धो धो पाऊस

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

दुधाळ काचेच्या तावदानातून
रप रप कोसळणार्‍या पावसाकडे
टक लावून पाहत असताना
मलाही माझ्या डोळयातलं आभाळ
रिकामं करून टाकावसं वाटतं..

पण ह्या आभाळासारखा
ढगांचा गडगडाट नको आहे,
विजांचा कडकडाट नको आहे,
पुर-वादळ-वार्‍याचं थैमान नको आहे...

भिती वाटते... भिती वाटते...
आपलं आभाळं कोसळताना
कुणालातरी ऐकू जाण्याची,
लख्ख उजेडात कुणीतरी
आपला चेहरा वाचण्याची,
कुणाचातरी आनंद त्यात
पुर्णपणे बुडून जाण्याची..

- बी

विषय: 
प्रकार: 

बी छान आहे रे कविता. डोळ्यासमोरच आली अगदी.
जमलं तर थोडं शुद्धलेखन बघ ना.

मनापासुन आवडली ही कविता. त्यातही २रं ३रं कडव जास्त आवडलं.

आहे. दुसर्या कडव्यात दोन्ही ठिकानी ट हव त नाही.

सर्वांचे धन्यवाद.

संघामित्रा, एक विनंती. जमत असेल तर पुढल्या वेळी मला लिखानातील चुका लक्षात आणून दे. मी जमेल तेवढे शुद्ध लिहिण्याचा नेहमी प्रयास करतो. तरी काही चुका टायपोपायी होतात तर काही चुका अज्ञानापायी होतात. पुढल्या वेळी तुझी आणि इतरांची मद्त मिळेल अशी अपेक्षा.

केदार धन्यवाद.

-बी

जमलं की रे!
थोडं शुद्धलेखनाकडे लक्ष दे की जमलंच.
छान!

बी, चांगले लिहिलेस. शेवटचे कडवे विशेष आवडले.

आवडली कविता.. छान फ्लो आहे कवितेला..

कविता आवडली बी!

>>भिती वाटते...
आपलं आभाळं कोसळताना
कुणालातरी एकू जाण्याची,
लख्ख उजेडात कुणीतरी
आपला चेहरा वाचण्याची,
कुणाचातरी आनंद त्यात
बुडून जाण्याची..

खूप आतलं..

बी, कविता मस्त जमलीय... Happy

कवी बी, ऐकदम छान कविता, पहिल्या दोन कडव्यानंतरची भिती खरचं खुप समर्पक वाटते.

छाण रे बी! आता कसं शहाण्यासारखं लिहिलंस.. Happy

बी आवडली कविता. छान आहे.

कविता आवडली बी. छान लिहीली आहेस.

बी, कविता आवडली!
एकच सुचवावसं वाटतंय. 'रिकामं करून टाकावसं वाटतं' ह्या आधीच्या ओळीतला 'डोळ्यातील' आणि नंतर 'वार्‍यांचे' थैमान हे दोन पुस्तकी शब्द बोली भाषेत झाले तर वाचताना जास्त छान वाटेल.
-मृण्मयी

इतके सर्व अभिप्राय वाचून मन आनंदून गेल आहे. परत एकदा कवितेच्या नादी लागावसं वाटतं आहे...

मित्रान्नो तुम्हा सर्वांचे आभार मानावे तेवढे थोडेच वाटतात! धन्यवाद!!!!!!

आपला चेहरा वाचण्याची,
कुणाचातरी आनंद त्यात
पुर्णपणे बुडून जाण्याची..>>>ह्म्म गुड..

स्नेहीमित्रहो, तुम्हा सर्वांचे आभार.