आधुनिक व्यथा

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

ती कवा भाईर जात्ये
अन कवा घर्‍हात येत्ये
तिचा काई ठावठिकाना न्हाय
आयटीत नोकरी धरल्यापासून
घर्‍हात तिचे पाय न्हाय.

सट्व्या काम्पुटरच्या माग्ये
ती हात धुवून लागली हाय
नवरा गेला खडड्यात अन
लेकरा-बाळाकढंही लक्ष न्हाय.

आजपासनं म्या पन
तिचा नवरा न्हाय अन
ती पन माजी बायकू न्हाय
दारूच्या नादात म्या आता
समदं जिन बहालं केलं हाय!

- बी

विषय: 

बी काय हे दारूच्या फार आहारी गेलायस हं हल्ल्ली! सोड बघू Happy

ही ही ... नाही गं मैत्रेयी.. मी नाही पितं. गमतीने लिहिली कविता.. Happy
बी

एका दारुड्यानं आयटीमधल्या मुलीशी लग्न केल्यामुळे तो नवरा कसा उध्वस्त झाला. त्याचं सगळं आयुष्य बरबाद झालं. अरेरे अरेरे अरेरे. Proud heart पिळवटून टाकणारी दुख:द कविता. दिवे घे रे.