मुलासाठी नाव

Submitted by रचना. on 26 July, 2009 - 01:15

नमस्कार मायबोलीकर,
मला माझ्या मुलासाठी नाव हवं आहे. त्याचे राशी अक्षर "ह" आहे. आणि जन्म रामनवमीचा, ३ एप्रिल २००९. (काही कारणाने बारश्याला उशीर होतो आहे.) पण आता १६ ऑगस्ट तारिख पक्की झाली आहे. नाव "ह" वरून किंवा रामाचे किंवा दुसरेही अर्थपूर्ण आणि त्याला शोभेसे हवे. आम्ही "हर्षित" ठरवतो आहे. पण मला ते पंजाबी वाटते. नवर्‍याला "हर्षवर्धन" हवे आहे. पण मला ते जास्तच लांब आणि common वाटते. कृपया मदत करा.
मायबोलीवर नविन असल्याने काही चूक झाल्यास सांभाळून घ्या.

- रचनाशिल्प

Group content visibility: 
Public - accessible to all site users

व्वॉव!!!! किती सुंदर बाळ आहे. Happy
खाली काही नावे सुचवली आहेत. बघा पटतय का एखादं...
०१. हार्दिक.
०२. हेमांग
०३. हरित.
०४. हिमान्शु.
०५. हरिनाक्ष
०६. हरिओम.
०७. हर्ष.
०८. हर्षल.
०९. हृदय.
१०. हृद्येश.

धन्यवाद सरसेनापती !
रचनाशिल्प

बाळ अगदी गोड आहे .त्याचा फोटो पाहून सावळाराम हे नाव सुचल .हंस हे नाव पण पहा आवडल तर .
आपल अभिनंदन .

धन्यवाद छाया ! माझी आई देखिल त्याला सावळाराम म्हणते.
रचनाशिल्प

नमस्कार,
बाळ खूप गोड आहे, अभिनन्दन.!!!!!!!!!!
नाव ठेवताना एक गोष्ट लक्षात ठेवा, जग खूप जवळ येतय, त्यामुळे नाव हे उच्चारायला सोप असाव. मी स्वत: सोफ़्ट्वेअर मधे होलन्ड मधे आहे, माझ नाव उचारायला विजयश्री लोकाना फ़ार कठिण जात आनि सरळ ते मला विजय अस बोलतात, माझा एक सह्कारी आहे हर्ष् वर्धन त्याचा सध्या हारशा झाला आहे.....मी ह या अक्षरावरुन जगभर ऐकलेल एक नाव इथे देते "हन्स"(जर्मन, ड्च, ब्रिटिश, अमेरिकन, भारतीय, आनी इतर) इतर मला सुच लेली नाव अशी,

हर्षल
हितेश
हेरम्ब

बाळ खूप गोड आहे, अभिनन्दन.!!!!!!!!!!

माझा एक सह्कारी आहे हर्ष् वर्धन त्याचा सध्या हारशा झाला आहे >>> ह्या नियमाने हार्दिक आणि हर्षित नावं तर अजिबात ठेवु नका Wink

सिंडे
तू रसेल पीटर्स फार बघतेस वाटते Happy

विजयश्री,
तुम्ही म्हणताय ते खरं आहे. आणि म्हणूनच हर्षित नको. रामाचं राघव हे नाव कसं वाटतयं ? (त्याचं सुधा रघु होण्याची भिती आहेच.........)

.

रचना, गोड बाळ आहे. अभिनंदन ! Happy
विजयश्री यांनी सुचवलेल्या नावातील शेवटचं नाव हेरंब (हेरम्ब) हे खुप छान नाव आहे. गणपती बाप्पांचं नाव आहे ते. मला खुप आवडतं हेरंब हे नाव. बघा. अन नाव ठेवल्यानंतर काय नाव ठेवलं ते इथे सांगायला विसरू नका. Happy

राघव आणी रघुनंदन ही दोन्ही नांव माझी खुप आवडती. पण ह वरुन हवय ना?

...तु सब्र तो कर मेरे यार....
-प्रिन्सेस...

अगदि अगदी प्रिन्सेस. मला पण ही दोन नावं आवडतात. पण ह वरुन ! हृषिकेश हे विष्णूचे नाव म्हणजे रामाचेच नाव ना?
***************
ॐ नमश्चण्डिकायै |

शिवम,
नक्की सांगेन.
प्रिन्सेस,
मी वर म्हटल्याप्रमाणे नाव "ह" वरून किंवा रामाचे किंवा दुसरेही अर्थपूर्ण, नवीन आणि त्याला शोभेसे हवे. राघव आणी रघुनंदन मलाही आवडतात.

