मुलासाठी नाव

Submitted by रचना. on 26 July, 2009 - 01:15

नमस्कार मायबोलीकर,
मला माझ्या मुलासाठी नाव हवं आहे. त्याचे राशी अक्षर "ह" आहे. आणि जन्म रामनवमीचा, ३ एप्रिल २००९. (काही कारणाने बारश्याला उशीर होतो आहे.) पण आता १६ ऑगस्ट तारिख पक्की झाली आहे. नाव "ह" वरून किंवा रामाचे किंवा दुसरेही अर्थपूर्ण आणि त्याला शोभेसे हवे. आम्ही "हर्षित" ठरवतो आहे. पण मला ते पंजाबी वाटते. नवर्‍याला "हर्षवर्धन" हवे आहे. पण मला ते जास्तच लांब आणि common वाटते. कृपया मदत करा.
मायबोलीवर नविन असल्याने काही चूक झाल्यास सांभाळून घ्या.

- रचनाशिल्प

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाल्मिकी ने रामायण लिहिले त्यात नावे सोपी होती, अज, दशरथ, राम भरत अशी.
व्यासांनी विचार केला नाव कसे हटके पाहिजे म्हणून महाभारतात खालील नावे सापडतात -
धृष्टद्युम्न, बृहद्रथ, धृतराष्ट्र, धृष्टकेतु, गृत्स्यमद, श्रीकृष्ण, अश्वत्थामा, इ.

तेच तर.... काय नाव ठेवलंय तेही सांगत जा इथे. लोकांची कल्पकता सार्थकी लागली की नाही ते कळेल. आणि अजून छान नावंही कळतील. वाटल्यास virtual पेढेही वाटा. Happy मस्त बारशाला गेल्यासारखं वाटेल. Wink

प्रकाटाआ

आप म्हणजे पाणी ज्याचा धी म्हणजे साठा. अब्धी. माझ्या डोक्यात दी आलं होतं धी ऐवजी.

<<रियान , रेवान , रेयांश , रिहान , रिवान, रिहा , रेहा , रेवा , रिधिमा>>
यातल्या एकाहि नावाचा अर्थ कुणाला माहित आहे का? की आपली एक दोन अक्षरे एकत्र करून काहीतरी नाव बनवले.
त्यापेक्षा रफू, रंधा हे निदान अर्थ माहित असलेले तरी शब्द आहेत.

नावाचा अर्थ लावण्याचा अट्टाहास सोडून द्या.
अर्थ एक आणि त्या नावाचे लोक करतात भलतेच.

गुपित? Uhoh
आपल्या मुलाचे गुपित नाव कोण ठेवेल? Happy

या धाग्यावरून आठवले, काही दिवसांपूर्वी एक नाव वाचले Akant. म्हटले आकांत कसले नाव? त्याला विचारले तो म्हणाला "एकांत". हे नाव सुद्धा प्रथमच ऐकले. Happy

आपल्या मुलाचे गुपित नाव कोण ठेवेल? >>
आजकाल बरेच लोक नावाच्या अर्थाचा विचार करत नाहीत. काही तरी नवीन हवे असते. गुप्त सुचवणार होत, त्यापेक्षा गुपित बरे वाटले ; )

अजून एक : गौरंग

याच्याही अर्थात न गेलेले बरे, गाई सारखा रंग असणारा वगैरे.

Pages