मुलासाठी नाव

Submitted by रचना. on 26 July, 2009 - 01:15

नमस्कार मायबोलीकर,
मला माझ्या मुलासाठी नाव हवं आहे. त्याचे राशी अक्षर "ह" आहे. आणि जन्म रामनवमीचा, ३ एप्रिल २००९. (काही कारणाने बारश्याला उशीर होतो आहे.) पण आता १६ ऑगस्ट तारिख पक्की झाली आहे. नाव "ह" वरून किंवा रामाचे किंवा दुसरेही अर्थपूर्ण आणि त्याला शोभेसे हवे. आम्ही "हर्षित" ठरवतो आहे. पण मला ते पंजाबी वाटते. नवर्‍याला "हर्षवर्धन" हवे आहे. पण मला ते जास्तच लांब आणि common वाटते. कृपया मदत करा.
मायबोलीवर नविन असल्याने काही चूक झाल्यास सांभाळून घ्या.

- रचनाशिल्प

Group content visibility: 
Public - accessible to all site users

रामाचं "रामू" झालं नाही म्हणजे मिळवलं........:)>>
नाही होत. माझ्या मुलाचे नाव राम आहे. त्याचा एकही अपभ्रन्श झालेला नाही.
उलट हे नाव ऐकायला अतीव गोड वाटते . शिवाय कुठच्याही वयाला शोभते.
हाक मारणार्याला पुण्य लागते ( ही गम्मत)

??????

कृपया मुलासाठी सोपे सुटसुटीत चांगला अर्थ असणारे नवीन नांव सुचवा. गणपतीचे असल्यास उत्तम. शक्यतो २अक्षरी (आडनाव लांबलचक असल्याकारणाने)

धन्यवाद

शम्भव (Shambhav) नांवाचा अर्थ काय आहे?
उच्चार शम्भव की शांभव? ज्याने सुचवले त्याने गणपतीचे नाव असे सांगितले पण मला शंकराचे वाटले.
मायबोली वरील जाणकार मदत करू शकतील का?

शंभूपासून झालेला तो शाम्भव. गणपती हा पार्वतीच्या अंगाच्या मळापासून झालेला असला तरी शंभूचा पुत्र म्हणतात त्याला. त्या अर्थाने शाम्भव म्हणजे गणपती.

ओम

Pages