मुलासाठी नाव

Submitted by रचना. on 26 July, 2009 - 01:15

नमस्कार मायबोलीकर,
मला माझ्या मुलासाठी नाव हवं आहे. त्याचे राशी अक्षर "ह" आहे. आणि जन्म रामनवमीचा, ३ एप्रिल २००९. (काही कारणाने बारश्याला उशीर होतो आहे.) पण आता १६ ऑगस्ट तारिख पक्की झाली आहे. नाव "ह" वरून किंवा रामाचे किंवा दुसरेही अर्थपूर्ण आणि त्याला शोभेसे हवे. आम्ही "हर्षित" ठरवतो आहे. पण मला ते पंजाबी वाटते. नवर्‍याला "हर्षवर्धन" हवे आहे. पण मला ते जास्तच लांब आणि common वाटते. कृपया मदत करा.
मायबोलीवर नविन असल्याने काही चूक झाल्यास सांभाळून घ्या.

- रचनाशिल्प

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हितांशु, हेमांग, हिरक, हर्वेश, हार्दिक, हितेन
हरदेव,हरेन-शंकर
हलधर-बलराम
हरीश, हरींन्द्र- विष्णू
हेम-सोने(हेमु)
हेमकांत-एक रत्न
हिंदोल-पहिला प्रहर असे साबांं नी सांगितले

होता हा वैदिक पुरोहितांचा (ऋत्विक) प्रकार आहे. यज्ञ कर्मात चार वेदांचे प्रतिनिधित्व करणारे चार ऋत्विक असतात. होता, अध्वर्यू, उद्गाता आणि ब्रह्मा. ऋग्वेदाचा भाग सांभाळणारा पुरोहित म्हणजे
' होता'.
कर्ता, दाता, हर्ता, नेता, श्रोता, भोक्ता, वक्ता ह्या कर्तरी धातुसाधित विशेषणाप्रमाणे होता हा शब्द धातूपासून बनला आहे. (हु हा धातु.) हवन करणारा, आहुती देणारा तो ' होता '.

धन्यवाद तेजो,हिरा,सामो,लंपन, सीमंतिनी
हिरा ,छान माहिती मिळाली या निमित्ताने..
मानव, तीच तर कटकट आहे हर्ष नावाची..नाहीतर छान नाव आहे.
माऊमैया, माझ्या मुलाचे नाव ह्रिदान आहे

चांगली नावं मिळाली मला इथे..बाळाच्या आई,बाबांशी बोलून नक्की करते नाव

होता असं नाव आहे? >> होता म्हणजे ऋग्वेदाचा पुरोहित. पण हे सर्वांना माहित असणं अवघड आहे. त्यामुळे ते नाव मी तरी सुचवणार नाही. नाहीतर नंतर वाटेल, आधीच विचार करायला हवा 'होता'.

पण होता नाव मराठी लोकांनी तरी ठेवू नये:

अरे मगाशी आला तो कोण होता?

हो.

हो काय? कोण होता?

अगं होता!!!

होता कळलं रे, मी कुठे होती म्हणतेय. कोण होता?

अगं तो माझा मित्र आहे, होता.

मग काय झालं आता, भांडण?

कसलं भांडण?

तू म्हणालास ना मित्र होता. मग आता का नाही मित्र?

अगं अजुनही मित्रच आहे तो.

पण तू तर होता म्हणालास आताच.

अगं आई, त्याच नावच होता असं आहे!

अरे माझ्या कर्मा! मग हे आधीच नाही सांगायचं का?

मानव Lol

ह्यावरून आठवलं. आमच्या शेजा-यांची सून युरोपीय आहे. तिनं आपल्या मुलाचं नाव ‘काय’ ठेवलं आहे. आमच्याकडे कायम ह्यावरून प्रश्नोत्तरं व्हायची. बाळा, तुझं नाव काय आहे? माझं नाव काय आहे. वगैरे वगैरे.

माझ्या पुतणीचं नाव आहे कियारा. लाडाने किया म्हणतो.
त्यावेळी ती घाडगे आणि सून मधील कियारा चर्चेत होती.