अगं स्पेलिंग H वरुनच आहे की. हरिष म्हणजे पण विष्णू.
***************
ॐ नमश्चण्डिकायै |

पिल्लू गोड आहे, अभिनंदन ! Happy
रामाचे "राम" हेच अपभ्रंश होण्यापासून वाचू शकणारं अन सोपं नाव आहे? किंवा श्रीराम ? Happy
राघव आणि रघुनंदन चं नक्की रघू होणार. Happy

धन्यवाद अनु !
रामाचं "रामू" झालं नाही म्हणजे मिळवलं........:)

हो ग, रामू, राम्या करूच द्यायच नाही पण कुणाला.. Happy
माझ्या मावसभावाला त्याला छोटा भाऊ झाला त्याचे नाव हनुमान ठेवायचे होते हेच आठवले "ह" वरून. Happy
रामरक्षा किंवा विष्णूसहस्त्रनामातलं एखादं नाव क्लिक झालं तर लिहीते. Happy

<रामाचं "रामू" झालं नाही म्हणजे मिळवलं........>
अरे हो!!!!
तर मग "हृषिकेश" हे नाव no. 1
वरची बहुतेक सगळी नावं (उदः हर्षल, हितेश, हार्दिक, हेमांग, हिमान्शु इ.)गुज्जू वाट्तात.

रचना शिल्प, राघव नाव छानच आहे, पण त्याचा नक्कीच रघू होइल, आनी मोठा झाल्यावर कदचित त्याला पण हे नाव आवडेल कि नाही काय माहित? पन तुम्हाला ह वरुन नाव हव आहे ना? indiaparenting.com मी अशी नावाची यादी बघितली होती, खली दिलेली लिन्क पन बघा.

नाव ठेवल्यावर नक्की कळवा. Happy

http://www.marathimati.com/bhagyavedh/names/initials.asp

विजयश्री,
मी वर म्हटल्याप्रमाणे नाव "ह" वरून किंवा रामाचे किंवा दुसरेही अर्थपूर्ण, नवीन आणि त्याला शोभेसे हवे. indiaparenting.com पाहिले होते पण नाव खास आवडली नाहीत. आणि मराठीमाती मध्ये फक्त अ वरून आहेत.

हरी
आणि हेमेश कसं विसरलं?
हर्ष आवडलं

रचना बारस अगदी जोरदार चालल आहे .देश विदेशच्या आज्या जमल्या आहेत .छान छान नाव सुचत
आहेत .आता छानसा पाळणा होउद्या .

सगळं ठीक होईल ग रचना Happy काही नावं शॉर्ट्लिस्ट केलीस की नाही?
***************
ॐ नमश्चण्डिकायै |

अग तु एकत्र कुटंबात राहुन तुझ अस झाल. मि एकत्र कुटंबात रहाते आणि ४ महिन्यांपुर्विच मला १ पुतणि झालि. तिच नाव ठेवेपर्यंत एवढा गोंधळ सुरु होताना!!
तिला राशि अक्षर 'प' आणि 'ठ' आलेल. शेवटि नाव आम्हि तिला वेगळच ठेवल. 'इरा' (अर्थ: सरस्वति आणि झरा) आणि आम्हि तिला 'परी' म्हणतो.
माझ मत. तुझ्या गोडुसाठि 'हर्ष' नाव छान आहे ना ग. आणि मि आधि म्हणाल्या प्रमाणे 'हृषिकेश' आहे जे जास्तित जास्त 'हृषि' होउ शकत. किंवा तु नुसतच 'हृषि' ठेव.
तुझ बाळ गोड दिसतो हा.

हे कसे आहे,
हंसराज,
हर्षद,
हर्षुल (हरण)
हेमाद्री,( अर्थ नाय माहित पण एका मद्रासी कलीगचे होते)
हिमांशू

एका मद्रासी मित्राचे नावच हर्षा होते. हर्ष पण नाही.

हाय रचना Happy
मी पण सुचवते २/४ नावं
मनु हेमाद्रीचा अर्थ हिमालय असा आहे. Happy

हरिराम (श्रीराम)
हर्मेन्द्र (चंद्र)
हारूण (आशा)
हर्षुल (प्रिय)
हश्मत (आनंदी)
हेम (सोनं)
हेमकंस
हेमांग
हेरंब (गणपती)
हिमनिष - (शंकर)

----------------------------------------
माणसात राहून एकटं पडण्यापेक्षा,
एकटं राहून; एकटं पडण्यात यातना कमी असतात.
----------------------------------------

हेमक हे नाव ऐकण्यात आले होते... त्याचा अर्थ सोन्याचा कण असा होतो.

*******************
तमसो मा ज्योतिर्गमय

वॉव! हेमक नाव मस्तच वाटलं एकदम. Happy

----------------------------------------
माणसात राहून एकटं पडण्यापेक्षा,
एकटं राहून; एकटं पडण्यात यातना कमी असतात.
----------------------------------------

Pages