उंचावरून...

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

सुदैवाने ह्या आकाशाइतकं नाही
पण, 'पुढे काय? पुढे काय?'
असं सारखं म्हणता म्हणता
उंचावर आल्यासारखं वाटतं
परत खाली उतरायच्या पायर्‍या
त्या तर कुठेच दिसत नाही
जो तो दिसतो आहे फक्त
आणखी वरची पायरी रचताना

खाली हरवले आहेत की
खूप मागे राहिले आहेत,
जे मला दिसत आहेत
ते माझे आपले 'प्रियजन'?

आता त्यांना माझी हाक
देखील ऐकू येत नाही,
हवेतच ती विरून जाते
इतक्या उंचावरून..

- बी

विषय: 
प्रकार: 

बी अतिशय सुरेख आहे कविता.