तिनं आपल्या मुलाचं नाव ‘काय’ ठेवलं आहे >>> Happy
किम असतं की , तसंच ते.
मम् नाम किम्

Lol मानवदादा. मराठी काय इंग्रजी लोकांनीपण ठेवू नये. बिचारं पिल्लू कापसासारखं म्हातारं होवून जायचं तरी विंग्रज "हॉट-ए" च म्हणायचे...

याज्ञवल्क्य>> म्हणजे काय?

माझ्या कर्मा! मग हे आधीच नाही सांगायचं का?
नवीन Submitted by मानव पृथ्वीकर on 3 March, 2021 - 04:09>>>> Lol

<<<याज्ञवल्क्य>> म्हणजे काय?>>> असाच प्रश्न मलाही पडला होता जेव्हा लायब्ररीत पहिल्यांदा ह्या नावाचे पुस्तक वाचले होते. अन ते पुस्तक आवडले सुद्धा होते.
सध्यातरी ते एक ऋषी होते अन गार्गी अन मैत्रेयी अश्या त्यांच्या दोन बायका होत्या एवढेच आठवतेय.

माझ्या श्रीदत्तचे नाव ऐकून माझ्या बऱ्याच नॉन मराठी मित्रमंडळीनची प्रतिक्रिया होती की छान युनिक नाव आहे, नावाचा अर्थ , दत्तगुरु त्यांना माहीतही नाहीयेत.
तर काहीं मराठी लोक हल्ली कोण देववरून नाव ठेवतो मुलांचे असेही बोलले.

देवांवरून ठेवतात की नावं. आमच्या आसपास तर खूप उदाहरणे आहेत देव देवतांची नावं ठेवलेली.

छान आहे श्रीदत्त नाव VB .

मला याज्ञवल्क्य नाव खूप आवडतं. पण भाच्याला सुचवलं नाही, फार मोडतोड होईल म्हणून. >>> त्यावरून आठवलं , प्राजक्ता माळी च्या भाचीचं नाव याज्ञसेनी आहे .

मला आपली सहजच एक शंका.. इतकी अवघड नावं असतील तर नाव घेऊन बोलवताना किती त्रास होतो.. म्हणजे माझा स्वतःचा अनुभव.. इतकेही अवघड नाव नाहीये तरीही माझ्या एका मैत्रिणीचे आईबाबा मला अजूनही रूनाली म्हणतात Lol ..तसेच ऑफिसमध्ये एक थोडे व्रुध्द साऊथ इंडियन बॉस होते...ते हि फार कष्टाने नाव घेऊन बोलवायचे...

अंजुताई थँक्स,

सामो, बाहेरचे जाऊदे माझ्या नणंद अन जावेने पण नाक मुरडले होते, पण मी दुर्लक्ष केले, चालायचंच, व्यक्ती तितक्या प्रवृत्ती. सध्याच्या काळात अशी नावे ओल्ड फॅशनड वाटतात बघ विचार कर असाही सल्ला मिळाला होता.☺️

श्रीदत्त छान आहे नाव. हल्ली अर्थ माहिती नसला तरी वेगळी नावे ठेवायची पध्दत निघाली असल्या मुळे लोकाना साधी सिंपल नावे सुधा ओल्ड फॅशनड वाटतात.

व्हीबी,तुझ्या लेकाचे नाव मस्तच आहे.देवादिकांच्या नावावरून मुलांची नावे ठेवायला मर्यादा पडतात खरे.गोवासाईडला किंवा कोकणात शंकराच्या नावावरून महेश,मांगिरिश,गौरीश ही नावे एका जमान्यात भरपूर बोकाळली होती.

रमा नाव जुने आहे
किती common आहे
स्वामीनी serial वरून inspire झालीस का
तुझ्याकडून एखाद्या हटके नावाची अपेक्षा होती
इत्यादी
बरंच काही ऐकलं आहे रमा नाव ठेवलं लेकीचं तेव्हा
(मला पलाक्षी हे नावं सुद्धा आवडलं होतं, हाक मारायला कठीण आहे म्हणून रद्द केलं )

Pages