मुलासाठी नाव

Submitted by रचना. on 26 July, 2009 - 01:15

नमस्कार मायबोलीकर,
मला माझ्या मुलासाठी नाव हवं आहे. त्याचे राशी अक्षर "ह" आहे. आणि जन्म रामनवमीचा, ३ एप्रिल २००९. (काही कारणाने बारश्याला उशीर होतो आहे.) पण आता १६ ऑगस्ट तारिख पक्की झाली आहे. नाव "ह" वरून किंवा रामाचे किंवा दुसरेही अर्थपूर्ण आणि त्याला शोभेसे हवे. आम्ही "हर्षित" ठरवतो आहे. पण मला ते पंजाबी वाटते. नवर्‍याला "हर्षवर्धन" हवे आहे. पण मला ते जास्तच लांब आणि common वाटते. कृपया मदत करा.
मायबोलीवर नविन असल्याने काही चूक झाल्यास सांभाळून घ्या.

- रचनाशिल्प

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अमुपरी, देवकीताई धन्स

किल्ली, रमा नाव जुने असले तरी गोड आहे. पलाक्षी पण छाने, पला बोलले असते लाडाने.

अजून एक, माझ्या सासऱ्यांचे नाव पण दत्त वरून आहे, सो ते जिवंत असताना नातवाचे नाव श्रीदत्त का असेही बोलले नातेवाईक. पण माझ्या सासऱ्यांनी सगळ्यांना सांगितले त्याचे नाव तेच असेल जे त्याच्या आईला हवे. खूप अप्रूप वाटले मला त्यांचे तेव्हा ☺️

रमा नाव जुने असले तरी गोड आहे. >>+१. त्या नावाचा अपभ्रंश होंणार नाही.आता उगीचच रमु,रामु केले तर नाईलाज आहे.
मला स्वत:ला अपभ्रंश आवडत नाही.त्यामुळे कधीही शॉर्ट करून कोणालाही हाक मारली नाही.

रा वरुन मुलासाठी नाव सुचवा. माझ्या भाच्याचं ठेवायचं आहे. ते जन्माक्षर आहे.

पण माझ्या सासऱ्यांनी सगळ्यांना सांगितले त्याचे नाव तेच असेल जे त्याच्या आईला हवे >>>> वा किती छान. मलाही तेच वाटतं बाळाचं नाव आईनेच ठरवावं. मी तसं सांगतेही वहीनीला आणि ती म्हणते तुम्ही दोघी आत्या मिळून ठरवा Happy

राजस.
(बाकी राकेश राजन रात्रीश राम राजनंदन राजभानु राजवर्धन राजीव वगैरे)
अलीकडे रायन हे western भासणारे नाव ऐकले दोघातिघांचे. राधेश रामेश

राघव, राजस हे आवडलेत. राजवर्धन पण छान आहे पण मोठं होतं. राजवीर पण छान.

रमा नाव जुने असले तरी गोड आहे. >>> अगदी अगदी. एव्हरग्रीन आहे.

राघव एव्हरग्रीन नाव आहे.

राघव, रीदीत ही दोन्ही इथल्या रीयाच्या मुलाची नावं आहेत. मला आवडली दोन्ही.

राजस मस्त आहे. नुसते राजपण ठेवतात.

छान छान नांवं सुचवली आहेत.
रमा व श्री दत्त दोन्ही नांवं छान आहेत.
मी पण नावं विचारलेली तेव्हा धन्यवाद द्यायचे राहून गेले होते, विशेषतः हीरा यांचे आभार.

अंजुताई Happy
म्हणजे माझ्या एकाच मुलाची 2 नावं आहेत बरं कन्फ्युज होऊ नका Lol

इकडे अमेरिकन लोकांना रिदीत पेक्षा राघवच जास्त आवडतंय किंवा सोप्पं पडतंय खरं तर. आता त्याला सगळी जनता राघव च म्हणायला लागलीये तेंव्हा मी पुन्हा रिदीत म्हणायला सुरुवात करणार आहे आता.

अर्थात रिदीत चं नाव असलं कसलं ठेवलंय म्हणणारी जनता पण आहेच माझया ओळखीत. त्यांना मी म्हणते तुम्ही आपले राघव म्हणा. माझ्या ओळखीतल्या जनतेला एक तर राघव नाव तरी आवडतं किंवा रिदीत तरी. दोन्ही आवडत नाही म्हणणारी लोकं मला अजून नाही भेटली.

रमा नाव कितीही जुनं असलं तरी फार सुंदर आहे.
बाकी बाळाचं नाव काय ठेवायचं हा पूर्णपणे त्याच्या आई बाबांचा निर्णय हवा. इतर कोणाला आवडलं नाही आवडलं तर तर मत स्वतः पाशी ठेवावं या मताची मी आहे फक्त नावाचा अर्थ फार वाईट असेल तर ते सुचवावं. पण ज्यांना ज्यात त्यात स्वतःचं मत द्यायची सवय असते त्यांचं काही नाही करू शकत आपण.

रमा.... नाव छान आहे.. पण शाळा कॉलेज मधे नेहमी प्रोब्लेम..
बहुतेक वेळा नवीन शिक्षक 'रामा' अशी हाक मारायचे (रोल कॉल).
शेवटी तिने Rema असे नाव लावले तिने...

माझ्या भाच्यासाठी कर्क रास (ड, ह) अक्षरावरून सुरू होणारे दोन किंवा तीन अक्षरी नाव सुचवाल का
काही नावे
हृतिष
हृदय
हर्षित
हितांशू
हृदित्या
यातील आणि अजून काही नावे असल्यास कृपया सुचवणे>>
बाळाचे नाव "हिमांश" ठेवले. आपणा सर्वांच्या प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद

हिमांश, छान नाव आहे,

मेधावी, राम नाव उच्चारायला सोपे अन सुंदर आहे

दोन्ही बाळांना अनेक आशीर्वाद☺️

हो. हिम म्हणजे बर्फ (स्नो) . त्याचा अंश.
हिमांशु म्हणजे मात्र चंद्र. कारण अंशु म्हणजे किरण. ज्याचे किरण हिमासारखे शीतल असा (जो, तो) चंद्र.

हिमांश, बर्फासारख्या थंडत्वाचा अंश असलेला.
तोंडात साखर, डोक्यावर बर्फ असं म्हणतात ना, त्यातील किमान डोक्यावर बर्फ असा असलेला.

ओह!

दिप, दानिश (हे गुज्जुमध्ये ऐकलंय जास्त)

ह वरून आधी इथे लिहिलेली असतील.

हर्षल, हर्षद, हर्ष, हिमांशू, हिमांश, हेम, हितेश, हरी.

Pages