतः मागून(डॉ ने कंव्हीन्स न करता) करून घेतली.बाबांना ५५ पासून ग्लॅकोमा असल्याने माझी पेरिफेरल व्हिजन सध्या डायबिटीस नसला तरी लवकर रामराम करेल असं वाटतं.तर या टेस्ट नॉर्मल आल्या.तुमचा महाग चशमा दाखवा फक्त भिंग बदलू असं ते म्हणालेत.त्याला अजून मुहूर्त नाही.
डोळ्याला दिसते.मीटिंग रुम मध्ये १० फुटावरची एक्सेल वाचता येत नाही.कोणी अगदी डोळ्यासमोर काही नाचवले तर डोके दुखते आणि ब्लर दिसते.
लवकर चशमा चालू करायचाय परत.
लेन्सेस लावण्या इतका पेशन्स या जन्मी असेल असं वाटत नाही.

पेरीफेरल व्हीजन तपासायच्या टेस्टचा खर्च किती आहे,नाव काय आहे त्या टेस्टचे.
अनु,तुम्हाला लेसर ट्रीटमेंट चा ऑप्शन आहे का?

अवांतर पोस्ट आहे

मला (अजून तरी ) चष्मा नाहीये ,पण पीसीवर काम करत असल्याने कधीना कधी लागेल हे नक्की .

चष्माच्या पण स्टाईल्स असतात आणि योग्य त्या स्टाईलचा चष्मा वापरला तर व्यक्तिमत्व खुलून येते हे नक्की .

कल हो ना हो मध्ये प्रीती झिंटा ने जो फ्रेम चा चष्मा वापरला होता तो मला आवडला होता. मध्यंतरी रिमलेस चष्माची फॅशन होती . ते चष्मे मस्त दिसतात . त्यानंतर गांधीजी जसा चष्मा वापरायचे तशी फॅशन होती . नंतर अरुणा इराणी टाईप चष्म्याची .वेगवेगळ्या फॅशनचे चष्मे बघायला मजा येते

mi_anu ,
ब्लर दिसते.>>>>>> डोळ्यांचे प्रेशर चेक करून घ्या.ऑप्थॅल्मॉलॉजिस्टकडून.
माझ्या आईला ग्लुकोमा आहे.ती नेहमी माझ्यापाठी आयप्रेशर चेक करून घेण्यासाठी तगादा लावते.यावेळी तपासून घेतले तर बॉर्डरलाईनला आहे.१९-२०
ड्रॉप्स टाकतेय.

लेसर डॉ लोक्स नको म्हणतात कमी नंबराचा चशमा असल्याने
लहान नंबर ला ऑपरेशन रिस्क पेक्षा चशमा जास्त सेफ असेल
पेरिफेरल व्हिजन टेस्ट ला व्हिज्युअल फिल्ड टेस्ट म्हणतात
खर्च आठवत नाही पण 1200 च्या आसपास होता
करायची गरज अजिबात नसते.डायबिटीस, ग्लाकोमा वगैरे लक्षण असलेल्या पेशंट ना फक्त सांगतात.मी हौसेने स्वतः मागून करून घेतली होती.

लेसर डॉ लोक्स नको म्हणतात कमी नंबराचा चशमा असल्याने>>>>> माझा सिलेंड्रिकल नं आणि २ डोळ्यांच्या नंबरातील फरकामुळे मीही लेसर करून घेणार होते.जवळजवळ ठरलेही होते,पण माझ्या काही वैयक्तिक अडचणी आणि डॉ.इब्लीस यांच्या पोस्टमुळे ती शस्त्रक्रिया करणे रद्द केले.
मायबोलीवरच तो धागा आहे.
थोडक्यात काय तर ही एक शस्त्रक्रिया आहे.९९% शस्त्रक्रिया यशस्वी होतात,पण उरलेल्या १% मधे जर आपण असू तर?अशा प्रकारची ती प्रतिक्रिया होती.

आ.रा.रा , प्रतिसाद आवडले.

चष्मा हा टॉपिक सध्या नसला तरी भविष्यात कधी उतारवयात चाळिशीनन्तर लागू शकतोच. भारतात एक दीर डोळ्यांचा डॉक्टर आहे त्यामुळे तपासणी तोच करणार. तो म्हणेल तिथून आम्ही चष्मे घेणार.
एकूणच कोणीतरी भरवशाचा डॉक्टर असलेला उत्तम. हल्ली ते वासन वगैरे फाईव्ह स्टार आय क्लीनिक निघाले आहेत त्याबद्दल खूप वाईट ऐकलं आहे.

डोळ्यांचे प्रेशर चेक करून घ्या. >>> देवकी ताई नक्की काय असते हे.

हल्ली मला ही फक्त रात्रीचे डोळ्यांना त्रास होतो, ब्लर दिसते म्हणजे फक्त लहान अक्षरे, पुस्तक किंवा मोबाईल , पीसी वर.

इतर कसलाच त्रास नाही, मला रात्री उशिरा पर्यंत मोबाईल वापरायची सवय लागलीये अन दिवसभर सुद्धा pc न मोबाईल असतोच.

चांगल्या डोळ्यांच्या डॉक्टर कडे तपासले डोळे तर त्यांनी मायनर नंबर सांगून चष्मा दिला अन डोळे ड्राय झालेत बोलले त्यासाठी ड्रॉप्स पण दिलेत,

2 महिने होत आले तरी काही फरक नाही.

Pages