मुलासाठी नाव

Submitted by रचना. on 26 July, 2009 - 01:15

नमस्कार मायबोलीकर,
मला माझ्या मुलासाठी नाव हवं आहे. त्याचे राशी अक्षर "ह" आहे. आणि जन्म रामनवमीचा, ३ एप्रिल २००९. (काही कारणाने बारश्याला उशीर होतो आहे.) पण आता १६ ऑगस्ट तारिख पक्की झाली आहे. नाव "ह" वरून किंवा रामाचे किंवा दुसरेही अर्थपूर्ण आणि त्याला शोभेसे हवे. आम्ही "हर्षित" ठरवतो आहे. पण मला ते पंजाबी वाटते. नवर्‍याला "हर्षवर्धन" हवे आहे. पण मला ते जास्तच लांब आणि common वाटते. कृपया मदत करा.
मायबोलीवर नविन असल्याने काही चूक झाल्यास सांभाळून घ्या.

- रचनाशिल्प

Group content visibility: 
Public - accessible to all site users

रामाचं "रामू" झालं नाही म्हणजे मिळवलं........:)>>
नाही होत. माझ्या मुलाचे नाव राम आहे. त्याचा एकही अपभ्रन्श झालेला नाही.
उलट हे नाव ऐकायला अतीव गोड वाटते . शिवाय कुठच्याही वयाला शोभते.
हाक मारणार्याला पुण्य लागते ( ही गम्मत)

??????

कृपया मुलासाठी सोपे सुटसुटीत चांगला अर्थ असणारे नवीन नांव सुचवा. गणपतीचे असल्यास उत्तम. शक्यतो २अक्षरी (आडनाव लांबलचक असल्याकारणाने)

धन्यवाद

शम्भव (Shambhav) नांवाचा अर्थ काय आहे?
उच्चार शम्भव की शांभव? ज्याने सुचवले त्याने गणपतीचे नाव असे सांगितले पण मला शंकराचे वाटले.
मायबोली वरील जाणकार मदत करू शकतील का?

शंभूपासून झालेला तो शाम्भव. गणपती हा पार्वतीच्या अंगाच्या मळापासून झालेला असला तरी शंभूचा पुत्र म्हणतात त्याला. त्या अर्थाने शाम्भव म्हणजे गणपती.

ओम

माझ्या भाच्यासाठी कर्क रास (ड, ह) अक्षरावरून सुरू होणारे दोन किंवा तीन अक्षरी नाव सुचवाल का
काही नावे
हृतिष
हृदय
हर्षित
हितांशू
हृदित्या
यातील आणि अजून काही नावे असल्यास कृपया सुचवणे

हर्षद . . हिट नाव आहे...

बादवे... आजकाल आई वडील स्वतः नाव फायनल करतात... आत्या मामा मावशी मामी वगैरेंनी एनर्जी वाया घालवू नये...

हर्ष
हर्षल
हृषी Hrushi उच्चार याचा ऋषी असाच होतो. एका मैत्रिणीच्या मुलाचं आहे.
हृत्विक
हेम, हेमल ही नावंही ऐकली आहेत.
हेरंब, हे जुनं असलं तरी अजूनही ठेवतात काही जण.
हरिष, हरी थोडी जुनी आहेत पण ह वरून आहेत.

ड वरून मुलांची आठवत नाहीयेत.

हृषिक म्हणजे इंद्रिय हे माहितीचे, त्यांचा स्वामी हृषिकेश. नुसतं हृषी ह्या शब्दाचा अर्थ काय? शिवाय ऋत्विक/ज म्हणजे अध्वर्यू किंवा पुरोहित. हृत्विक म्हणजे काय?

धन्यवाद अन्जु ताई, हपा,chirps

आजकाल आई वडील स्वतः नाव फायनल करतात... आत्या मामा मावशी मामी वगैरेंनी एनर्जी वाया घालवू नये.>>नाही,त्यानीच तसे सांगितले आहे की तू शोधून दे,जे ठेवशील ते चालेल.

ह वरून हंबीर, हमीर, हेम, हिरण्य, होता, हेतु, हसित, हंस, ह्रीमान, ह्रीमत, हलायुध, हलधर, हिम, हिमसेक, हेमन, हासन(पुष्पहासन, कमलहासन).

हिंडोल म्हणजे झोपाळा किंवा झूला. हिंडोल रागाची स्वरावर्तने झोपाळ्यावर बसून मागेपुढे झुलावे तशी असतात. पण हा वीरश्री युक्त राग आहे. रुद्रवीणेसारख्या वाद्यात हा अधिक खुलतो.

Pages