मुलासाठी नाव

Submitted by रचना. on 26 July, 2009 - 01:15

नमस्कार मायबोलीकर,
मला माझ्या मुलासाठी नाव हवं आहे. त्याचे राशी अक्षर "ह" आहे. आणि जन्म रामनवमीचा, ३ एप्रिल २००९. (काही कारणाने बारश्याला उशीर होतो आहे.) पण आता १६ ऑगस्ट तारिख पक्की झाली आहे. नाव "ह" वरून किंवा रामाचे किंवा दुसरेही अर्थपूर्ण आणि त्याला शोभेसे हवे. आम्ही "हर्षित" ठरवतो आहे. पण मला ते पंजाबी वाटते. नवर्‍याला "हर्षवर्धन" हवे आहे. पण मला ते जास्तच लांब आणि common वाटते. कृपया मदत करा.
मायबोलीवर नविन असल्याने काही चूक झाल्यास सांभाळून घ्या.

- रचनाशिल्प

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वेलिका, विप्रा
विदा, वनिका
वाणि, वरदा,
वरा, वेदिका
वेदा, विदिता
वीरा, विहाना
वज्रा
विधि

विरजा ( लक्ष्मी)

विदुला (वैदुर्य रत्नासारखी (गुलाबी) कांती असलेली, तेजस्वी)

वल्लभा (लाडकी)

वैष्णवी

वाणि (सरस्वती)

वन्शिका

विनया

मुलासाठी नाव सुचवा
मुळाक्षरे त, द, न ही अक्षरे दिली आहेत. श्री गणेशाच्या नावांपैकी नाव बाळासाठी ठेवायचे आहे.

आपली मदत हवी आहे

धन्यवाद

व - विशाखा, वंदना, वत्सला, वसुधा, वैदेही, विदुला, वैशाली, विस्मया, वर्षा

अ आणि क असलेले मुलीचे नाव - आकांक्षा, अक्षरा, आकृती, एकता, अक्षता, अलकनंदा, अलका, अतिका/अतीका, अवंतिका, अनामिका

गमभन, अरेच्चा! हो की! दामोदर हे विष्णूचं नाव आहे. मला मोठे पोट याअर्थी गणपतीचे नाव असावे असे काहीसे वाटले होते. चूक दुरूस्त केल्याबद्दल आभारी आहे.

स_सा, चुकीबद्दल क्षमा असावी. Sad

आ.न.,
-गा.पै.

'द' वरुन गणपतीचं नाव - देवव्रत
'त' वरुन गणपतीचं नाव - तरुण
'न' वरुन गणपतीचं नाव - नंदन

'अ' आणि 'क' असलेली मुलीची नावं :- अद्विका, आत्मिका, अंगारिका, अंजलिका, अंशिका, अन्विका, आर्यकी, अश्मिका, अवनिका,

"अ+क" नावाला "अकी" टोपणनाव जरूर ठेवा. माझ्या एका मित्राचे होते. त्याचे नाव अमित कुलकर्णी होते.

Pages