मुलासाठी नाव

Submitted by रचना. on 26 July, 2009 - 01:15

नमस्कार मायबोलीकर,
मला माझ्या मुलासाठी नाव हवं आहे. त्याचे राशी अक्षर "ह" आहे. आणि जन्म रामनवमीचा, ३ एप्रिल २००९. (काही कारणाने बारश्याला उशीर होतो आहे.) पण आता १६ ऑगस्ट तारिख पक्की झाली आहे. नाव "ह" वरून किंवा रामाचे किंवा दुसरेही अर्थपूर्ण आणि त्याला शोभेसे हवे. आम्ही "हर्षित" ठरवतो आहे. पण मला ते पंजाबी वाटते. नवर्‍याला "हर्षवर्धन" हवे आहे. पण मला ते जास्तच लांब आणि common वाटते. कृपया मदत करा.
मायबोलीवर नविन असल्याने काही चूक झाल्यास सांभाळून घ्या.

- रचनाशिल्प

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कोणी छ ने सुरू होणारे मुलाचे नाव सुचवू शकेल का? >> त्या ऐवजी कुठल्याही अक्षरावरून सुरू होणारे एखादे अर्थपूर्ण, उच्चारण्यास सोपे व त्यातल्या त्यात नवीन वाटणारे नाव ठेवा.

छकुली (हे लाडाने नाही तर नाव म्हणून ठेवलेले मी पाह्यलेय. तिने नक्की १८ पूर्ण झाल्या झाल्या नाव बदलून घेतले असणार.)

एका बंगाली मुलाचं "छांदिक" असं नाव ऐकलं होतं. त्याचा अर्थ Rhythmical, Metrical असा होतो. छंदोबद्ध कवितांना हिंदीत छांदिक रचना म्हणतात.
नुसतं छंद पण छान वाटेल.

@dreamgirl

कोणी छ ने सुरू होणारे मुलाचे नाव सुचवू शकेल का? >> त्या ऐवजी कुठल्याही अक्षरावरून सुरू होणारे एखादे अर्थपूर्ण, उच्चारण्यास सोपे व त्यातल्या त्यात नवीन वाटणारे नाव ठेवा.
>>
असेही दुसरे नाव ठेवायचे आहे पण जन्मनाव सुद्धा चांगले मिळावे एवढीच माफक अपेक्षा आहे......

@मृनिश
>> छगन भुजबळ आठवले...

@चिन्नु, @सुरेख१, @प्राची , @नीधप, @उद्देश, @मधुकर विनायक देशमुख, @_प्राची_
धन्यवाद

*

असेही दुसरे नाव ठेवायचे आहे पण जन्मनाव सुद्धा चांगले मिळावे एवढीच माफक अपेक्षा आहे......>> ओळखीच्या भटजींनी सांगितलेलं पाळण्यातलं एक व व्यवहारातलं एक अशी दोन नावे ठेवण्यापेक्षा एकच नाव ठेवा. (ते नावरासवरून असेल तर अधिक श्रेयस्कर! नाहीतर मग सरळ आवडलेलं कुठलंही ठेवावं)
तरी त्यातल्या त्यात छ वरून छंद हे एकच नाव बरं वाटलं. अधिक हवी असल्यास : http://www.onlymyhealth.com/baby-names-in-hindi/baby-names-starting-with...

भटजी बदलून बघा , नवीन अक्षर मिळेल.
किंवा या भटजींना थोडे पैसे द्या आणि अधिक "अभ्यास" करायला सांगा , नवीन चांगले अक्षर मिळेल

जन्मवेळ किती accurate होती ? तुम्ही calibrated घड्याळ वापरले का? ते आण्विक वेळे नुसार सेट केले होते ?

avaneesh

धन्यवाद मंडळी. सहस्त्रनामांमध्ये थोडीफार मिळालीत ठेवण्याजोगी. फार नाहीयेत.

हणमंतराव, बळवंतराव ,यशवंतराव ,विक्रमसिंह अशी दणदणीत नाहे का ठेवत नाहीत लोक्स? ::फिदी: ::दिवा:

बादवे, बंगाली नावे खूपच मृदु , काव्यमय असतात ती खरे तर मुलाना शोभतच नाहीत . आता बघा मूल म्हातारे झाल्यावर त्याला का सौमित्र आजोबा म्हनायचे का ,की सौम्यदीप आजोबा? Happy

या उलट यू पी बिहार , पंजाबमध्ये कशी दण्दणीत नावे असतात. रुद्रपताप सिंग ,हेमवतीनंदन, विश्वेश्वरप्रसाद, कल्याणेश्वरप्रसाद वगैरे. आमच्या बरोबर एक सरदारजी होते त्यांचे नाव रिपुदमनसिंह धिल्लॉन ! आम्ही त्यांच्या शोर्ट्फॉर्म ''रिपु '' एवढाच म्हणजे नेमके त्याच्या अर्थाच्या उलट (=शत्रू , रिपुदमनसिंह = शत्रुचे पारिपत्य करणारा वीर !)करीत असू ..

बादवे. भारतीय संघात एके काळी रुद्रप्रताप् सिंह नावाचा गोलंदाज होता त्याची देह यष्टी एकदम चिलटासारखी होती....

चांगले दणदणीत नाव ठेवा बुवा.... ::फिदी:

अयान नावचा अर्थ काय?
गीफ्ट ओफ गॉड असा अर्थ दिल्य पण मूळ उर्दु आहे काही ठिकणी हिन्दुं मूळ आहे असही दिलय.
अर्थ छान वाटतोय पण नेम्का मूळ सन्गेल का कुणी

मुलासाठी नाव सुचवा
मुळाक्षरे म या अक्षरावरून आपली मदत हवी आहे

धन्यवाद

धानी,
ते अयन असावे.त्याचा अर्थ The pathway to the Sun (गुगलवरून) .ज्योतिष का पंचांगात हा शब्द ऐकला/वाचला आहे.

Pushpa,
मंदार ,मानस,,महेश.

मानव नका ठेऊ हो!

तो बघा मानव.
तू मानव आहेस का?
मला आज मानव भेटला.
मी मानव आहे.

कशी वाटतात वरील वाक्ये? Uhoh

बाकी सगळी छान नावं सुचवली आहेत.

Pages